ब्रेन पॉवर वाढवा!!! या चार गोष्टी लक्षात ठेवा.

सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: mind power techniques in marathi | brain power techniques in marathi | स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपाय | बुद्धी कशी वाढवायची | लक्षात राहण्यासाठी उपाय | स्मरणशक्ती कमी होण्याची कारणे |
मानवी मेंदू म्हणजे एक चमत्कार आहे. आपण प्रत्येक जण मेंदूची अफाट क्षमता घेऊनच जन्माला आलो आहोत. या आपल्या मेंदूत किती काही साठवलेले असते याची कल्पना देखील करता येणार नाही.
अनेक आठवणी, शिकलेले ज्ञान, गाणी आणि बरंच काही. एखाद्या सुपर कॉम्प्युटर पेक्षा आपल्या मेंदूत कितीतरी पट जास्त डेटा साठवून ठेवलेला असतो.
पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का? काही माणसे हा डेटा अगदी त्यांना पाहिजे त्या वेळी आठवू शकतात. पण काही जणांच्या बाबतीत असं होत नाही. डोक्यात असलेली माहितीची फाईल गरजेच्या वेळी सापडतच नाही!!!!
हा लेख खास अशा व्यक्तींसाठीच आहे. तुमचा मेंदू निसर्गतःच शक्तिशाली आहे. फक्त ही ब्रेन पॉवर अजून कशी वाढवायची हे आम्ही सांगणार आहोत. आणि हे अजिबात कठीण काम नाही.
आम्ही सांगितलेल्या चार स्टेप्स नीट लक्षात घ्या. त्यांचा सराव नियमितपणे केलात तर थोड्याच दिवसात तुम्हाला याचा परिणाम दिसून येईल.
चला तर मग हे चार उपाय कोणते आणि ते वापरुन ‘डिजीटल ब्रेन ‘कसा घडवता येतो हे सविस्तरपणे पाहूया.
डिजिटल ब्रेन म्हणजे काय?
ज्ञानाचा खजिना असलेला मेंदू जो योग्य वेळी त्यातील योग्य ते ज्ञान तुमच्या समोर आणतो!!! पहा, एवढी सोपी व्याख्या आहे. आणि विश्वास बाळगा की तुम्ही सुद्धा असा डिजिटल ब्रेन नक्कीच घडवू शकता.
आता पाहूया डिजिटल ब्रेन बनवण्याच्या स्टेप्स
१. प्रत्येक गोष्टीची नोंद करा.
म्हणजे रोजच्या जीवनात ज्या लहान सहान गोष्टी तुम्ही करता त्यांची मेंदूमध्ये नोंद करा. त्यामुळे या गोष्टी तुमच्या डोक्यात अगदी घट्ट रुतून बसतील.
हे कसं करायचं?
१. चाळणी तंत्र
कोणतीही माहिती तुम्हाला मिळाली की त्यातील तुमच्या उपयोगाचा असा महत्त्वपूर्ण भाग शोधून काढा. आणि त्याचीच मेंदूमध्ये पक्की नोंद करा. आपल्यावर चहूबाजूंनी माहितीचा भडीमार होत असतो. पण त्यातील सर्व मुद्दे आपल्या उपयोगाचे नसतात आणि ढीगभर माहिती मेंदूमध्ये कोंबून ठेवली तर सगळा गदारोळ होऊन ऐनवेळी पाहिजे ते सापडणारच नाही. म्हणून अशी चाळणी लावून अनावश्यक ते बाजूला काढा.
२. ही माहिती लगेच मेंदूत फीट करा
यासाठी तुम्ही वेगवेगळे ॲप्स वापरु शकता. किंवा लगेच छोटेसे चित्र काढून, समर्पक शब्द अर्थात कीवर्ड्स वापरून ही माहिती मेंदूमध्ये घट्ट बसवा.
२. मिळालेली माहिती नीट रचून ठेवा.
एकदा का वरच्या तीन स्टेप्स वापरून तुम्ही माहितीची नोंद केलीत की यानंतरचे काम म्हणजे ही माहिती नीट रचून ठेवणे. लक्षात घ्या, जशी तुमच्या कॉम्प्युटरच्या इनबॉक्समध्ये ईमेल, मेसेजेस यांची गर्दी झालेली असते तशीच मेंदूमध्ये अनेक गोष्टी साठवलेल्या असतात. इनबॉक्स क्लिअर करताना तुम्ही काय करता? त्यातील आवश्यक त्या मेल्स किंवा मेसेजेस ठेवता आणि नको असलेले जंक डिलीट करता. अशीच मेंदूची सिस्टीम पण वेळोवेळी क्लिअर करावी लागते. त्यासाठी खालीलप्रमाणे उपाय करा.
१. नोट्स ॲप वापरा.
एव्हरनोट किंवा त्याप्रकारचे इतर ॲप वापरुन तुम्ही आवश्यक ती माहिती नोट करून ठेवू शकता. मनात येणारे विचार हे विस्कळीत स्वरुपात असतात.
पण ते जर आपण त्याचवेळी नोट केले तर महत्त्वाचे काही विसरले जात नाही आणि मागाहून आपल्या सोयीनुसार हे सर्व विस्कळीत विचार आपण नीटनेटके रचून ठेवू शकतो.
२. टॅग करा
ही खूपच उपयुक्त सवय आहे. प्रत्येक विचार किंवा माहितीला योग्य नावाचा टॅग लावला की ती अधिक चांगल्या प्रकारे लक्षात रहाते. हे टॅगिंग करताना खूप काळजीपूर्वक करावे लागते कारण ती माहिती आणि त्या अनुषंगाने येणारे इतर मुद्दे लगेच नजरेसमोर येतील अशा रीतीने हे टॅग लावावेत. उदा. नुसताच ‘नवीन माहिती ‘असा टॅग न लावता ‘उद्योजकता’ अशा पद्धतीने टॅगिंग केलेले असेल तर चित्र अगदी स्पष्ट दिसते.
३. हे चार W वापरा
Who – ही माहिती कोणासाठी आहे?
Why – कशासाठी ही माहिती सेव्ह केली आहे?
What – ही माहिती वापरून तुम्ही काय करु इच्छिता?
When – या माहितीचा उपयोग तुम्ही कधी करणार आहात?
या चार प्रश्नांची उत्तरे लक्षात घेऊन तुम्ही मेंदूमध्ये माहिती साठवलीत तर योग्य वेळी तिचा वापर करु शकता.
४. वारंवार आठवत रहा
एकदा का नीट रचना करुन सर्व माहिती साठवली की पुढची पायरी म्हणजे वारंवार ही माहिती आठवत रहाणे.
त्यासाठी तुम्ही पुढील उपाय करु शकता.
१. तुमच्या नोट्स वरच्यावर बघत जा. नोट्स काढल्यावर पहिल्या चोवीस तासांत त्या परत एकदा वाचा.
२. आठवण्याचा प्रयत्न करा. एक दिवस उलटला की सहजच रिकाम्या वेळात या नोट्स आठवण्याचा प्रयत्न करा.
३. पुन्हा आठवून बघा. दर २४ ते ३६ तासांच्या अंतराने पुढील काही दिवस या नोट्स सतत आठवत रहा. जर अगदीच गरज पडली तर तुम्ही लिहीलेल्या नोट्स ची मदत घेऊ शकता. पण शक्य तो मनातच हे सर्व आठवावे.
४. पुन्हा अभ्यास करा. एक आठवडा झाला की तुम्ही लिहीलेल्या नोट्स परत एकदा वाचून काढा.
या स्टेप्स नुसार गेलात तर तुमचा डिजिटल ब्रेन लवकरच तयार होईल. मग तुम्ही स्मार्ट वर्क करु शकता आणि आपल्या मेंदूची ही विलक्षण ताकद पाहून तुम्ही अगदी आश्चर्यचकित होऊन जाल !!!
योग्य ती माहिती योग्य त्या वेळी मेंदूने तुमच्यासमोर ठेवली तर कितीतरी वेळ आणि परिश्रम वाचतील. शिवाय या टेक्निकचा वापर करून अधिकाधिक नवीन माहिती तुम्ही साठवून ठेवू शकता. यामुळे तुमची कल्पकता वाढेल आणि खूप प्रगती होईल.
या लेखातील कोणता उपाय तुम्हाला आवडला हे कमेंट्स करुन सांगा. लाईक व शेअर करून उपयुक्त माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा