एशरमन सिंड्रोम – गर्भाशयाच्या आजाराची संपूर्ण माहिती

गर्भाशयाचे आजार

स्त्रियांच्या शरीरातील प्रजनन संस्थेचे अवयव वैशिष्ट्यपूर्ण आहेत. गर्भाशय, ओव्हरी, फॅलोपियन ट्यूब्ज इत्यादी महत्वाच्या अवयवांचे आजार कोणते, त्यांची लक्षणे व उपचार हे प्रत्येक महिलेने जाणून घेतले पाहिजे.

मनाचेTalks अशाच एका आजाराची शास्त्रशुद्ध माहिती घेऊन येत आहे.

या रोगाचे नाव आहे एशरमन सिंड्रोम.

वैद्यकीय भाषेत सिंड्रोम म्हणजे अनेक लक्षणे एकत्रितपणे जाणवणे. यालाच आपण लक्षण समुच्चय असे म्हणू शकतो.

आता या आजाराची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

काय आहे एशरमन सिंड्रोम?

गर्भाशयात स्कार टिश्यू बनतो त्यालाच एशरमन सिंड्रोम असे म्हणतात. शस्त्रक्रिया झाल्यानंतर किंवा डी. एन. सी. नंतर याची लक्षणे दिसतात.

गर्भाशयाच्या ऑपरेशन नंतर हा त्रास सुरू होऊ शकतो. काही पेशंट मधे गर्भाशयाची समोरील व मागील बाजू एकत्र चिकटते. तर काही केसेस मध्ये गर्भाशयात लहान लहान गठ्ठे होऊन ते चिकटून रहातात.

एशरमन सिंड्रोम ची लक्षणे

एशरमन सिंड्रोम ज्या स्त्रियांमधे आढळतो त्यांची मासिक पाळी अनियमित होते किंवा पाळी अजिबात येतच नाही. तर काही महिलांना पाळीच्या वेळी ओटीपोटात खूप वेदना होतात पण रक्तस्राव बाहेर येत नाही.

यावरून एक गोष्ट लक्षात येते की या स्त्रियांना पाळी येत असते पण गर्भाशयात स्कार टिश्यू मुळे अवरोध निर्माण झाल्याने पाळीचा रक्तस्राव बाहेर पडू शकत नाही.

याचबरोबर अनियमित पाळी किंवा मासिक पाळी बंद होण्याची इतर काही कारणे जाणून घेऊया.

  • गर्भावस्था
  • अचानक वजन घटणे
  • ताणतणाव
  • स्थूलता
  • अती व्यायाम करणे
  • गर्भनिरोधक गोळ्या खाणे
  • मेनोपॉज म्हणजे पाळी बंद होणे
  • PCOD

एशरमन सिंड्रोम ची कारणे

१. हा एक दुर्मिळ आजार आहे. इंटरनॅशनल एशरमन असोसिएशन द्वारे केलेल्या सर्वेक्षणात असे दिसते की जगभरात या आजाराने ग्रस्त असलेल्या स्त्रियांपैकी ९० % केसेस मध्ये डी. एन. सी. केल्यानंतर या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले.

डी एन सी (Dilatation and Curatage) ही गर्भाशय पिशवी साफ करण्याची एक पद्धत आहे. यात गर्भाशयातील टिश्यू क्यूरेटरच्या सहाय्याने बाहेर काढला जातो. याला एक प्रकारची लहान शस्त्रक्रिया असे म्हणता येईल.

२. ओटीपोटातील अवयवांचे गंभीर इन्फेक्शन हे देखील एक कारण असू शकते. यात कोणतीही शस्त्रक्रिया झालेली नसते.

३. टीबी किंवा सिस्टोसोमियासिस हे आजार होऊन गेले असतील तर त्यानंतर गर्भाशयाचे आतील आवरण चिकटून एकत्र येऊ शकते.

एशरमन सिंड्रोम वरील उपाय

एंडोस्कोपी द्वारे गर्भाशयाचा आतील भाग तपासतात. याला हिस्टेरोस्कोपी असे म्हणतात. या प्रक्रियेनुसार गर्भाशयाचा एकमेकांना चिकटलेला भाग सोडवता येतो किंवा कापून काढला जातो.

याशिवाय इन्फेक्शन झाले असेल तर ऍन्टिबायोटिक्स औषधे दिली जातात.

पुन्हा रोगलक्षणे सुरु होऊ नयेत किंवा गर्भाशयाच्या आतील आवरणांचे आरोग्य व्यवस्थित रहावे यासाठी काही काळपर्यंत ऍन्टिबायोटिक्स तसेच इस्ट्रोजेन सुरु ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

सारांश

मैत्रिणींनो, यावरून तुमच्या लक्षात आले असेल की पाळीच्या कोणत्याही समस्या असतील तर दुर्लक्ष करून चालणार नाही. बऱ्याच वेळा स्त्रिया घराची जबाबदारी सांभाळताना स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देत नाहीत.

बाहेरून किरकोळ वाटणारा त्रास हे एखाद्या जीवघेण्या आजाराचे लक्षण असू शकते. त्यामुळे जरा देखील शंका आली तरी वेळ न दवडता लगेच स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांची किंवा आपल्या फॅमिली डॉक्टरांची भेट घ्या. त्यांच्याशी सविस्तर चर्चा करा.

कोणत्याही कारणाने डी एन सी करावी लागली असेल तर अशा महिलांनी एशरमन सिंड्रोम ची शक्यता लक्षात घेऊन नियमितपणे चेक अप करून घेणे आवश्यक आहे.

पाळी नियमित नसेल तर स्वतःच्या मनाने किंवा इतरांचा सल्ला ऐकून घरगुती अथवा अशास्त्रीय उपाय करण्यात वेळ घालवू नका. कोणत्याही आजाराचे जेवढ्या लवकर निदान होईल तेवढे चांगले. त्यामुळे ट्रिटमेंट करणे तुलनेने सोपे होते. प्राथमिक अवस्थेतील आजार आटोक्यात आणणे सोपे आहे पण एकदा का कोणत्याही रोगाची पाळेमुळे शरीरात पसरली की मग सर्वच कठीण होऊन बसते. उपचारांचा खर्च तर वाढतोच पण आपल्याला होणारा त्रास कैक पटींनी वाढत जातो.

हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करुन आम्हाला सांगा.

जास्तीत जास्त लाईक व शेअर करून उपयुक्त माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!