काल्पनिक भीती, अज्ञात संकट माणसाचा घात कसा करू शकते, वाचा या लेखात

मराठी बोधकथा

काल्पनिक भितीमुळे माणुस तहानभुक, झोप, स्वास्थ्य हरवुन बसतो. भीतीच्या छायेत वावरण्याने आत्मविश्वासास तडा जातो, कोणतीही भीती मनाला भित्रं करते. बहुतेक वेळा ज्या अज्ञात संकटाची भिती वाटत असते, ते संकट कदाचित अस्तित्वातसुद्धा नसते. तेच सांगणारी हि गोष्ट.

काल्पनिक भितीमुळे माणुस तहानभुक, झोप, स्वास्थ्य हरवुन बसतो. भीतीच्या छायेत वावरण्याने आत्मविश्वासास तडा जातो, कोणतीही भीती मनाला भित्रं करते…

वर्ष १२९६, देवगिरीवर राजा रामदेवराय राज्य करत होता, उत्तर हिंदुस्थान मुसलमानी सुलतानांच्या हातात गेला होता, तेव्हा रामदेवरायने डोळ्यात तेल घालुन, मुसXलमानांचा हल्ला दक्षिणेवर होईल याची जाण ठेवुन युद्धास सज्ज असावयास पाहीजे होते.

परंतु दक्षिणेकडील होयसाळ, काकतीय, परमार, वाघेला ह्या हिंदु राजवटी उत्तरेकडील घडामोडींपासुन पुर्णपणे अनाभिज्ञ होत्या.

हे सर्व आपापसातच भांडणे व युद्ध करत होते, रामदेवरायांचा शुर मुलगा शंकरदेव देवगिरीचे उत्कृष्ट सैन्य घेऊन गुजरातच्या एका हिंदु राजावर चाल करुन गेला होता.

या परिस्थितीचा फायदा उठवुन, दिल्लीहुन अXल्लाXउद्दीन खिXलजी अवघ्या आठ हजार स्वारांनिशी देवगिरीवर चाल करुन आला, फंद-फितुरीने त्याने देवगिरींच्या किल्ल्यात धान्याच्या पोत्यांऐवजी मिठाची पोती भरली.

आक्रमण झाले, देवगिरीचा चाललेला विनाश पाहुन राजा रामदेवराय शरण आला व कोट्यावधी रुपयांची खंडणी, सोने, चांदी, जवाहीर त्याने अल्लाXउद्दीनास दिले, तहाच्या आणि खंडणीच्या वाटाघाटींची बोलणी सुरु होती.

इतक्यात शुर शंकरदेव देवगिरीचे मुख्य सैन्य घेऊन आला, त्याला शरणागती मान्य नव्हती, त्याने खिXल्जीच्या सैन्यावर हल्ला चढवला, त्याचे सैन्य प्राणपणाने लढु लागले, खिXलजीच्या सैन्यात घबराट उडुन त्यांचा पराभव होणार असे दिसु लागले, लढाई चालु असताना, सर्वांनाच लांब अंतरावर प्रचंड मोठ्ठा धुरळा उडत असलेला दिसला.

ते एक वादळ होते, पण खिXलजीने हुल उठवली, की आपल्या मदतीला आणखी मुसXलमानांचे सैन्य आले आहे, त्याच्या सैनिकांना चेव चढला, यादव सैन्य ते वादळ आणि धुळीचे लोट पाहुन धास्तावलं, घाबरुन सैरावैरा पळु लागलं.

शंकरदेवाचा पराभव झाला, खिXलजीने त्याला ठार मारलं, हळुहळु देवगिरीचं राज्य नष्ट झालं, मुसलमानांनी स्वतंत्रपणे प्रत्येक हिंदु राजाचा पराभव केला, सर्व हिंदु राजे नष्ट होवुन दख्खन मुसXलमानांच्या ताब्यात गेली.

पुरी चौकशी न करता, निव्वळ घबराटीने, हा पहीला पराभव झाला. साडेचारशे वर्षांनी याचीच पुनरावृत्ती पानिपतावर घडली.

बहुतेक वेळा ज्या अज्ञात संकटाची भिती वाटत असते, ते संकट कदाचित अस्तित्वातसुद्धा नसते.

त्यातुन असं काही संकट आलंच, तर त्याचा विचारपुर्वक यथास्थिती मुकाबला करता येतो, व त्यावर यशस्वी मात करता येते.

काल्पनिक भितीमुळे माणुस तहानभुक, झोप, स्वास्थ हरवुन बसतो. भीतीच्या छायेत वावरण्याने आत्मविश्वासास तडा जातो, कोणतीही भीती मनाला भित्रं करते, भीतीची सख्खी बहीण म्हणजे चिंता!..

एकवेळ अपयश परवडले, पण अपयशाची भीती नको, भीती आणि चिंता हे दुबळ्या मनाचे खेळ आहेत, आणि दोन्हीपासुन मुक्त होण्याचा उपाय एकच आहे, साधना!..

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

2 Responses

  1. Samrat nishant says:

    Sir aaplyashi bolaych aahe

  2. Pankaj says:

    Sir Khup Sunder and Motivation Karnara Article aahe.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!