इम्परर्फोरेट हायमेन‌ : जाणून घ्या सर्व माहिती (पिरीयड्स न येण्याचे हे हि असू शकते एक कारण)

Imperforate hymen in marathi

सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: पिरीयड्स न येण्याचे कारण । हायमनमधून मासिक रक्तस्त्राव कसा होतो? । हायमन (hymen) आपण पाहू शकतो का? । हायमेन (hymen) म्हणजे काय । जर हायमन फाटलं तर रक्तस्त्राव होतो का? | मासिक पाळी न येण्याची कारणे | मासिक पाळी कमी रक्तस्त्राव उपाय

हा आजार काही स्त्रियांमधे जन्मापासून असतो. यालाच छिद्ररहीत योनीपटल असेही म्हणतात. योनीमुखावर हायमेन नावाचा एक पातळ पडदा असतो.

इम्परफोरेट हायमेन या अवस्थेत हायमेनमुळे योनीचे मुख पूर्णपणे झाकले जाते. काही मुलींमध्ये जन्मापासूनच हा दोष आढळतो. मुलीने तारुण्यात पदार्पण करताच हायमेनची जाडी थोडी वाढते.
काही मुली मात्र हायमेन शिवायच जन्माला येतात.

विशिष्ट समाजात हायमेनला व्हर्जिनल टिश्यू असे म्हणतात.काही वर्षांपूर्वी याचा संबंध स्त्री च्या कौमार्याशी जोडला जात असे. जर हायमेन पडदा फाटलेला असेल तर त्या स्त्रीचा शारीरिक संबंध आलेला आहे आणि जर हायमेन न फाटलेले असेल तर ती कुमारीका स्त्री अशी धारणा होती.

वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या आधुनिक संशोधनाने मात्र हा समज खोटा ठरवला आहे. हायमेन फाटलेले असण्याचा आणि व्हर्जिनिटीचा काही संबंध नसतो असे आता मानले जाते.

हायमेन फाटण्याची अनेक कारणे आहेत. मैदानी खेळ खेळल्यामुळे, काही विशिष्ट प्रकारच्या तपासण्या करत असताना तसेच संभोग क्रियेदरम्यान हा पडदा फाटण्याची शक्यता असते.

इम्परफोरेट हायमेनची लक्षणे

डॉक्टर मुलीच्या जन्मानंतर लगेच या आजारावर इलाज करतात. परंतु काही वेळा मुलगी वयात येईपर्यंत या आजाराची लक्षणे समजून येत नाहीत.

याच्या प्राथमिक लक्षणांमध्ये पोटदुखी व सूज दिसून येते.

ही लक्षणे अनेक दिवस टिकतात. यामागचे कारण जाणून घेऊया.

योनी पटल बंद असल्यामुळे पाळीचा रक्तस्राव बाहेर पडू शकत नाही. तो आतच साठून त्याचा दबाव निर्माण होतो. म्हणून वेदना होतात. हे साठलेले रक्त फॅलोपियन ट्यूब्ज व गर्भाशयातही साठू शकते.

इम्परफोरेट हायमेनची इतर लक्षणे खालीलप्रमाणे आहेत.

वयात येण्याची इतर लक्षणे दिसतात पण पाळी कमी प्रमाणात येते.

  • कंबरदुखी
  • पाठदुखी
  • लघवीला होताना जळजळ, वेदना होणे किंवा मूत्रप्रवृत्ती न‌ होणे.
  • मलावरोध
  • पोटात दुखणे
  • जुलाब
  • मळमळ

इम्परफोरेट हायमेनची कारणे

आईच्या पोटात मुलीचा गर्भ वाढत असताना हायमेन पटलात दोष राहिला तर इम्परफोरेट हायमेनची लक्षणे दिसतात. किशोरवयीन मुलींमध्ये पाळीचा रक्तस्राव गर्भाशय व योनीमार्गात साठून रहातो तेव्हा या आजाराची लक्षणे समजून येतात.

गर्भावस्थेत असताना हायमेनची वाढ पूर्ण झाली नाही, तर इम्परफोरेट हायमेनची लक्षणे दिसतात.

Sinovaginal bulbs जर योनीमार्गात योग्य प्रकारे जुळले नाहीत तर हा आजार होतो. त्यामुळे हा एक जेनेटिक आजार आहे.

परंतु वैज्ञानिक दृष्ट्या हा रोग आनुवंशिक किंवा उत्परिवर्तक (mutation) कारणांशी संबंधित मानला जात नाही.

यामुळे ही लक्षणे निर्माण करणारे अन्य काही रोग आहेत का याची खात्री करता येते.

नवजात शिशू मध्ये सामान्य तपासणी करताना या रोगाची लक्षणे दिसतात.

१० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींमध्ये याची लक्षणे क्वचितच दिसतात.

किशोरवयीन मुलींमध्ये वेदना हे मुख्य लक्षण असते. यासाठी तपासणी करताना इम्परफोरेट हायमेन असल्याचे समजते.

योनी परीक्षण करताना एक फुगीर भाग दिसतो. मासिक पाळीचे रक्त साठून हा फुगवटा तयार होतो. तसेच या साठलेल्या रक्तामुळे हायमेनचा रंग निळा दिसत असेल तर हे एक गंभीर लक्षण आहे.

इम्परफोरेट हायमेनवरील उपचार

हायमेनॉटॉमी

ही एक प्रकारची शस्त्रक्रिया आहे. यात स्कालपेल किंवा लेझर च्या सहाय्याने हायमेनचा काही भाग कापून काढला जातो.

काही मुलींमध्ये जन्मताच ही सर्जरी केली जाते. तर काही मुलींमध्ये किशोरावस्थेत ही सर्जरी केली जाते. शस्त्रक्रिया झाल्यानंतर या मुली नॉर्मल आयुष्य जगू शकतात.

डॉक्टर हायमेनमधे एक छोटासा छेद करतात. त्यातून योनीमार्गात साठलेले पाळीचे रक्त बाहेर काढून टाकतात. त्याचप्रमाणे योनीच्या बाह्य भागात एक रिंग बसवण्यात येते.

कधीकधी यासाठी डायलेटर्स चा वापर केला जातो. हे एक सर्जिकल उपकरण असून याचा आकार टॅम्पून एवढा असतो. शस्त्रक्रिया झाल्यानंतर पेशंट नॉर्मल होईपर्यंत रोज १५ मिनिटे हे डायलेटर्स योनीमार्गात ठेवले जाते.

सारांश

इम्परफोरेट हायमेनची शस्त्रक्रिया झाल्यानंतर मुलींना मासिक पाळी व्यवस्थित येते. तसेच पिरीयड्सच्या वेळी टॅम्पूनचा वापरही त्या करु शकतात.

इम्परफोरेट हायमेनची शस्त्रक्रिया केल्यामुळे भविष्यात शरीर संबंध ठेवण्यास किंवा मूल जन्माला घालण्यास कोणत्याही प्रकारे अडथळा येत नाही. हा विकार असाध्य नाही. वेळेवर निदान व उपचार केले असता या रोगापासून मुक्त होता येते.

हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करुन सांगा.

लाईक व शेअर करा. आरोग्य विषयक माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!