माणसं जोडावी कशी? …. (भाग १)

आज शिवराज गोर्ले यांचं “माणसं जोडावी कशी?” हे अप्रतिम पुस्तक वाचलं, शिवराज गोर्ले यांनी थरथराट, खतरनाक, चिमणी पाखरं अशा चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या, अनेक यशस्वी नाटकांच्या कथा लिहिल्या, बरीच वर्ष त्यांनी नाटक-चित्रपट सृष्टीत काढली, नोकरी सोडुन लिखाणाची फ्रीलान्सींग कामं केली, त्यात अनेक दिग्गजांसोबत काम करण्याची त्यांना संधी मिळाली.

त्यांनी व्यावसायिकता सांभाळुन कित्येक दशकं माणसं जोडली, आयुष्य समृद्ध करणारे त्यांचे अनुभव-किस्से त्यांनी ह्या पुस्तकात सांगितले आहेत.

कोणतंही क्षेत्र असो, व्यवसाय असो किंवा नोकरी, कुटुंबात असो किंवा एखाद्या संस्थेमध्ये, किटी, भीशी असो किंवा एनजीओ, सेल्स-मार्केटींग असो वा राजकारण, अध्यात्म असो वा कोणतही क्षेत्र असो, आपण जितकी जास्त माणसं जोडु शकु, तितकं अधिक आपण यशस्वी होऊ!

ह्या पुस्तकाला त्यांनी तेहतीस सुत्रांमध्ये प्रस्तुत केलयं. ह्या तेहतीस गोष्टी जर आपण आत्मसात करु शकलो, तर नक्कीच आपण माणसांना आपल्याकडे आकर्षित करणारं चुंबक बनु. ह्या गोष्टी, आपल्याला, आपल्या क्षेत्रात आगळ्यावेगळ्या उंचीवर पोहचवतात.

तेव्हा हे पुस्तक आवर्जुन वाचाच, मला ह्या पुस्तकात जे काही समजले ते मी माझ्या शब्दांत, आणि माझ्या अनुभवांनिशी इथे मांडत आहे.

स्वभाव मोकळा हवा – माणसं जोडायची असतील तर माणसांमध्ये स्वारस्य हवे. मोकळ्या स्वभावाच्या माणसांना कसलेही ‘गंड’ नसतात, त्यांना स्वतःशी आणि इतरांशी कसलाच ‘प्रॉब्लेम’ नसतो, ‘माणसं चांगलीच असतात’, ह्यावर त्यांचा विश्वास असतो, मोकळी माणसं ‘ट्रान्सपरंट’ असतात.

अंतरी जिव्हाळा हवा – ‘केअरींग नेचर’ ची लोकं सगळीकडे लोकप्रिय असतात, हा शब्द ऐकुन माझ्यासमोर आमच्या रोटरी क्लब मधलं एक व्यक्तिमत्व समोर आलं, जेवायला सोबत असले की काय हवं नको ते बघतील, प्रवासात सोबत असले तर सहजच पण खुप आपुलकीने वागतील. वाढदिवस असो वा एनिव्हर्सरी, आवर्जुन शुभेच्छा देतील, बरं! ही पॉलीसी नाही, हा त्यांचा स्वभावच आहे. यात काहीच आश्चर्य नाही की सर्वांनाच ते हवेहवेसे वाटतात.

सौजन्य तर हवयं – मी बेंगलोरमध्ये माझा पहीला जॉब करत असताना, आमचे आनंद नावाचे बॉस होते, ते सीईओ होते पण एमडी पेक्षा त्यांचा रुबाब जास्त होता. ते साधं बोलायचेच नाही, सरळ अंगावरच खेकसायचे, पाणउतारा करायचे, त्यात त्यांना आसुरी आनंद मिळायचा बहुतेक! मी खुप कष्ट करायचो, पण नवखा होतो, स्टाफ कमी असल्याने पटापट मोठ्मोठ्या जबाबदार्‍या दिल्या जात होत्या, फक्त सहा महीने झाले होते, आणि माझ्या हातुन कसलीशी चुक झाली, त्या आनंद पुरीने मला कडक इंग्लिशमध्ये झाप झाप झापले, काय म्हणलं ते कळालं नाही, पण रडु फुटले, “मी तुझ्याइतका मुर्ख माणुस उभ्या आयुष्यात पाहीला नाही,” हे शेवटचे वाक्य डोक्यात फिट्ट बसले, मी अंतर्बाह्य हादरुन गेलो. तडक बाहेर आलो, आतापर्यंत असा अपमान कधी झाला नव्हता, पायात चालण्याची शक्ती नव्हती, तास-दोनतास तिथेच फुटपाथच्या कट्ट्यावर सुन्नपणे बसुन होतो. दुसर्‍या दिवशी मी नौकरी सोडली, शिपायापासुन कंपनीच्या मालकांपर्यंत, सगळ्यांनी खुप समजावले, नौकरी सोडताना प्रचंड विरोध केला, पण घाव वर्मी बसला होता, मी बाहेर पडलोच. माझी चुक मला सौजन्याने दाखवता आली असती, तर मी खुशीने कित्येक वर्ष तिथे काम केले असते.

सर्वजण सारखेच – हॉटेलात गेल्यावर काही लोक वेटरला कमीपणाची वागणुक देतात. कधी ड्रायव्हरला, कधी नौकराला, कधी कामवालीला, कधी शिपायाला आपण त्यांच्या ‘पायरी’ नुसार वागणुक का देतो? पैसे कमी जास्त असले तरी त्यांच्याशी सन्मानानेच वागायला हवं, आपण सर्वजण सारखेच आहोत, कारण आपण सर्वजण माणसं आहोत!

मदतीची संधी घ्या – रस्त्यावर कडक उन्हात, घामेघुम होवुन, कावरंबावरं होत कोणी आपल्याला पत्ता विचारतो, आपण नेहमीच घाईत असतो, आपण त्यांना मदत का करायची? त्यामुळे समाधान मिळतं म्हणून.

स्वानुभव – एकदा एका निमुळत्या रस्त्यावर गाडी चालवताना, कारचा एक टायर मोठ्या खड्ड्यात गेला, मला नीट उतरताही येईना, अचानक पंचवीसेक लोक जमले, दोन मिनीटात कार उचलुन बाहेर काढली. थरारक घटना होती ती! त्याआधी मी रस्त्यावर कोणाला विशेष मदत करायचो नाही, पण त्या दिवसापासुन मी रस्त्यावर कोणी दुचाकीस्वार पडला किंवा एखाद्याची कार खड्ड्यात फसलेली दिसली की पळतच मदतीला जातो.

शक्य तितकं भलं करावं –जाता जाता, काही खर्च न करताही मदत करता येते, जसं की, लांबच्या रस्त्यावर लिफ्ट देणे, जाता जाता एखादी वस्तु डिलीव्हर करणं, कोणाला बॅंक व्हाऊचर भरुन देनं, कोणाला आपल्या मोबाईलवरुन कॉल करु देणं, असं काहीही केल्याने समाधान मिळतं.

मदतीतून विश्व्सनीयता वाढवा – आवश्यकता असेल तिथे एखाद्या गरजु माणसाचं नाव सुचवणं, चांगल्या टॅलेंटला प्रमोट करणं, कोणी मदतीसाठी फोन केला, तर नाक न मुरडता, त्याला हवा तो माणुस, हवी ती माहीती द्यायची, अशा मदती केल्याने आपली विश्वासनीयता वाढते.

कुणाचं नुकसान नको – कालपरवाच आमच्या कॉलेजच्या बाजुच्या, फार्मसी डिपार्टमेंटमध्ये एक गृहस्थ आले होते, “अशी कशी बिलं हरवता हो? पेमेंटसाठी आणखी किती चकरा मारायच्या हो?” कोण्या क्लर्कच्या निष्काळजीमुळे कोणालातरी किती त्रास होतोय, हे दिसतं होतं!

मनाचा मोठेपणा – जेव्हा आपली एखाद्याशी अटीतटीची स्पर्धा रुप घेऊ लागते, तेव्हा कधीकधी दुसर्‍याच्या पोटावर पाय देऊन संधी ओरबाडण्यापेक्षा, आनंदाने त्याला पुढे करण्याचा मनाचा मोठेपणा दाखवणं, शहाणपणाचं ठरतं! तसचं नकळत सुदधा आपल्यामुळे कोणाचं नुकसान होवु नये, याची दक्षता घ्यावी.

समोरचा अधिक महत्वाचा – आपण स्वतः तर स्वतःसाठी महत्वाचे असतोच, पण विक्री क्षेत्रात जो समोरच्याला महत्व देतो, त्याचा जास्त माल खपतो, चांगले सेल्समन हे मानसशास्त्र ‘चांगलं’ ओळखतात, समोरच्याला ‘इंपोर्टंट’ फील करवतात. आदर आतिथ्य करतात.
क्लायंट्ला हाताळताना त्याच्यावर विश्वास ठेवला पाहीजे.
हाताखालच्या स्टाफला तु्च्छ लेखण्यापेक्षा, हाडहुड करण्यापेक्षा, त्याच्यावर जबाबदारी सोपवुन, त्याला चांगली वागणुक देऊन, त्याच्याकडून काम करवुन घेणारा खरा हुशार!

कौतुकात कसर नको – स्तुती कोणाला आवडतं नाही?, कौतुक कोणाला सुखावत नाही? माणसं जोडण्यासाठीचं हे साधसोपं रहस्य आहे, स्तुती, कॉम्प्लिमेंट समोरच्याच्या चेहर्‍यावर हास्य खुलवते, हेही एक पुण्याचंच काम नाही का?
– कौतुक करताना, ते वेगळ्या शब्दांत, खास आपल्या शैलीत केलं तर ते मनापासुन झाल्याचं, जास्त लक्षात राहतं. (उदा. आजकाल माझे दोनच छंद आहेत, तुमच्या लेखांची वाट बघणं, आणि तुमचे लेख वाचणं.)
– ज्या गोष्टीसाठी सगळेच कौतुक करतात, त्यापेक्षा दुसरं काही असेल, त्याचंही कौतुक मनात घर करतं! (उदा. तुमचं घर सुंदर आहेच, पण तुम्ही बनवलेला स्वयंपाक तितकाच छान आहे.)

कृतज्ञ राहा! –ऑस्कर असो वा फिल्मफेअर, एखादा सत्कार समारंभ असो, वा एखादं बक्षीसवितरण, एवॉर्ड घेणारे मोठमोठे लोक, काय बोलतात? बघा, “माझे सहकारी, माझे आईवडील, माझे मित्र, माझी टीम, मी तुमच्या सर्वांचा खुप खुप कृतज्ञ आहे. तुमच्यामुळेच मी आज इथं उभा आहे,” – कारण त्यांना माहीत असते की, कृतज्ञ राहणारे, ‘आनंदी आणि समृद्ध’ असतात, आणि आनंदी लोक ‘कृतज्ञ’ असतात…….. जॉनी लीव्हर स्टार झाला पण आपल्या झोपडपट्टीतल्या दिवसांना आणि मित्रांना विसरला नाही. ते भेटायला आले की आवर्जुन त्यांना वेळ द्यायचा, गिफ्टस द्यायचा. ह्या अशा कृतींनी आयुष्य समाधानी आणि समृद्ध होतं.

(धन्यवाद आणि क्रमशः)

Photo Credit: Marathi Community of Australia

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

4 thoughts on “माणसं जोडावी कशी? …. (भाग १)”

  1. जीवनात अशा प्रेरणादायी गोष्टींचा वापर केल्यास आयुष्य आणखी सुखद होईल .

    Reply
  2. जीवनात जर यश प्राप्त करायचं असेल तर माणसं जोडणं खूप महत्त्वपूर्ण आहे कारण प्रत्येक यशामध्ये अनेक माणसांचा हात असतो अशी माणसं आपली असतात
    एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय