तीव्रतेने लघवीला जावे लागते? मूत्राशय अतिसक्रीय असल्यास कोणते परिणाम होतात?

वारंवार लघवी होण्याची कारणे

 

सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: मूत्रसंस्थेच्या आजाराची लक्षणे । लघवीला वारंवार जावे लागणे घरगुती उपाय । प्रोस्टेट ग्रंथी वाढण्याची कारणे । झोपेत लघवी होणे ।

अतिसक्रीय मूत्राशय अर्थात ओव्हरऍक्टीव्ह ब्लॅडर सिंड्रोम ही अशी अवस्था आहे ज्यात एखाद्या व्यक्तीला अचानक एवढ्या तीव्रतेने मूत्रप्रवृत्ती येते की त्यावर कंट्रोल करणे त्यांना फार कठीण जाते. ही अशी भावना कोणत्याही वेळी अनुभवास येते.

हा सिंड्रोम झालेल्या व्यक्तीला दिवसा व रात्री अनेक वेळा लघवीला जावे लागते. काही वेळा तर युरीनवरचा कंट्रोल जातो व लघवी झाल्याचे त्यांना कळतही नाही.

जरी ही एक कॉमन समस्या असली तरीही पीडित व्यक्तीला समाजात वावरताना यामुळे खूपच अवघडल्यासारखे वाटते. अशा व्यक्तींना सतत मनावर दडपण जाणवते. जर चारचौघात युरीन कंट्रोल करता आले नाही तर किती लाजीरवाणी अवस्था होईल हा विचार सतावत रहातो. यामुळे अशा व्यक्ती बाहेर जायचे टाळतात. हळूहळू ते एकटे पडत जातात.

ओव्हरऍक्टीव्ह ब्लॅडर वर काही सोपे उपाय प्रभावी ठरतात.

दैनंदिन सवयींमध्ये बदल करणे, योग्य आहार घेणे तसेच पेल्विक फ्लोअर मसल्स मजबूत करणारे व्यायाम यामुळे बऱ्यापैकी फरक पडतो. लवकरच एका व्हीडीओमध्ये/लेखामध्ये या व्यायाम प्रकारांबद्दल माहिती दिली जाईल. तेव्हा मनाचेTalks चे सर्व अपडेट्स नियमितपणे घेण्यासाठी मनाचेTalks चे फेसबुक पेज फॉलो करा.

या प्राथमिक उपचारांचा उपयोग होत नसेल तर डॉक्टर इतर उपाय सांगतात.

अतिसक्रीय मूत्राशयाची लक्षणे

लघवीला जाण्याची अनावर इच्छा. ही तीव्र स्वरूपाची इच्छा असून मूत्रप्रवृत्ती थांबवता येत नाही.

काही वेळा तर युरीन लीक झाल्याचे कळत नाही. यालाच मूत्र असंयमन असे म्हणतात. म्हणजे लघवी रोखता न येणे.

वारंवार मूत्रप्रवृत्ती होणे

२४ तासांत जर आठ वेळा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा मूत्रप्रवृत्ती होत असेल तर अतिसक्रीय मूत्राशय आहे असे म्हटले जाते.

गाढ झोप न लागणे

सतत बाथरूममध्ये जावे लागते त्यामुळे झोपेत व्यत्यय येतो. या सिंड्रोम मुळे झोपेच्या समस्या निर्माण होतात.

कोणत्याही कारणाने जर मानसिक तणाव वाढला तर या सिंड्रोम मधील लक्षणे जास्त प्रमाणात जाणवतात.

अतिसक्रीय मूत्राशयाची कारणे कोणती आहेत?

मूत्राशयाच्या मसल्स वर अती ताण येणे किंवा ब्लॅडरचे स्नायू आकुंचन पावणे हे मुख्य कारण आहे. पण असे का होते याचे निश्चित कारण सांगणे कठीण आहे.

हा सिंड्रोम असेल तर ब्लॅडर कडून मेंदूला संदेश जातो की ब्लॅडर पूर्णपणे भरलेले आहे. पण प्रत्यक्षात असे नसते. मूत्राशयात खूप कमी युरीन असते.

युरीन फ्लो टेस्ट

पूर्ण फोर्स ने मूत्रप्रवृत्ती होते का हे यावरून लक्षात येते. तसेच ब्लॅडर संपूर्ण रिकामे होते की नाही हे सुद्धा या तपासणीत स्पष्ट होते.

अतिसक्रीय मूत्राशयावरील उपचार

मूत्राशयावर नियंत्रण येण्यासाठी ब्लॅडर ट्रेनिंग महत्त्वाचे आहे. यामुळे काही प्रमाणात तरी मूत्रप्रवृत्ती कंट्रोल करणे शक्य होते. औषधोपचार केले जातात पण जीवनशैलीत बदल करणे आवश्यक असते.

यामध्ये पेल्विक फ्लोअर व्यायाम शिकवले जातात. याला केगल एक्सरसाइज म्हणतात.

कॅफीन आणि अल्कोहोल अशा व्यसनापासून दूर रहावे.

चुकीच्या पद्धतीने डाएट करुन वजन घटवणे हे सुद्धा या सिंड्रोमचे एक कारण आहे.

काही वेळा डॉक्टर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देतात.

अतिसक्रीय मूत्राशय व त्यामुळे होणारी गुंतागुंत

वाढत्या वयानुसार ब्लॅडर वरील कंट्रोल जातो. त्याचप्रमाणे वय वाढले की प्रोस्टेटचा आकार वाढतो.
डायबिटीस सारखा आजार असेल तर मूत्रप्रवृत्ती वारंवार होण्याचा त्रास अजूनच वाढतो.

नर्व्हस सिस्टिमचे आजार असतील तर ब्लॅडर वर नियंत्रण रहात नाही. लकवा, मेंदूचे आजार उदा. अल्झायमर यात अतिसक्रीय मूत्राशय सिंड्रोम दिसून येतो.

जीवनशैली बदलणे हा यावरचा सर्वात चांगला उपाय आहे. ठराविक वेळी ब्लॅडर रिकामे करण्याची सवय लावणे,
नियमित वेळी मलमूत्रत्याग करणे , दिवसभराचे वेळापत्रक ठरवून त्यानुसार द्रवपदार्थ सेवन करणे व बाहेर जाताना किंवा प्रवास करताना डायपर्स वापरणे अशी काळजी घेतली तर निश्चितपणे फरक पडतो.

हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करुन सांगा.

लाईक व शेअर करा आणि उपयुक्त माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!