माणसं जोडावी कशी? …. (भाग २)

माणसं जोडावी कशी?

अनेकदा प्रश्न तत्वाचा आहे, असं गोंडस नाव देऊन तावातावाने तलवारी परजल्या जातात, शेवटी जिंकत कोणीच नाही, मनावर जखमा होवुन, मैत्रीचा मात्र नाहक बळी जातो.

श्रेयाचा मोह बरा नव्हे!

लेखकाने ‘माणसं कशी जोडावी?’ पुस्तकामध्ये एक गंमतीशीर प्रसंग सांगितला आहे, देवआनंद स्वभावाने मितभाषी, सालस, गुणी होता, बोलताना मोजुन मापुन बोलायचा, सर्वांशी आब राखुन वागायचा.

दिग्दर्शक नासिर हुसेन त्याला घेऊन तिसरी मंजिल चित्रपट बनवणार होते, तेव्हाची गोष्ट आहे, एका मुलाखतीत पत्रकाराने देव आनंदला विचारले, “चित्रपट कुणामुळे चालतो?” देवानंद सहज बोलुन गेला, अर्थात स्टारमुळे चित्रपट चालतो, निर्माता नासिर हुसेन तिथेचं उपस्थित होता, त्याने हे ऐकलं, “म्हणजे निर्माते-दिग्दर्शकाला काहीचं महत्व नाही तर? “देवानंद, हे तुझं वाक्य मी खोटं सिद्ध करुन दाखवेन, असं आव्हान त्यांनी घेतलं, नवख्या शम्मी कपुरला संधी देऊन त्यांनी ‘तिसरी मंजिल’ बनवला, आणि सुपरहिट करुन दाखवला.

एका क्षुल्लक गोष्टीमुळे दोन घनिष्ट मित्रांमध्ये कायमचा दुरावा निर्माण झाला, असे छोटेमोठे अडचणीचे प्रसंग आपल्याही आयुष्यातही रोज येतात, “मी केलं, माझ्यामुळे झालं”, म्हणायला उशीर की केलेली सगळी मेहनत पाण्यात जाते, व जवळचे दुखावतात.

त्यामुळे यशामध्ये सर्वांना श्रेय द्यायला हवं, अपयशाची जबाबदरी घेण्याची सुरुवात स्वतःपासुन करावी, माणसं जोडण्यासाठी ही एक आवश्यक गोष्ट आहे.

कधीकधी आपला मुद्दा चुकला असं लक्षात येऊनही ‘इगो’ पायी लढाई खेचली जाते, काही मिनीटे गप्प राहील्यास मोठे वाद टळतात. ‘तुझं चुक की माझं चुक’ हे महत्वाचं नाही, ‘काय चुक आणि काय बरोबर’ हे जास्त महत्वाचं! कमी आणि मोजकं बोलण्याने वाद टळतात, अतिबडबडे लोक वाद अंगावर ओढवुन घेतात.

ऐकुन तर घ्या.

आपल्यांशी संवाद होवु शकतो, नवख्या आणि अनोळखी लोकांशी निखळ संभाषण होवु शकते, लेखकाच्या मते हा मजेशीर खेळ आहे, आणि ह्या खेळाचे नियम पाळल्यास ‘बोलण्याची नॅक’ मस्त जमते.

संभाषणामध्ये पुर्णतः खाजगी अशा गोष्टींचा उल्लेख कटाक्षाने टाळा, बायको, मुले ह्या वैयक्तीक संदर्भामुळे गप्पांचा सुर हरपतो.

फक्त बोलत राहु नका, दुसर्‍यांचं सुद्धा ऐका, जेव्हा बळजबरीने बोलण्याची सुत्र तुम्ही आपल्या ताब्यात घेता, तेव्हा तुम्ही विरुद्ध इतर असं वातावरण आपोआप तयार होतं!

मुद्दे खोडु नका, संवादाऐवजी वादविवाद सुरु होतो, सहमत नसाल तर स्मितहास्य बाळगत, खुबीने सहमतीच्या मुद्द्यांकडे संभाषण वळवा.

समोरचा बोलत असताना, मध्येच त्याला अडवु नका, तोडु नका, आणि प्रत्येक वाक्याला प्रतिक्रीया द्यायलाच हवी असंही नाही, कारण बोलणं म्हणजे ‘बॅडमिंटन’ नव्हे.

छान रंगलेल्या गप्पांमध्ये, केवळ तुम्हाला आठवलं म्हणुन विषय बदलु नका, गप्पांचा बेरंग होतो, गप्पा म्हणजे टि.व्ही. नव्हे, रिमोट हातात घेऊन चॅनेल बदलु नका.

समोरच्या व्यक्तीला तुम्ही उत्सुकतेनं, लक्षपुर्वक ऐकलं, तरच संभाषण रंगते.

संभाषणात टोकाची मते व्यक्त करुन न्यायाधिश बनु नका.

संभाषणात तुम्ही ‘किती बोलता’, यापेक्षा ‘कसं बोलता’ हे जास्त महत्वाचं आहे. आत्मविश्वासाने बोलणार्‍याला आदर मिळतो, उतावळे लोक प्रभाव टाकण्यासाठी धडपडत राहतात.

विक्रीकलेमध्ये सुद्धा ग्राहकाला जास्तीत जास्त बोलतं करणं, आणि आपलसं करणं, हे हमखास यशाचं तंत्र आहे.

छान रंगलेल्या गप्पांमध्ये, केवळ तुम्हाला आठवलं म्हणुन विषय बदलु नका, गप्पांचा बेरंग होतो, गप्पा म्हणजे टि.व्ही. नव्हे, रिमोट हातात घेऊन चॅनेल बदलु नका.

वादविवाद टाळा.

अगदी काही वर्षांपुर्वीपर्यंत मी एक गोष्ट अनुभवली, माझे जवळच्यांशी, परिचितांशी अतिशय लवकर घनिष्ट संबंध बनायचे, जीवाला जीव लावणारे, मस्त सुर जुळायचे आणि पुढे थोड्याच दिवसात कुठल्याशा क्षुल्लकशा गोष्टीमुळे वाद व्हायचा, आणि प्रेम, मैत्री एकदम खतम! आयुष्यभरासाठी कट्टी फु! माझ्या एग्रेसिव्ह स्वभावामुळे मी अनेक बहुमुल्य मित्र गमवल्यावर मला माझी चुक कळाली, आणि एकदाची अक्कल आली.

कधीकधी आपला मुद्दा चुकला असं लक्षात येऊनही ‘इगो’ पायी लढाई खेचली जाते, काही मिनीटे गप्प राहील्यास मोठे वाद टळतात.

‘तुझं चुक की माझं चुक’ हे महत्वाचं नाही, ‘काय चुक आणि काय बरोबर’ हे जास्त महत्वाचं! कमी आणि मोजकं बोलण्याने वाद टळतात, अतिबडबडे लोक वाद अंगावर ओढवुन घेतात.

टीका शक्यतो टाळा.

ह्यासाठी मी ‘स्टॉप, बिफोर यु स्टार्ट’ हे तंत्र वापरलं, एखादी गोष्ट नाही आवडली, सहन नाही झाली, टिका करावीशी वाटली, तर आज नको उद्या करुया! एवढा विचार करुन तो क्षण निभवायचा, काळाच्या ओघात मनातली अस्वस्थता निघुन जाते, भांडणही टळते.

कौतुक करताना सढळ हाताने करा, टिका करताना कंजुष बना!

तक्रार करताना जपुन!

दुसर्‍यांचं नेमकं काय चुकतंय ते आपल्याला एकदम बरोबर कळतं, पण आपल्या सगळ्यांनाच स्वतःच्या चुका दिसत नाहीत. हा मनुष्यस्वभाव आहे.

“मी तोंडावर स्पष्ट बोलतो”, अशी सडेतोड प्रतिमा फक्त तुम्हालाच समाधान देते, कटु बोललेलं लोकांना आवडत नाही, हेचं खरं!

चला, कधीकधी तुम्ही शंभर टक्के बरोब्बर असालही, एखाद्याचा अपमान करायची तुम्हाला संधीही मिळेल, पण त्या क्षणिक आसुरी समाधानासाठी ‘किंमती’ माणुस का तोडायचा?

एखाद्याशी तक्रार करायचीच असल्यास त्याचीही एक पद्धती आहे, संभाषणाची सुरुवात त्याच्या चांगल्या गुणांनी, गोष्टीने करावी, आपली छोटीशी तक्रार मृदु, सौम्य भाषेत एकदम थोडक्यात करावी, शेवटी आभार मानावेत, व निर्णय त्याच्या विवेकबुद्धीवर सोपवुन मोकळे व्हावे. मनानेही ओझे फेकुन स्वच्छ रहावे.

आधी बोलुन तर पहा!

प्रोफेशनल प्रॅक्टीसमध्ये असे कित्येक प्रसंग आले, की जेव्हा गंभीर समस्या फक्त ‘पॉझीटीव्ह एप्रोच’ बोलण्याने चुटकीसरशी सुटल्या.

एका बांधकाम कॉन्ट्रॅक्टमध्ये माझे आणि मालकाचे फालतु गोष्टींवरुन सारखे खटके उडत होते, दोनतीनदा असे झाल्यावर मी मनमोकळेपणाने, न बोलवता, एका रात्री त्यांच्या घरी गेलो, आम्ही तास दोन तास वेगवेगळ्या विषयांवर हलक्याफुलक्या गप्पा मारल्या, कटुता दुर झाली, निघताना मी माझ्या अडचणी त्यांच्या कानावर घातल्या, आणि चांगल्या क्वालीटीबद्द्ल आश्वस्त केले, त्यांचेही समाधान झाले आणि पुढचे काम निर्विघ्न पार पडले.

करीअरच्या सुरुवातीला बरेच लोक काम करुन घ्यायचे, मी विश्वासाने, पैशाच्या अपेक्षेने मनापसुन काम करायचो आणि काम झाल्यावर लोकं प्रॉमिस केलेले पैसे थकवायचे, बराचद्या रक्कम मोठी होती, तेव्हा मी बैचेन व्हायचो, चिडचिड, राग, शिव्या मनात यायच्या, पण मी अशा अडचणीच्या प्रत्येक वेळी मी थोडे धैर्य दाखवले, फोन करुन अनेकदा नम्रपणे पैसे मागायचो, बहुतांश वेळा उशिराने का होईना, वसुली झालीच!

एका लग्नामध्ये नवरदेवाचे टवाळखोर मित्र खुप कॉमेंट्स करत होते, बावरलेल्या नवववधुला त्याचा त्रास होत होता, ती रडु लागली, मला सहन झाले नाही, मी मुलीकडच्या बाजुने लग्नात उपस्थित होतो, पण थोडी हिंमत करुन मी भावजींना विनंतीच्या सुरात समस्या सांगीतली, त्यांनीही समजुतदारपणा दाखवला, काही वेळात टवाळखोरांचा उपद्रव एकदम बंद झाला. दिवसभर कार्य सुरळीत पार पडले.

शिक्के मारु नका!

प्रत्येक व्यक्तीला लेबल लावायची घाई करु नका, हा श्रीमंत दिसतोय, म्हणजे ह्याला पैशाची मस्ती असेल, तो रईसजादा आहे, बिघडलेला असेल, ह्याने बॉडी बिल्डींग केलीय, म्हणजे स्टीरॉईड घेत असणार! असे विचार माणसं जोडायला बाधा ठरतात.

नाउमेद करु नका!

एखादा नवखा व्यक्ती संपर्कात आल्यास त्याला प्रोत्साहन द्यावं, की भय दाखवुन नाउमेद करावं? प्रोत्साहन देणारे प्रचंड लोकप्रिय होतात, नेहमी त्यांच्याभोवती लोकांचा गराडा पडतो, क्षमतांबद्दल शंका घेणारे मात्र एकटे एकटे पडतात.

नकार हा नम्रच हवा!

“नको” ‘नाही’, म्हणण्याने समोरचा दुखावला जावाच का? अशा वेळी एक युक्ती करावी, कमीपणा आपल्याकडे घ्यावा, “मीच तुमच्यायोग्य नाही”, “माफ करा”, असे शब्द वापरत सुटका करुन घ्यावी.

आज बंद झालेला दरवाजा कायमचा बंद करु नये, उद्या साठी तो किलकिला का होईना, उघडा असण्यात आपलं भलं आहे.

प्रतिक्रिया नको, प्रतिसाद द्या!

प्रतिक्रिया देणारे उतावीळ लोक नेहमी वाटाघाटी हरतात, प्रतिसाद विचार करुन थंड डोक्याने दिला जातो.

आपण सगळेच मनाने चांगलेच असतो, ह्या एका सिद्धांतावर विश्वास ठेवल्यास जीवन जास्त आनंदी होते.

ह्यासाठी मी ‘स्टॉप, बिफोर यु स्टार्ट’ हे तंत्र वापरलं, एखादी गोष्ट नाही आवडली, सहन नाही झाली, टिका करावीशी वाटली, तर आज नको उद्या करुया! एवढा विचार करुन तो क्षण निभवायचा, काळाच्या ओघात मनातली अस्वस्थता निघुन जाते, भांडणही टळते.

धन्यवाद

(क्रमशः)

माणसं जोडावी कशी? …. (भाग १)

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

1 Response

  1. Amol says:

    मस्तच , अगदी वास्तवाला धरून लिखाण आहे ..! !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!