राजगिऱ्याच्या भाजीचे औषधी गुणधर्म तुम्हाला माहीत आहेत का? | राजगिरा भाजी रेसिपी

आरोग्यासाठी पालेभाज्या खाणे किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला माहीत आहेच. चौरस आहारात हिरव्या पालेभाज्या ताटात खुलून दिसतात. मेथी, मुळा, शेपू, पालक, लाल माठ अशा पालेभाज्या थंडीच्या दिवसात मुबलक प्रमाणात आढळतात.

या लेखातून आपण जाणून घेऊया राजगिऱ्याच्या भाजीचे औषधी गुणधर्म. ही एक पालेभाजी असून हिंदीत हिचे नाव चौलई आहे. तर इंग्रजी भाषेत हिला Amaranth असे म्हणतात.

दिसायला ही पालकासारखीच असून भारतात मुख्यत्वे हिमालयाच्या पायथ्याशी जास्त प्रमाणात आढळून येते. दक्षिण भारतातील किनारी भागात ही भाजी पिकवली जाते. हवामानातील फरकामुळे विविध प्रदेशांमध्ये हिचा रंग हिरवा, लाल, जांभळा, पिवळसर याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचा दिसतो.

राजगिऱ्याचे दाणे धान्य स्वरुपात वापरले जातात. अनेक वर्षांपासून यांचा आहारात वापर केला जातो. यातील आरोग्यदायक गुणांमुळे गेल्या काही वर्षांत ‘सुपर फूड’
म्हणून राजगिरा नावारुपाला आला आहे.

राजगिऱ्याच्या पानांमध्ये कोणते औषधी गुणधर्म आहेत?

गेल्या काही वर्षांत झालेल्या संशोधनातून असे निष्कर्ष समोर आले आहेत की राजगिऱ्याच्या पानांमध्ये भरपूर व्हिटॅमिन्स व न्यूट्रियंट्स आहेत. पोटॅशियम, फायबर यांचे मुबलक प्रमाण या पानांमध्ये आढळून येते. म्हणून विशेषतः हृदय विकारात यांचा उत्तम उपयोग होतो. राजगिऱ्याच्या बियांमध्ये ग्लुटेन विरहीत प्रोटीन्स असतात.

ही भाजी हिवाळ्यात भरपूर पिकवली जाते. भारतातील काही प्रांतात ‘साग’ बनविण्यासाठी राजगिऱ्याच्या पानांचा वापर केला जातो. सर्व पालेभाज्यांमध्ये हिचे गुण श्रेष्ठ आहेत. हिचे गुणधर्म पाहून या भाजीला आरोग्याचा खजिनाच म्हणता येईल!!!

राजगिरा भाजीची वैशिष्ट्ये

1) उच्च पोषणमूल्ये:

यातील ऍण्टिऑक्सिडंट्स व न्यूट्रियंट्स शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयोगी आहेत.

2) कमी कॅलरी

१०० ग्रॅम राजगिऱ्याच्या पानांमध्ये फक्त २३ कॅलरीज असतात. अतिशय कमी प्रमाणात फॅटस् व कोलेस्टेरॉल अजिबात नसल्याने ही भाजी वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी खूपच उपयुक्त आहे.

3) भरपूर प्रमाणात फायबर

फायबर युक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. त्यामुळे हृदय विकार तसेच स्थूलता या विकारांत फायदा होतो.

राजगिऱ्याच्या पानांमध्ये प्रोटीन व फायबर जास्त प्रमाणात असल्याने कोलेस्टेरॉल कमी होते. भूक नियंत्रणात रहाते व वजन कमी होते.

4) रक्त वाढविण्यासाठी उपयोगी

लाल रक्तपेशी निर्माण करण्यासाठी आयर्न आवश्यक आहे. तसेच चयापचय क्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी सुद्धा लोह महत्त्वाचे आहे.

राजगिऱ्या मध्ये Vitamine C असल्याने लोह रक्तात शोषले जाते.

किंवा या भाजीसोबत आहारात संत्र्याच्या रसाचा समावेश करावा.

5) प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयोगी

१०० ग्रॅम राजगिऱ्याची भाजी खाल्ली की आपल्या शरीराची ७० % Vitamin C ची दैनंदिन गरज पूर्ण होते.

हे पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन असून प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी तसेच जखमा भरून येण्यासाठी उपयुक्त आहे.

वातावरणातील फ्री रॅडीकल्सपासून कॅन्सरची शक्यता असते तसेच यांच्यामुळे म्हातारपण लवकर येते. या फ्री रॅडीकल्सचा वाईट परिणाम होऊ नये म्हणून आहारात राजगिऱ्याचा समावेश करावा.

6) Vitamine A चे फायदे मिळतात

यात बीटा कॅरोटीन, ल्यूटीन व इतर अनेक ऍण्टिऑक्सिडंट्स असतात. यांच्यामुळे फ्री रॅडीकल्सपासून होणारे वाईट परिणाम टाळता येतात. Vitamin A त्वचेचे आरोग्य सुधारते तसेच डोळ्यांसाठी उपयुक्त आहे.

6) Vitamine K मुबलक प्रमाणात आढळतात

हिरव्या पालेभाज्यांमध्ये राजगिऱ्याच्या पानांमध्ये Vitamine K चे प्रमाण सर्वाधिक आहे. हाडांच्या आरोग्यासाठी तसेच रक्त गोठविण्यासाठी व्हिटॅमिन के महत्त्वाचे आहे.

मेंदूच्या पेशींकरीता सुद्धा हे लाभदायक आहे त्यामुळे अल्झायमर मधे उपयुक्त आहे.

7) Vitamine B ची उपलब्धता

Vit B मधे B1, B2, B6 अशी अनेक व्हिटॅमिन असतात. ही सर्व राजगिऱ्यामध्ये आढळून येतात. त्यामुळे गर्भातील जन्मजात विकृती टाळण्यासाठी तसेच मानसिक व शारीरिक स्वास्थ्य चांगले राखण्यासाठी या पानांचे सेवन करावे.

8) पोटॅशियम

पोटॅशियम हृदयाचे आरोग्य सुधारते. पेशींमधील द्रवभागाचे संतुलन राखण्यासाठी देखील हे आवश्यक आहे. हृदयाची गती नियंत्रणात ठेवण्यासाठी राजगिऱ्याच्या भाजीचा उपयोग होतो.

9) ग्लुटेन फ्री

राजगिऱ्याच्या बिया धान्य म्हणून वापरल्या जातात. यांच्यापासून पीठ बनवले जाते. ते ग्लुटेन विरहीत असल्याने ग्लुटेन पचवू शकत नाहीत अशा व्यक्तींना लाभदायक आहे.

10) प्रोटीनचा उत्कृष्ट स्त्रोत

राजगिऱ्याची पाने तसेच बियांमध्ये प्रोटीन्स असतात. ओट्स पेक्षाही जास्त प्रोटीन्स राजगिऱ्यामध्ये आढळून येतात.

शाकाहारी अन्नपदार्थांपासून मिळणारे प्रोटीन हे प्राणीज प्रथिनांपेक्षा उत्तम प्रतिचे असते. कारण प्राणीज प्रथिनांमधे फॅटस् व कोलेस्टेरॉल असते. राजगिऱ्याच्या पानांमध्ये भरपूर प्रोटीन्स असल्याने पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे सतत खावेसे वाटत नाही. रक्तातील इन्सुलिन कमी होते त्यामुळे भुकेची जाणीव होत नाही.

11) लायसिन

राजगिऱ्याच्या पानांमध्ये लायसिन नावाचे अमिनो ऍसिड असते. याचा उपयोग कॅल्शियमचे शोषण करण्यासाठी तसेच शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी होतो.

त्वचा व केस निरोगी राहण्यासाठी लायसिन महत्त्वाचे आहे. केसगळती व अकाली केस पांढरे होणे याकरिता आहारात राजगिऱ्याचा समावेश करावा.

12) कोलेस्टेरॉल वर परीणाम करते

शरीरातील अनावश्यक (bad cholesterol) घटवते आणि हार्ट डिसीझ चा धोका कमी होतो.

13) कॅल्शियमचा पुरवठा

कॅल्शियमची मात्रा कमी झाली तर हाडांचे आरोग्य धोक्यात येते. हाडांची झीज, वेदना होणे, हाडे ठिसूळ होणे अशा समस्या असतील तर राजगिरा उत्तम प्रकारे कॅल्शियमचा पुरवठा करतो.

14) पचनासाठी सुलभ

मोठ्या आजारातून उठलेल्या व्यक्ती किंवा उपवास करणाऱ्यांना ही भाजी आवर्जून देतात. कारण अशा व्यक्तींची पचनसंस्था नाजूक झालेली असते. शौचातून रक्त पडणे, जुलाब यात देखील राजगिऱ्याच्या पानांचा चांगला उपयोग होतो. मलावरोध दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.

राजगिऱ्या पासून कोणते पदार्थ बनवता येतात?

भारतात राजगिऱ्याची लाल रंगाची भाजी जास्त प्रमाणात वापरली जाते. कांदा, लसूण वापरून याची भाजी बनवली जाते.

उत्तर भारतात याला लाल साग किंवा चौलई का साग म्हणतात. मसूर सोबत ही भाजी शिजवून पातळ भाजी किंवा आमटी म्हणून वापरतात. याला दाल साग म्हणतात. भात किंवा रोटी सोबत हे खाल्ले जाते.

आंध्र प्रदेशात मूगडाळ किंवा तूरडाळी सोबत राजगिऱ्याची पाने शिजवून घेतात. याचाच अजून एक प्रकार म्हणजे पानांना बेसन लावून केलेली करी अथवा दाटसर भाजी.

केरळमध्ये बारीक चिरलेली राजगिऱ्याची पाने, खोबरे, कढीपत्ता, मिरच्या वापरून चीरा थोरन नावाचा पदार्थ बनवतात.

तामिळनाडू मध्ये ही भाजी भातासोबत खातात.

राजगिऱ्याचे कोवळे रोप सॅलड, ज्यूस यात वापरतात. चीनमध्ये याचे सूप बनवतात तसेच तव्यावर परतून ही कोवळी पाने साईड डीश म्हणून वापरतात. ग्रीसमध्ये सॅलडच्या स्वरूपात ही पाने वापरतात.

यात व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल व लिंबाचा रस घालून याची चव आणि औषधी गुणधर्म वाढवले जातात.

सारांश

राजगिऱ्याच्या पानांमध्ये औषधी गुणांचे भांडार आहे. शरीरातील सर्व अवयवांना यापासून फायदा होतो. प्रोटीन, कॅल्शिअम, आयर्न , कॉपर, व्हिटॅमिन्स, मॅग्नेशियम, मॅंगेनीज, झिंक यांनी परीपूर्ण अशी ही भाजी सुपर फूड म्हणून ओळखली जाते.

कॉपर व मॅंगेनीजमुळे शरीराला ऍण्टिऑक्सिडंट्सचे सर्व फायदे मिळतात. कॉपर मुळे लाल रक्तपेशी निर्माण होतात. झिंक शरीराची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी उपयोगी पडते. पचनसंस्थेचे आरोग्य आणि शरीरवृद्धी यासाठी झिंक हा महत्त्वाचा घटक आहे.

या हिवाळ्यात मुबलक प्रमाणात ही भाजी आणून वेगवेगळ्या रेसिपी बनवा. आरोग्यदायी खाण्याचा आनंद घ्या.

तुम्ही ही भाजी कशी बनवता हे नक्की शेअर करा.

हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करुन सांगा.

लाईक व शेअर करायला विसरू नका.

Manachetalks

रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे या पुस्तकाची अनुक्रमणिका खाली दिलेली आहे.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय