शेवग्याच्या पानांचे औषधी गुणधर्म जाणून घ्या या लेखातून

सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: शेवग्याच्या शेंगाचे फायदे काय । शेवग्याच्या पानांची भाजी । शेवग्याच्या शेंगाच नव्हे पानं आहेत बहुगुणी । शेवगा पानांचे आरोग्यवर्धक गुणधर्म । शेवगा पानांच्या पावडरचे (मोरिंगा पावडर) फायदे काय आहेत । शेवग्याच्या पानांची भाजी फायदे

शेवग्याच्या झाडाला इंग्रजी भाषेत ‘मोरिंगा ट्री’ किंवा ‘ड्रमस्टिक ट्री’ असे म्हणतात.

याचेच अजून एक नाव आहे ‘ मिरॅकल ट्री ‘.

अगदी नावाप्रमाणेच आश्चर्यकारक गुणधर्म असलेल्या या झाडाची अधिक माहिती जाणून घेऊया.

शेवग्याचे झाड बहुगुणी तर आहेच पण याचे सर्वच भाग औषधी गुणधर्म युक्त आहेत.

पाने, साल, शेंगा, मुळे, फुले, बिया, तेल असे याचे वेगवेगळे भाग उपयोगात आणले जातात. शेवग्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात. यांचा विविध आजारांत उपयोग होतो.

शेवग्याचे झाड आशिया, आफ्रिका व दक्षिण अमेरिकेत मोठ्या प्रमाणात आढळून येते.

शेवग्याची पाने म्हणजे औषधी गुणांची खाणच!!!

शेवग्याच्या पानांमध्ये उच्च प्रतिची पोषणमूल्ये आहेत. सर्वसाधारणपणे गाजर, संत्रे आणि दूध यांना पौष्टिक आहार म्हटले जाते.

पण तुलनात्मक अभ्यास केला तर लक्षात येते की शेवग्याची पाने यांच्यापेक्षाही जास्त आरोग्यदायक आहेत.

पारंपारिक भारतीय आहारात अनेक रेसिपीज मध्ये शेवग्याच्या पानांचा वापर केला जातो. या पानांची एक खासियत म्हणजे ती विविध प्रकारे वापरता येतात.

पानांचा ज्यूस, भाजी किंवा थालिपीठ, डोसे यात मिक्स करून कित्येक रुचकर आणि पौष्टिक पदार्थ आपण बनवू शकतो.

नैसर्गिक स्वरूपात ही पाने वापरली तर त्यांचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही.

शेवग्याच्या पानांचे आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊया.

१. यात व्हिटॅमिन्स व मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. Vitamine A, Vitamine C, Vitamine B1, Vitamine B2, Vitamine B3, Vitamine B6, आणि फोलेट तसेच मॅग्नेशियम, फॉस्फरस, झिंक, आयर्न व कॅल्शियम यांनी समृद्ध असलेली ही पाने म्हणजे आरोग्यदायी खजिनाच आहेत !!!

२. अमिनो ऍसिड

यात अठरा प्रकारची अमिनो ऍसिड असतात ज्यापासून प्रोटीन निर्माण होते. यातील प्रत्येक अमिनो ऍसिड आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त आहे.

३. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी

प्रतिकारशक्ती कमी झाली की कॅन्सर, संधीवात, आमवात तसेच इतर अनेक आजार शरीरावर हल्ला करतात. शेवग्याच्या पानांमुळे इम्युनिटी वाढते.

चुकीच्या जीवनशैलीमुळे प्रतिकारशक्ती कमी होते. व अनेक दीर्घकालीन आजार होतात. आपल्या आहारात नियमितपणे शेवग्याच्या पानांचा समावेश करणे म्हणजे शरीराला रोगांविरुद्ध लढण्यासाठी ताकदवान बनवणे!!!

४. ऍण्टिऑक्सिडंट्स

वातावरणातील फ्री रॅडीकल्स मुळे डायबिटीस, हृदयरोग, कॅन्सर, अल्झायमर असे आजार होतात. शेवग्याच्या पानांचे औषधी गुणधर्म या फ्री रॅडीकल्सचा धोकादायक परिणाम कमी करतात.

या पानांमधील Vitamine C आणि बीटा कॅरोटीन फ्री रॅडीकल्सपासून संरक्षण पुरवते.

शेवग्याच्या पानांमध्ये असलेल्या ऍण्टिऑक्सिडंट्समुळे ब्लडप्रेशर व रक्तातील साखरेचे नियंत्रण केले जाते.

एका संशोधनातून असे दिसून आले आहे की तीन महिने पर्यंत रोज दीड चमचा या प्रमाणात मोरिंगा पावडर घेणाऱ्या स्त्रियांमध्ये रक्तातील ऍण्टिऑक्सिडंट्सचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते.

५. रक्तातील साखरेचे नियंत्रण

दीर्घ काळ डायबिटीस असेल तर हृदय विकार होण्याची शक्यता वाढते आणि इतर महत्त्वाच्या अवयवांची कार्यक्षमता कमी होते.

म्हणून डायबिटीस वर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारात शेवग्याच्या पानांचा समावेश करावा. यातील आयसोथायोसायनेट्स मुळे रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर रहाण्यासाठी मदत होते.

६. कोलेस्टेरॉल नियंत्रण

ओट्स, अळशी व बदामाप्रमाणेच मोरिंगा पाने, वाढलेली कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतात. कोलेस्टेरॉल मुळे हृदयाच्या कार्यात अडथळा निर्माण होतो.

गर्भावस्थेतही कोलेस्टेरॉल वाढलेले दिसते. त्यामुळे गरोदरपणातील डायबिटीस होण्याची शक्यता असते. यामुळे खूपच गुंतागुंत होऊन आई व बाळ दोघांनाही धोका संभवतो.

यासाठी शेवग्याच्या पानांचा आहारात वापर करणे लाभदायक आहे.

७. यकृत विकार

टीबीच्या औषधांचा साईड इफेक्ट कमी करण्यासाठी शेवग्याच्या पानांचा वापर करावा. यकृताद्वारे रक्त शुद्धीकरण, फॅट मेटॅबॉलिझम, पोषक द्रव्ये शोषून घेणे अशी अनेक महत्त्वाची कामे केली जातात.

यासाठी लिव्हर मधील एन्झाईम्स उत्तम प्रकारे कार्यरत असली पाहिजेत. शेवग्याच्या पानांमध्ये या एन्झाईम्सना सशक्त करण्याचे गुणधर्म आहेत.

यकृताच्या पेशींची झीज भरून काढण्यासाठी ही पाने खूपच उपयुक्त आहेत.

८. आर्सेनिकचे विषारी परिणाम कमी करण्यासाठी

जगभरात आर्सेनिकचे शरीरावर होणारे दुष्परिणाम अभ्यासले जात आहेत. अनेक खाद्यपदार्थ, विशेषतः तांदळामधून आर्सेनिकचे अंश शरीरात प्रवेश करतात. व साठून रहातात. त्यामुळे हार्ट ॲटॅक, कॅन्सर असे रोग होतात.

प्रयोगशाळेत प्राण्यांवर केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की शेवग्याची पाने आर्सेनिकचे विषारी परिणाम कमी करतात.

९. पचनासाठी उत्तम

अपचन, ऍसिडीटी, गॅस, अल्सर, मलावरोध, जुलाब अशा पोटाच्या विकारावर शेवग्याच्या पानांचा चांगला उपयोग होतो. यातील उच्च प्रतीचे Vitamine B पचनासाठी उपयुक्त आहे. आणि या पानांचे जीवाणू व जंतुप्रतिबंधक गुणधर्म पोटाच्या इन्फेक्शन पासून संरक्षण करतात.

१०. हाडांना बळकटी येते

यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम व फॉस्फरस असते. त्यामुळे संधीवात, हाडांची झीज होणे या विकारात उपयुक्त आहेत.

ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडे ठिसूळ होणे. यातही शेवग्याच्या पानांचा उत्तम उपयोग होतो. दातांना बळकटी येण्यासाठी देखील ही उपयोगी आहेत.

११. जखमा भरून येण्यासाठी

यात ऍण्टिसेप्टीक गुणधर्म आहेत. त्यामुळे विविध बॅक्टेरीयांशी लढण्यासाठी शरीराला ताकद मिळते.

कापणे,भाजणे तसेच लहानमोठ्या जखमा भरून काढण्यासाठी या पानांचा उपयोग होतो. यांच्यामध्ये रक्त गोठवण्याची क्षमता असल्याने जखमा लवकर भरून निघतात.

१२. प्रसूतीनंतर आईला दूध भरपूर येण्यासाठी

आयुर्वेदानुसार प्रसूतीनंतर स्तनांतील दुधाचे प्रमाण वाढविण्यासाठी शेवग्याच्या पानांचा आहारात समावेश करावा. या पानांमध्ये भरपूर प्रोटीन्स असतात.

इतर व्हिटॅमिन्स व पोषणमूल्ये असल्याने या पानांचे सेवन करणे आई व बाळ दोघांनाही फायद्याचे ठरते.

१३. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी

शरीरातील फॅटस् जाळण्यासाठी ही पाने मदत करतात. त्यामुळे थकवा न येता वजन कमी होते. त्यामुळे अशक्तपणा जाणवत नाही. उत्साह व एनर्जी लेव्हल टिकून रहाते.

खाण्याची अनावर इच्छा होणे म्हणजे फूड क्रेव्हिंग, शेवग्याच्या पानांमुळे यावर नियंत्रण येते. सतत खावेसे वाटत नाही.

चयापचय क्रिया सुधारते आणि कोलेस्टेरॉल कमी होते. याचा एकत्रित परिणाम म्हणून वजन नियंत्रणात रहाते.

१४. त्वचा व केसांचे आरोग्य

शेवग्याच्या पानांमध्ये असलेल्या पोषणमूल्यांमुळे त्वचा व केस निरोगी होतात. त्यावर नैसर्गिक चमक येते.

यातील ३० प्रकारच्या ऍण्टिऑक्सिडंट्समुळे त्वचेवरील सुरकुत्या, डाग कमी होतात व तारुण्य टिकून राहते. केसात कोंडा होणे तसेच निर्जीव, रुक्ष, तुटलेल्या केसांची निगा राखण्यासाठी शेवग्याच्या पानांची पेस्ट डोक्याला लावावी.

यामुळे केस चमकदार, मुलायम व भरगच्च दिसतात. केसांची मुळे मजबूत करण्यासाठी हा उत्तम उपाय आहे.

पिंपल्ससाठी सुद्धा मोरिंगा पाने खूपच उपयुक्त आहेत. म्हणूनच अनेक सौंदर्य प्रसाधने बनवताना यांचा वापर केला जातो. शरीर डिटॉक्स करण्यासाठी यांचा उपयोग करावा.

१५. नर्व्हस सिस्टिमचे आरोग्य सुधारते

यातील Vitam8ne E व Vitamine C मुळे अनेक प्रकारचे मेंदूचे रोग बरे होण्यासाठी मदत होते. मायग्रेन, जुनाट डोकेदुखी असलेल्या व्यक्तींनी यांचा आहारात जरुर लाभ घ्यावा.

सेराटोनिन, डोपामिन हे हार्मोन्स मूड ठीक ठेवण्यासाठी उपयोगी आहेत. शेवग्याच्या पानांमध्ये या हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी आवश्यक घटक आहेत. तसेच मेमरी (स्मृती) व मेंदूची प्रतिक्रिया यांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी शेवग्याच्या औषधी गुणधर्मांचा उपयोग होतो.

१६. बॉडी डिटॉक्स अर्थात शरीरशुद्धी

शरीरांतर्गत साठलेली अशुद्धी, विषद्रव्ये ही कोणताही आजार होण्याचे मूळ कारण आहे. त्यामुळे शरीराची अंतर्गत सफाई करणे, प्रतिकारशक्ती वाढविणे व एनर्जी लेव्हल चांगली ठेवण्यासाठी शेवग्याच्या पानांचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

जरी शेवग्याच्या पानांमध्ये अनेक आश्चर्यकारक गुणधर्म असले तरीही यांचा अतिरेक करणे टाळावे.

अन्यथा काही साईड इफेक्ट्स होऊ शकतात. ही पाने अतिप्रमाणात सेवन केली तर जुलाब होतात.

गरोदरपणात या झाडाची साल, मुळे व रस यामुळे गर्भाशय संकुचित होऊन गर्भपाताचा धोका संभवतो. म्हणून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

याचप्रमाणे स्तनपान देणाऱ्या मातांनी सुद्धा काळजी घ्यावी. या पानांवर काही केमिकल फवारणी केली असेल तर ती रक्तप्रवाहात मिसळून दुधातून बाळाच्या शरीरात जाऊ शकतात.

ही पाने व त्यांची पावडर खरेदी करताना भेसळ नसल्याची खात्री करून घ्यावी. यासाठी नामांकित ब्रॅण्ड ची प्रॉडक्ट्स वापरावीत.

ज्या व्यक्तींना रक्त पातळ करण्यासाठी औषधे दिली जातात त्यांनी वैद्यकीय सल्ला घेऊनच या पानांचे सेवन करावे.

डायबिटीस, ब्लडप्रेशर, थायरॉईड व लिव्हर संबंधित आजार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांशी चर्चा करुनच या पानांचा उपयोग करावा.

कोणताही रोग नसलेल्या व्यक्तीला नैसर्गिक स्वरूपातील पानांचा आहारात भाजी किंवा इतर पदार्थ बनवून वापर करण्यास हरकत नाही.

हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करुन सांगा. तुम्ही शेवग्याच्या कोणत्या रेसिपीज बनवता हे शेयर करा.

लेख आवडला तर लाईक करा आणि उपयुक्त माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा.

असेच मनाचेTalks चे विविध लेख तुम्ही ऍमेझॉन किंडल वर जाहिरातींविना वाचू शकाल.

रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “शेवग्याच्या पानांचे औषधी गुणधर्म जाणून घ्या या लेखातून”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय