वयात येणाऱ्या मुला-मुलींच्या पालकांची जबाबदारी समजून घेऊया!!

vayat yetana

सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: muli vayat kadhi yetat | वयात येणाऱ्या मुला-मुलींच्या पालकांची जबाबदारी काय | 

मुलं वयात येण्याचं एक ठराविक वय असतं. मुलींमध्ये हे वय ९ ते १५ वर्षे तर मुलांमध्ये ९ ते १४ वर्षे आहे. या काळात मुलांच्या शरीरात काही बदल होऊ लागतात.

तारुण्याच्या खुणा उमटू लागतात. ही प्रक्रिया अगदी नैसर्गिकरीत्या घडून येते. पण काही वेळा हे वय उलटून गेले तरी यौवनावस्थेत प्रवेश केल्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. या अवस्थेला डिलेड प्युबर्टी असे म्हणतात.

या लेखातून जाणून घेऊया उशीराने वयात येण्याची कारणे व लक्षणे. सर्व पालकांना आपल्या मुलांमध्ये योग्य वयात योग्य वाढीची लक्षणं दिसतात की नाही याची काळजी असतेच.

त्यामुळे अशी काही शंका येत असेल तर वेळीच सावध होणे गरजेचे आहे. त्यामुळे लगेच उपचार करणे शक्य होते व भविष्यात येणाऱ्या समस्या टाळता येतात.

किशोरावस्थेत होणारे शारीरिक बदल

मुलींमध्ये स्तनांची वाढ होऊ लागते. तर मुलांमध्ये वृषणाचा (testicles) आकार वाढतो. साधारणपणे २.५ ते ४ सेमी पर्यंत वाढ दिसते.

डिलेड प्युबर्टीची लक्षणे

मुलांमध्ये दिसणारी डिलेड प्युबर्टीची लक्षणे

वयाच्या १४ वर्षांनंतरही वृषणाची वाढ न होणे.

१५ वर्षांनंतर जननांगावर केस न येणे.

मुलींमध्ये दिसणारी डिलेड प्युबर्टीची लक्षणे

वयाच्या १२ वर्षानंतर स्तनांची वाढ न होणे.

स्तनांचा विकास सुरु होणे ते पहिली मासिक पाळी येणे या दरम्यान ५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी असणे.

१५ वर्षांनंतर सुद्धा मासिक पाळी सुरु न होणे.

डिलेड प्युबर्टीची कारणे

याची निश्चित कारणे कोणती हे सांगणे कठीण आहे. काही वेळा ‘आनुवंशिकता’ हे यामागचे कारण असते. मुलींपेक्षा मुलग्यांमथे ही लक्षणे जास्त प्रमाणात दिसून येतात.

डिलेड प्युबर्टीची सामान्यतः खालील कारणे आढळतात

  • काही दीर्घकालीन आजार जसे की डायबिटीस, किडणी रोग, सिस्टीक फायब्रोसिस
  • कुपोषण
  • आनुवंशिकता
  • अंडाशय, वृषण, थायरॉईड किंवा पिट्यूटरी ग्रंथीचे विकार
  • यौन‌ विकास ( pubertal growth ) संबंधित आजार

डिलेड प्युबर्टी मधे केल्या जाणाऱ्या टेस्ट

सर्वप्रथम फॅमिली हिस्ट्री विचारात घेतली जाते. यात आई, वडील किंवा इतर जवळच्या नात्यातील एखाद्या व्यक्तीला अशी समस्या होती का याची माहिती डॉक्टर विचारतात.

अल्ट्रासाऊंड किंवा MRI करुन ग्रंथींचा आजार लक्षात येतो.

यावरील उपचार खालीलप्रमाणे आहेत.

  • ज्या रोगामुळे ही अवस्था निर्माण झाली आहे त्या मूळ आजारावर औषधोपचार करणे.
  • हार्मोन्स मधील असंतुलन ठीक होऊन प्युबर्टीची लक्षणे दिसेपर्यंत काही महिने ट्रिटमेंट दिली जाते.
  • काही वेळा चिंता, तणाव ही कारणेसुद्धा आढळून येतात. त्यावर समुपदेशन व इतर चिकित्सा केली जाते.

सारांश

मूल जन्माला आल्यापासून प्रत्येक टप्प्यावर योग्य प्रकारे वाढ होणे खूप गरजेचे आहे. जर याप्रमाणे लक्षणे दिसत नसली तर सावध होणे आवश्यक असते.

लागलीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार सुरू करावेत. अन्यथा ही समस्या वाढत जाते. फक्त शारीरिक नाही तर मानसिक स्तरावर याचे खोलवर परिणाम होतात. म्हणून योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करुन सांगा. अशीच अधिक माहिती घेण्यासाठी मनाचेTalks ला फॉलो करा.

असेच मनाचेTalks चे विविध लेख तुम्ही ऍमेझॉन किंडल वर जाहिरातींविना वाचू शकाल.

रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!