दोन फूट उंचीचा बुटका, जसा मोठा होत जातो तसा राजा काय पाऊल उचलतो? वाचा या जातक कथेत

सुंदर मराठी बोधकथा

मित्रांनो या लेखातून आम्ही एक जातक कथा तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. जीवनातील अनेक गहन रहस्ये सोप्या भाषेत उलगडून सांगणाऱ्या या गोष्टी खूपच रंजक आहेत.

भगवान बुद्धांनी या कथांमधून जनसामान्यांना समजेल अशा भाषेत शिकवण दिली आहे. हजारो वर्षांपासून या जातक कथा प्रचलित आहेत.

आपल्या आयुष्यात अनेक समस्या येतात पण त्या योग्य वेळी कशा सोडवाव्यात आणि चिंता व भीती पासून मुक्त कसे व्हावे हे सांगणारी ही कथा अतिशय बोधप्रद आहे.

एकदा एक राजा दूरच्या प्रवासाला निघाला होता. राज्यातील जनता त्याला निरोप देण्यासाठी एकत्र जमली होती.

काही गावकरी राजाजवळ येऊन त्याला म्हणाले की महाराज जेव्हा तुम्ही जवळच्या जंगलात प्रवेश कराल, तेव्हा तुम्हाला एक दोन फूट उंचीचा माणूस भेटेल.

तो तुम्हाला लढाईचे आव्हान देईल. त्याला ठार मारा आणि मगच पुढे जा. राजाने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व तो पुढे निघाला.

थोड्याच वेळात जंगल लागले. राजा काही अंतर कापून गेला आणि त्याच्या समोर दोन फूट उंचीचा एक माणूस उभा राहिला.

त्याने राजाचा रस्ता अडवला आणि त्याला युद्धासाठी पुकारले. आधी राजाने त्याला आपली वाट मोकळी करण्यास सांगितले. पण काही केल्या तो ऐकेना.

शेवटी त्याच्याशी लढाई करून राजाने त्याला सहज पराभूत केले. पण एवढ्या दुर्बल व्यक्तीला ठार मारणे त्याच्या मनाला पटेना. राजाने त्याला सोडून दिले व पुढे निघाला.

दोन दिवसांनी राजाला पुन्हा तोच बुटका माणूस भेटला. पण यावेळी त्याची उंची दुप्पट झाली होती. त्याने राजाला युद्धासाठी आव्हान दिले.

पुन्हा राजाने लढाई जिंकली. यावेळी सुद्धा राजाने त्याला जाऊ दिले. आणि स्वतः पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.

परत दोन दिवसांनंतर तो माणूस राजाच्या समोर येऊन उभा राहिला.

आता त्याची उंची मागच्या वेळेपेक्षा जास्त वाढली होती. त्याने राजाला आपल्याशी युद्ध करण्यास सांगितले.

पुन्हा एकदा लढाई सुरू झाली. यावेळी सुद्धा राजाच जिंकला. आता मात्र त्या माणसाला मारुन टाकण्याचा विचार राजाच्या मनात आला. पण हरलेल्या व्यक्तीला ठार मारणे योग्य नाही असे म्हणून त्याने त्या माणसाला सोडून दिले. आणि आपल्या मार्गाने पुढे जाण्यासाठी निघाला.

दर दोन दिवसांनी तो माणूस राजाचा रस्ता अडवून युद्धाचा आग्रह करत असे.

या लढाईत राजा जखमी झाला. पण तरीही प्रयत्नांची शर्थ करुन राजाने ही लढाई जिंकली. पण यावेळी मात्र त्याने त्या माणसावर दया दाखवली नाही. राजाने त्याला ठार मारले व ही रोजची कटकट संपवून टाकली.

मित्रांनो या गोष्टीचा अर्थ तुम्हाला समजला का ?

आपल्या सर्वांच्या आयुष्यात हा त्रास देणारा माणूस असतोच. हा माणूस प्रतिकात्मक आहे.

आपल्या आयुष्यात असणाऱ्या चिंता, भीती, काळजी यांचे प्रतिक म्हणजे हा माणूस !!!

जेव्हा आपल्या समोर कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होते तेव्हा आपल्या जवळ दोन पर्याय असतात. अगदी या कथेतील राजाप्रमाणेच.

पहिला पर्याय म्हणजे या समस्येचे मूळ कारण शोधून त्यावर कायमचा इलाज करणे. किंवा या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून जगत रहाणे.

जर त्रास देणारे विचार किंवा समस्या कायमच्या संपवल्यात तर तुम्ही जीवनाचा आनंद घेऊ शकता. पण जर का त्याकडे दुर्लक्ष केलेत तर सुरुवातीला किरकोळ वाटणारे प्रॉब्लेम्स वाढतच जातात आणि समस्या आपल्या हाताबाहेर जाते.

म्हणून आयुष्यात लहानशी अडचण असली तरी ती पूर्णपणे सोडवा आणि मगच पुढे जा !!!

याचा दुसरा फायदा असा होतो की लहान लहान प्रश्न सोडविल्यामुळे तुमचा अनुभव आणि आत्मविश्वास वाढतो.

जेव्हा काही मोठी आपत्ती येते त्यावेळी तुम्ही गडबडून न जाता त्याचा सामना करु शकता.

म्हणून कोणत्याही समस्येपासून पळ काढणे म्हणजे भविष्यात आपला त्रास जास्त प्रमाणात वाढवून घेणे.

सारांश

आपल्यावर कठीण परिस्थिती ओढवते तेव्हा त्यातून बाहेर पडण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्या परिस्थितीशी लढणे आणि तो प्रश्न कायमचा संपवून टाकणे.

या गोष्टीतून आपल्याला बरंच काही शिकता येईल.

टाळाटाळ,  पळपुटेपणा,  संकटाला न भिडणे  किंवा एखाद्या प्रश्नाची संपूर्ण उकल न करणे,  गोष्टी अर्ध्यावर सोडून देणे असे बरेच दुर्गुण आपल्यात असतात.

पण यामुळे खूप मोठं नुकसान होऊ शकतं. वेळेवर निर्णय घेणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे पुढे होणारा त्रास टाळता येतो.

इंग्रजी भाषेत एक म्हण आहे…

A stich in time saves nine.

मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करुन सांगा.

गोष्ट आवडली तर जरूर लाईक व शेअर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!