नफा देणारे शेअर शोधण्याची गुणोत्तरे -भाग ३ (How to find good shares)

लेखाचा मागचा भाग

ऊ . इफिशियन्सि रेशो :

कार्यक्षमतेच्या या रेशोमुळे कंपनी आपली मालमत्ता , भागभांडवल , घेतलेली कर्जे यांचा पूर्ण क्षमतेने वापर करून किमान खर्चात कमाल उत्पादन करते का? ते समजण्यासाठी मदत होते.

Saving

१. वर्किंग कॅपिटल टर्नओवर रेशो : निव्वळ उलाढालिस वर्किंग कॅपिटल म्हणजेच चालू मालमत्तेमधून चालू देयता (liabilities) वजा करून आलेल्या संख्येने भागले तर हा रेशो मिळतो .हा रेशो जेवढा जास्त तेवढे चांगले .
२. रिसिव्हेबल टर्नओवर : या मध्ये निव्वळ उलाढालिस येणे बाकी असलेल्या रकमेने भागले जाते .येणे रक्कम जेवढी कमी तितका भागाकार वाढेल .हा रेशो काळजीपूर्वक काढणे जरुरीचे आहे .
३. इनव्हेटरी टर्नओवर रेशो : उत्पादनातील कच्चा माल , अर्धवट प्रक्रिया झालेला माल आणि उत्पादित परंतु शिल्लक माल यास इनव्हेटरी असे म्हणतात त्यांस विक्री झालेल्या उत्पादित मालास आलेल्या खर्चाने हा रेशो मिळतो .हा रेशो खूपच फसवा असून इनव्हेटरी कमीत कमी असणे त्याचबरोबर उत्पादन खर्च कमी असणे हे चांगल्या कंपनीचे लक्षण आहे .
४. प्राईज अर्निग रेशो : PE या संक्षिप्त नावाने प्रचलित आहे .चालू बाजारभावास प्रतिशेअर कमाई (EPS) भागले असता हे गुणोत्तर मिळते .हा रेशोच्या अनुरूप शेअरचा भाव असता तर त्याविषयी निर्णय घेणे सोपे झाले असते परंतू प्रत्यक्षात अनेक कारणांनी भाव वाढतात आणि हा रेशोही बदलतो .एकदम नामवंत कंपन्या सोडल्यास हा 15/17 असणे चांगले .परंतू हा नियम नाही अनेक नामवंत कंपन्यांचा पी ई सातत्याने 40/45 आहे .
५. कॅश अर्निग पर शेअर : करपश्चात नफ्यास शेअरचे संख्येने भागले की हा रेशो मिळतो .याची तुलना मागील वर्षाशी करता येते .
६. डिव्हिडेंड पे आउट रेशो : शेअरहोल्डरना वाटलेल्या डिव्हीडेंडला करपश्चात नफ्याने भागले असता हा रेशो मिळतो .चांगल्या कंपन्याचे बाबतीत हा रेशो 40:60 याप्रमाणात असतो .गुंतवणूकदार त्यांना लगेच फायदा दिसत असल्याने जास्त रेशो असलेल्या कंपन्या पसंत करतात .परंतू एका विशिष्ट मर्यादेपेक्षा या कंपन्याची प्रगती थांबते .तेव्हा हा रेशो कमी असणे अधिक चांगले असते .
७. डिव्हिडेंड रेट : कंपनीने एका शेअरवर दिलेल्या डीवीडेंडला शेअरच्या मूळ किंमतीने भागुन 100ने गुणले असता हा रेशो मिळतो तो नेहमी %मधे दर्शवला जातो
८. डिव्हिडेंड यिल्ड : एका शेअरवर मिळालेला डिव्हिडंडला चालू बाजारभावाने भागून 100ने गुणले असता हा रेशो मिळतो .याने सध्या मिळणारा उतारा कळतो .
९. बुक व्हॅल्यु : भागभांडवल आणि गंगाजळी यांच्या बेरजेस एकूण शेअर्सचे संख्येने भागले असता हा रेशो मिळतो.जेवढी बुक व्हॅल्यु जास्त तेवढा रिझर्व जास्त असल्याने काही कारणाने कंपनी बंद झाल्यास शेअर होल्डरना तेवढी रक्कम मिळण्याची हमी असते . गंगाजळी जास्त असल्याने बोनस शेअर मिळण्याची शक्यता जास्त .
१०. प्राईज अर्निग ग्रोथ : पी ई रेशोला वाढीचा दराने भागले असता हा रेशो मिळतो .
११. मार्केट टू बुक रेशो : बाजारभावास बुकव्हॅल्युने भागले असता हा रेशो मिळतो .यावरून बाजारभावाच्या किती पट संपत्ती निर्माण झाली ते समजते .

अमुक एक रेशो वापरून चांगली कंपनी शोधता येईल असे ठामपणे सांगता येणार नाही .परंतु एकाच प्रकारच्या आणि सारखीच उलाढाल असलेल्या कंपनीच्या प्रगतीची तुलना करून आंदाज बांधता येतो .एकाच प्रकारचा निकष दुसऱ्या प्रकारच्या कंपनीला लावता येत नाही .त्याचप्रमाणे तुलना करीत असलेली कंपनी नविन आहे की प्रस्थापित आहे तेही पहावे लागते. या गोष्टी बारकाईने लक्षात ठेवल्या तर आपले अंदाज बरोबर ठरायला मदत होते.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “नफा देणारे शेअर शोधण्याची गुणोत्तरे -भाग ३ (How to find good shares)”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय