प्रेम हे!…. (Power of Love)

लहान असताना शाळेमध्ये, हमखास “माणसाच्या मुलभुत गरजा कोणत्या? असा प्रश्न विचारला जायचा, अन्न, वस्त्र, निवारा असे ठरलेले उत्तर असायचे, शुद्ध पाणी, स्वच्छ हवा, ह्यांना तेव्हा गृहीत धरले असेल, आता त्यांनाही मुलभुत गरजा बनवायला हवं.

काळासोबत आजच्या जमान्यात ही यादी अपडेट करावी लागेल, जसं की, एखाद्यासाठी मोबाईल ही जीवनावश्यक गरज बनली असेल, ते ही इंटरनेट सहित बरं का!..आणि कोणाला हेडफोन आवश्यक असेल, कोणाला स्वतःसाठी सिगारेट, १२०-३०० सुपारी आवश्यक असेल!

पण माणसाची आणखी एक खुप खोल गरज आहे, अगदी ऑक्सीजन सारखी आवश्यक, आणि ती म्हणजे ‘प्रेम’! प्रेमाला वजा करा, लहान-मोठा, गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष कोणत्याही माणसाला जगायला प्रेमाची गरज असते, आणि अगदी जीवनाच्या सुरुवातीपासुन त्याला प्रेम हवं असतं!

अगणित अभ्यासांनी दाखवुन दिले आहे की मनुष्याच्या आणि बाकीच्या प्राण्यांच्या बाळांना जवळ धरायची, गोंजारायची, कुरवाळयची आणि अशा तह्रेने प्रेम करवुन घेण्याची गरज जन्मल्या क्षणापासुन असते, या प्रेमासोबत ते वाढतात, आणि निरोगी, परिपक्व आणि वयस्कर माणसांमध्ये त्याचे रुपांतर होते, प्रेमाशिवाय माणुस मानसिक आणि शारीरिक रुपाने आजारी होतो, गंभीर होतो, कधी कधी मरतोदेखील!, इतकं आपल्यासाठी प्रेम आवश्यक आहे.

अमेरीकेतल्या आयोवा विद्यापीठाने सिद्ध केले आहे की जेव्हा सतत प्रेमाचे शब्द झाडांशी बोलले गेले तेव्हा त्यांची वाढ चांगली झाली. आपण जसजसे मोठे होत जाते तशी आपली प्रेमाची गरज कमी होत नाही, उलट ती गरज वाढते.

ज्याला भरपुर प्रेम मिळतं, असा माणुस इतरांवरही भरभरुन प्रेम करतो, असा व्यक्ती आपला व्यवसाय उत्तम पद्धतीने करु शकतो, प्रेम आपल्या आत्मविश्वासाला आणि आत्मसन्मानाला पुष्ट बनवते, आजुबाजुला प्रेमळ माणसं असली की आपण आपल्या क्षमतेपेक्षा खुप चांगली कृती करु शकतो, प्रेमाचा दुष्काळ असल्यास वाईट प्रदर्शन होते.

प्रेमाने ओतप्रोत भरलेला माणुस कितीही वाईट परीस्थीती असो, दुःखी, निराश कधीच असत नाही, जेव्हा तुम्ही प्रेमात असता, तेव्हा तुम्हाला इतर कशासाठीही वेळ मिळत नाही, एकतर तुम्ही प्रेमाने पुर्ण भरलेले असता, किंवा भयाने मन भरुन गेलेले असते, दोघे एका ठिकाणी नांदु शकत नाहीत. संशोधनांनी हे कळले आहे की ८७ टक्के शारीरिक व्याधी पुरेसे प्रेम न मिळाल्यामुळे किंवा न अनुभवल्यामुळे होतात. जेव्हा आम्हाला प्रेम मिळत नाही तेव्हा आमची निर्णयक्षमता डळमळीत होते, आणि अक्षम आणि असमर्थ होतो!

भरपुर प्रेम मिळणे हाच यावर उपाय आहे, असे प्रेम मिळवणे आपल्या हातात असते का? नक्कीच ‘हो’! कारण, प्रेम मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे, प्रेम देणे हाच होय. जीवनाचा सिद्धांत फार मजेशीर आहे, अगदी बॅंकेच्या अकाउंट सारखा, इथं जो जेवढं जास्त देतो, तेवढं त्याला ते जास्त व्याजासकट परत मिळतं!

मग आजुबाजुच्या लोकांकडून जास्तीत जास्त प्रेम मिळवायचं असेल तर त्यांना जास्तीत जास्त प्रेम द्या!..

रोजच्या जीवनात, खाली दिलेल्या, साध्या सोप्या सात कृतींचा वापर केल्यास आपल्याला इतरांकडून भरभरुन प्रेम सहज मिळवता येईल.

१) अलिंगन

मुन्नाभाई मधली ‘जादुची झप्पी’ आठवतीये, एक मिठी मारुन तो कुणालाही आपलसं करायचा, जेव्हा आपण एखाद्याला अलिंगन देतो, तेव्हा, आपले ह्रद्य पुर्ण पणे मोकळे होते, आपलं ह्र्द्यचक्र आपलं उर्जेचं क्षेत्र असतं, अलिंगन देताना, त्याला आपण काठोकाठ प्रेमाने भरुन समोरच्यावर उधळुन टाकतो.

थोडक्यात, मिठी मारणं ही क्रिया, म्हणजे अशी किल्ली आहे, जी ह्रद्याकडं जाणार्‍या मार्गाला पुर्णपणे उघडते. अलिंगनानंतर क्षणभर, समोरच्याच्या नजरेत कोमल भाव ठेवुन, पाहील्यास, दोघांनाही विलक्षण आनंद होतो!

२) प्रेमाचे संदेश

प्रत्येक गोष्ट बोलुन व्यक्त करायची नसते, कधी छोट्याश्या चिटोर्‍यावर छोटुसा प्रेमळ संदेश लिहल्याने त्याचं वजन वाढतं, उदा. लहानपणी बाराखडीला मिळालेला ‘व्हेरी गुड’ आपल्याला किती सुखावुन जायचा, लिहुन पाठवलेली एखादी छानशी शुभेच्छा मनात दिवसभर रेंगाळते.

गंमत म्हणुन कधी आपल्या घरातल्यांना, जवळच्यांना प्रेम संदेश देऊन बघा, एखाद्याला स्टेशनवर, एअरपोर्टवर सेंड ऑफ करायला गेले असाल, तर शेवटच्या क्षणी एक छोट्सा संदेश देणारी चिठ्ठी सोपवा, त्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी तरळल्याशिवाय राहणार नाही.

जवळच्या व्यक्तीच्या वाढदिवशी, किंवा सोहळ्या समारंभात, स्वतःच्या हस्ताक्षारातला छोटासा संदेश स्नेह घट्ट करतो.

एखाद्या वेळी मुलाने आईला, “आजचं जेवण खुप चवदार होतं, आई, तु माझ्यासाठी खुप करतेस, थॅंक यु व्हेरी मच”, “असा संदेश लिहुन ठेवल्यास त्या आईला किती आनंद होईल.

जेव्हा कुठल्या कार्यक्रमानिमीत्त बायको छान तयार होते, त्या दिवशी जर नवर्‍याने बायकोला “आज तु खुप गोड दिसत होती” असा संदेश लिहुन तिच्या कपाटावर चिटकवल्यास तिच्या काळजाला गुदगुल्या होतील, आरशात स्वतःला न्याहळत ती झक्कास लाजेल.

३) कुरवाळणे, कुशीत घेणे

कुशीत घेणे, हातात हात घेणं, हा प्रेमाच्या देवाणघेवाणीचा, आपुलकीचा, उष्मापुर्ण स्नेहाचा मार्ग आहे, लहानपणी नाही का आपण मित्रांच्या गळ्यात हात टाकुन शाळेला जायचो, तो आपला ‘जिगरी मित्र’ समजला जायचा.

जसजसे आपण मोठे होत गेलो, आपल्याला संकोच वाटु लागला, आणि उगीचचं निखळ प्रेमाला पारखे होत गेलो.

प्रेमात पडलेल्या जोडप्यांसारखं सर्वजनिक ठिकाणी शारीरिक चाळे करणं, चुकीचं असलं तरी, रस्त्याने चालताना, गर्दीच्या ठिकाणी, सिग्नल क्रॉस करताना, इव्हनिंग वॉकला, जोडीदाराचा हात हातात घेणं, म्हणजे एक प्रकारचा मानसिक आधार देणं, समर्पण व्यक्त करणं!..म्हणुन तरल नात्यातला प्रेमाचा ओलावा टिकवण्यासाठी ते आवश्यक आहे.

४) माझे तुझ्यावर प्रेम आहे

‘आय लव्ह यु’ फक्त ‘लव्ह-बर्डस’ पुरते सिमीत नाही, आपण जे काही म्हणणार आहोत, ते प्रेमभराने आणि कोमलतेने म्हणणे, हे सुद्धा एक ‘I Love You’ च आहे. मग ते कुणाशीही बोलणे असो.

कटु बोलणं, चुका दाखवणं, नाराजी व्यक्त करणं, हे सौम्य भाषा वापरुन, स्मित हास्य वापरुन, मनावरच्या अनावश्यक जखमा टाळता येतात.

एक खराब बातमी द्यायच्या अगोदर, एका चांगल्या बातमीपासुन संभाषणाची सुरुवात केल्याने कटुता कमी करता येते.

एखाद्या होवु पाहणार्‍या कठोर भांडणाचा, संभाव्य भडका उडण्याआधीच शमवण्यासाठी, मनातल्या मनात किंवा मोठ्याने बोललेलं ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’ हे पिटुकलं वाक्य पुरेसं आहे.

५) प्रेमानं बोला

आपण कसे आहोत, याविषयी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा आपले शब्द खुप काही सांगतात.

जर आपले बोलणे, युक्तीपुर्वक, प्रामाणिक आणि प्रेमाने युक्त असेल तर दुसरे आपले नक्कीच ऐकतात.

ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तींना, प्रेमानं, सौजन्याने बोलणार्‍याला, आपसुकच मनातुन आदर, सन्मान मिळतो.

प्रेमानं बोलल्याने प्रेम वाढतं, आणि आपल्याकडुन दिल्या गेलेल्या प्रेमाच्या कित्येक पट जास्त होवुन ते प्रेम आपल्याला परत मिळतं.

६) कृतीतून प्रेम देणे

शब्दांपेक्षा कृती जास्त परिणामकारक असते. प्रेमळ शब्दांना कृतीने अनुमोदन न दिल्यास ते पोकळ ठरतात.

आपण प्रत्येक कृती प्रेमानं केल्यास, बदल्यात आपल्याला उदंड प्रेम मिळतं.

प्रेमानं वागण्याची काही तंत्र म्हणजे नजरेला नजर मिळवणे, हातात हात घेणे, लक्ष देऊन ऐकणे, एखाद्यासोबत असताना, पुर्णपणे तिथेच असणे.

प्रेमाची सकारात्मक गाणी ऐकणे, नेहमी मार्दव आणि स्नेहाचे प्रदर्शन करणे, प्रामाणिक आणि उस्फुर्त असणे.

नेहमी प्रतिसाद देणे आणि रस घेणे, स्वच्छ, नीटनेटके सुवासिक राहणे, फुले देणे, दुसर्‍याच्या कामात किंवा घरकामात सहभागी होणे.

जोडीदाराचा गुडमॉर्निंग, गुडनाईट किस घेणे, चांगली विनोद बुद्धी ठेवणे आणि नेहमी प्रसन्न राहणे.

७) स्मितहास्य

तु मला आवडतो, हा मौन संदेश म्हणजे स्मितहास्य!..

हास्य ह्द्याच्या तारा तात्काळ ह्रद्याशी जोडतं!…

प्रेमात सर्वकाही समर्पित करणं, म्हणजे काय? हे समजुन घेण्यासाठी एक सत्य घटना सांगतो.

लिंडा ब्रिटीश नावाच्या कलेच्या शिक्षिकेला वयाचा अठ्ठ्यावीसाव्या वर्षी ट्युमर डिटेक्ट झाला, सहा महीन्यांनी तिचा मृत्यु होणार होता, त्या सहा महीन्यात तिने खुप कविता केल्या, आणि खुप चित्रं काढली, सहा महीन्यात तिची सगळी चित्रं आणि कविता प्रदर्शित झाल्या, विकल्या गेल्या, फक्त एक चित्र आणि एक कविता तिने सांभाळुन ठेवण्यासाठी आईवडीलांकडे दिली होती.

सहा महीने संपतात, लिंडा जाते. तिच्या मृत्युपत्राप्रमाणे तिचे अवयवदान होते, एका अठठावीस वर्षाच्या तरुणाला तिचे डोळे मिळतात, तो लिंडाच्या आईवडीलांना धन्यवाद म्हणायला येतो, त्याला पाहुन ते थक्क होतात, कारण त्या व्यक्तीचा चेहरा हा सेम टु सेम, लिंडाने काढलेल्या त्या चित्रातल्या तरुणाचा असतो, जे तिने तिच्या आईवडीलांना सांभाळायला दिलेले असते,

जड मनाने ते तिची शेवटची कविता उघडतात, त्यातल्या ओळी काही अशा आशयाच्या असतात,

“प्रेमात पडणारी,
दोन ह्रद्ये रात्रीतुन जाताना,
एकमेकांना कधीच पाहु शकणार नाहीत.”

वाचण्यासारखे आणखी काही…..

माणसं जोडावी कशी? …. (भाग ३)
सुंदर ते ध्यान!
निर्भय बना!


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय