माहिती करून घ्या “कॉफी कॅन पोर्टफोलीओ” बद्दल

coffe-can-portfolio

कॉफी कॅन पोर्टफोलिओ म्हणजे काय?

भांडवलबाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांचे त्यांच्या गुंतवणूक करण्याच्या पध्दतीवरून पडणारे पाच प्रमुख प्रकार आपण या पूर्वीच्या लेखात पाहिले आहेत. यातील दीर्घ मुदतीने गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार या प्रकाराच्या गुंतवणूकीशी मिळतेजुळते कॉफी कॅन पोर्टफोलिओ हे एक तंत्र आहे.

१९८४ साली “रॉबर्ट किर्बी” या पोर्टफोलिओ मॅनेजरने गुंतवणूकीच्या या पध्दतीला हे नाव सूचवले. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला ओल्ड वेस्ट या भागातील लोक आपल्याकडील मौल्यवान गोष्टी जसे पैसे, सोन्याचे दागिने या सारख्या गोष्टी कॉफीचे टीन मधे ठेवून गादीत दडवून ठेवत असत. १०-१५ वर्षांनी अगदीच गरज पडली तरच त्याचा उपयोग करत. रॉबर्ट किर्बी याने याच तंत्राचा वापर करून असे सुचवले की काही चांगले शेअर्स शोधून, एक डायव्हर्सीफाईड पोर्टफोलिओ तयार करावा. त्यातील भावामधे होणारी चढ उतार याकडे लक्ष देवू नये. त्याचे पुनर्मुल्यांकन करु नये आणि ते किमान दहा वर्ष तरी विकले नाहीत तर त्यात खूप मोठी मूल्यवृद्धी होवू शकते. अनेक गुंतवणूकदार आपल्या गुंतवणूकीसाठी ही पद्धत सध्या वापरत आहेत.

या तंत्राने गुंतवणूक करण्याचे प्रमुख फायदे असे –

  •  ही एक दीर्घ काळासाठीची गुंतवणूक प्रक्रिया असल्याने एखाद्या तिमाहीत अपेक्षित नसलेली कामगिरी, सरकारी धोरणातील बदल या सर्वांचा गुंतवणूकदारावर परिणाम होत नाही. सी.सी.पी. (Coffee Can Portfolio) तंत्राने गुंतवणूक करणाऱ्यावर अशा अल्पकालीन बदलामुळे बाजारभावातील फरकामुळे आपल्या उद्देशापासून फारकत घेतली जात नाही.
  •  या पद्धातीत इंडेक्सच्या परताव्याहून अधिक परतावा मिळण्याची जास्त शक्यता असते. इंडेक्सने दीर्घकाळात चांगला परतावा दिल्याने त्यामधे अथवा त्याच प्रमाणात शेअरमध्ये गुंतवणूक करणे हा एक फायदेशिर सौदा ठरू शकतो. परंतू इंडेक्स हे एक अनेक शेअरचे मिश्रण असून त्यातील सर्वच शेअर एकाच वेळी वाढ दर्शवित नाहीत. त्यामूळे त्यात होणारी वाढ ही त्यातील सर्व शेअरची सरासरी असते. कॉफी कॅन पोर्टफोलिओ मध्ये भविष्यात फक्त वाढच अपेक्षित असलेल्याच शेअरचा सामावेश असलेले शेअर असल्याने यात इंडेक्सहून अधिक परतावा मिळू शकतो.
  • कमीत कमी आस्थापन खर्च (Charge ): यामधे शेअरची सातत्याने खरेदी / विक्री होत नसल्याने एकंदर उलाढालीचे प्रमाण खूप कमी असते, त्यामुळे यावर होणारा ब्रोकरेज आणि इतर खर्च बऱ्याच प्रमाणात वाचतो.

या पद्धतीने आपला गुंतवणूक संच (Portfolio) बनवणाऱ्या व्यक्ति आणि संस्था शेअरची निवड करताना खालील गोष्टी प्रामुख्याने विचारात घेतात:

  • गुंतवणूकीचे विविध निकष वापरून शोधलेली अशीच कंपनी असेल की जिने कंपनीचे प्रवर्तक आणि भागधारक यांच्या मालमत्तेत गेल्या दहा वर्षात कित्येक पटीने वाढ केली आहे. दरवर्षी उलाढाल किमान १०% वाढली आहे.
  • यात गुंतवलेल्या भागभांडवलावर मागील दहा वर्षी प्रत्येक वर्षी किमान १५ चक्रवाढव्याजदराने उतारा मिळवला आहे. (Return on Capital Employed) ज्या कंपन्याचा ५ हून अधिक आणि १० वर्षाचा फायनांशियल डाटा उपलब्ध आहे तो विचारात घेतला जातो. ५ किंवा त्यापेक्षा कमी वर्षांची माहिती असलेल्या कंपन्याचा अजिबात विचार केला जात नाही.

वॉरेन बफे (Warren Buffett) यांची  Buy and Hold Strategy

बाजारात आपल्याला शेअरचा भाव (Price ) समजतो पण त्याचे आंतरिक मूल्य (हे शोधून काढायचे असते. वॉरेन बफे (Warren Buffett) यांच्या ‘चांगले शेअर घ्यावे आणि विसरुन जावे ‘ ‘buy and forget approach’ याच साध्या तंत्राची ही सुधारीत आवृत्ती असून अनेक गुंतवणूकदार, गुंतवणूक तज्ञ, ब्रोकर, गुंतवणूक संस्था या पद्धतीचा वापर करीत असून ते त्यांनी शोधलेले शेअर्स जाहीरही करीत आहेत. एक मार्गदर्शक दिशा म्हणून याचा अभ्यास करून आपलाही एक चांगला कॉफी कॅन पोर्टफोलिओ बनवून अधिक लाभ मिळवू शकतो. सी. सी. पी. तंत्राचे प्रमुख निकष पूर्ण करणाऱ्या कंपन्यांची नावे खालील चित्रात दिली आहेत ती अभ्यासासाठी असून त्यांची शिफारस केलेली नाही.

coffe-can-portfolioआपल्या गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आणि जोखिम समजून घेवून गुंतवणूक निर्णय घ्यावा. अशाच प्रकारचे निकष वापरून चांगली कामगिरी अपेक्षित असलेले शेअर्स, इक्विटी म्यूचुअल फंडाच्या योजना, इंडेक्स फंड शोधता येवू शकतील.

सामान्य गुंतवणूकदाराने गुंतवणूक करतांना आणखी एका गोष्टीकडे लक्ष असुद्यावे ते म्हणजे कंपन्यांचे Larg Cap, Mid Cap, Small Cap नुसार वर्गीकरण.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

1 Response

  1. January 5, 2018

    […] Can Portfolio) या तंत्रज्ञानाबद्दल माहिती मी मागील एका लेखात दिलीच होती. या तंत्राने अनेक फंड हाऊस, […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!