समजून घेऊ आपलं मन….. (Psychology Blog)

psychology blogs

नमस्कार !

या ब्लॉग मार्फत अपसामान्य विकृत्यांचं प्रत्यक्ष दर्शन केस स्टडी मार्फत देण्याचा प्रयत्न माझ्याकडून असणार आहे. याचे कारण म्हणजे आज सभोवताली वावरताना कुठेतरी एक मानसशास्त्रज्ञ म्हणुन अपसामान्यत्वातील लक्षणांच प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळे त्या सर्व विकृत्यांचा आत्तापासुनच तरुणां सकट सर्वांना परिचय करून देणे महत्वाचे वाटते.

अशा पद्धतीचा ब्लॉग (Psychology Blog) तयार करण्याचा केवळ एकच हेतु ! आणि तो असा की, समाजात स्वतंत्रपणे किंवा बंधिस्तपणे वावरताना असंख्य मानसिक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते आणि ही एक स्वाभाविक आणि नैसर्गिक अशी प्रक्रियाच आहे. जोपर्यंत त्या समस्येची तिव्रता ही सौम्य स्वरुपाची आहे तोपर्यंतच ! परंतु यापैकी आपल्या बहुतेक मित्रांना अशा समस्यांना सामोरे जाताना निश्चित असा मार्ग सापडत नाही, त्यामुळे ते अशा समस्येच्या खोलवर आणखीन भरकटतात आणि नव्याने तयार झालेल्या या मानसिक जखमेला दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतात.

यातील तर बहुतेकांना ही समस्या दुर्लक्ष करताच येत नाही. दुर्लक्ष होवो अथवा न होवो, तरी ही समस्या त्यांचे दैनंदिन जीवन हळुहळु उध्वस्त करीत असते. मग कामात लक्ष न लागणे, एकाकी वाटणे, भावनांचा गोंधळ होणे, जवळच्या मित्रांचा दुरावा, भ्रम होणे, आत्महत्या सारख्या विचारांचा स्पर्श होणे, विचित्र स्वप्ने पडने, रात्री दचकून जागे होणे, किंबहुना रात्री झोपच न लागने ई. अशा लक्षणांनी त्याचे दैनंदिन जीवन पार उध्वस्त होते.

म्हणून अशा निरनिराळ्या विकृत्यांसंबंधी माहिती मिळविणे गरजेचे आहे. जेणेकरून आपल्यातल्या लहानश्या मानसिक समस्या पुढे जावून रौद्र स्वरुप धारण करु नयेत आणि आपल्या सुंदर आयुष्याला अशा क्षुल्लक गोष्टींची वाळवी लागु नये, म्हणून आत्ताच आपल्याला त्याचे उत्कृष्ट नियोजन करता यावे.

आत्तापर्यंत ज्यांना मी ओळखतो आणि ज्यांना आत्तापासून नव्याने ओळखणार आहे, असे सर्व माझे मित्र नेहमी मानसिकदृष्टया सुदृढ, सक्षम आणि आनंदी असावे, अशी एकमात्र इच्छा बाळगुन हा ब्लॉग मी आपल्या सर्वांना समर्पित करीत आहे.

यु-ट्यूब चॅनल : आपलं मानसशास्त्र

धन्यवाद !

राकेश सुलभा वरपे
(समुपदेशन मानसशास्त्रज्ञ)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.