एकदा समजलं कि उमजेलच……. (The Youth of Today)

todays youth

एकमेकांना नॉन व्हेज जोक्स पाठवणे….. फेसबुक किंवा वोट्स अँप वर नंबर मिळवून…. इनबॉक्स करून….. मला तुझ्याशी लग्न करायचंय…… किंवा कॉफीला भेटते का? असे वेळ काळ वय विसरून विचारणे…. सेक्स चॅट करणे….. हे सगळे तात्पुरते एक्स्टसी देणारे भावना प्रकार आहेत….. त्यांना टिंगल नं करता आपण सामंजस्याने सोडवणे जरुरी असते……. माणसाला भावनांची मॅनेजमेंट करणारे शिक्षण देणे या गोष्टीला आपल्या अभ्यासक्रमात वेळच नाही….

भावनांच्या मॅनेजमेंटला महत्वाचं नाही….खरं मॉरल त्यावर आपलं उभं राहतं…… त्याला अत्यंत यःकश्चित किंमत देऊन फक्त वेड्या माणसाला उपचार लागतात अशी आपली समाज रचना आहेच…… मग छुप्या प्रकाराने माणसाने गरज भागवली तर गैर काय? असा विचार करून…… आपल्या आजूबाजूला असे करणारे लोक किंवा कधी आपण स्वतः सुद्धा जेव्हा…… भूमिका नीट नं पारखता असे करतो तेव्हा आपण दुसऱ्या सोल ला नकळत क्लेश देतो….. मनातले बोलणे जर एकाशी विपर्यास करत असेल तर दुसरा पर्याय शोधणे हे मनाचे वाहणे आहेच….. तर मग अत्यंत स्पष्टपणे आपली भूमिका आणि मनोरचना कशी प्रगट करायची हे जर आपल्याला पहिली दुसरीत शिकवले गेले तर किती सुरचित मने निर्माण होतील सांगा…?

परवा शिबिरात अठरा वर्षांची मुलं मुली होते…..एक म्हणाली….. मला कुठल्याही मुलाचा पंधरा दिवसात कंटाळा येतो….. आधी मला छान वाटते भेटणे बोलणे पण मग जवळ आलो कि सवयी दिसतात…. तो ब्रश नीट करत नाही तोंडाला वास येतो त्याच्या….. अंघोळही नाही सो घामाचा वास…. सिगरेट असतेच मध्ये मधे मधे…. मी पण ओढते सिगरेट पण मी खूप स्वच्छ आहे…… लग्गेच माऊथ फ्रेशनर असतं माझं….. तो सी. सी. डी. मधे भेटतो तर दुसऱ्या मुलींच्या फॉर्म कडेच बघत बसतो……. माझ्या बोलण्याकडे लक्षच नसतं…… मी पण बघते मुलांकडे पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून नाहीच….. आणि मी काम करते नीट दिवसभर….. हा उनाडक्या करतो…. घरचे पैसे असतात त्याच्याकडे…… मी स्वतः कमावते….. आयडेंटिटीच नाहीये त्याला….

आत्ताचं युथ (The Youth of Today)….. खूप जास्त ओपन वर हे सगळं खेळतंय …..आपण तरीही आई, बाबा…..घरचे यांच्या पगड्यात असायचो…..त्याचं एक लास्ट प्रोटेक्शन पण व्हायचं कि अगदी टोकाचं काही झालं तर घरचे वाचवायचे त्यातून, सांभाळायचे….. तर काही विशीच्या तरुणी असंही म्हणाल्या कि….. सेक्स बद्दल नीट माहिती मिळाली आम्हाला वेळीच सो आम्ही वाहावत जात नाही…. मुलगाही म्हणाला….. कि मुलीची स्वतःची इच्छा आणि संमती नसेल तर कधीच मी पुढे जात नाही……. त्यावर बोलतो सरळ….. म्युच्युअल असेल तर मग नीट असतं सगळंच…. आता कुणीच नुसतं भेटणे आणि बोलणे आणि पिक्चरला जाणे असं “सेव्हंटीज”चं प्रेम करत नाही……

बघा…..हा जो ग्राफ आहे तो हेच सारं दाखवतो……कि माणसाची मूलभूत गरज……जर नीट पहिली….. बोलली गेली नाही तर…… मानव ती कशीही पूर्ण करणारच….. म्हणून अत्यंत छान पद्धतीने कुठल्याही वयोगटाशी मी हीलिंग च्या माध्यमातून हे सर्व बोलून अनेक समस्या सोप्या केल्या आहेत…… त्या होतातच सोप्या…. म्हणून नं घाबरता नं शरमता बोला……. खूप सोप्पं आहे जग….. खरं तर….. विश्वास ठेवा…. एकदा समजलं कि उमजेलच…..खात्री असू दे……..

वाचण्यासारखे आणखी काही….

ऋषी पंचमी ची भाजी….
मैत्री -एक “कस्टमाइज्ड पॅकेज “
कोल्ड शोल्डर्स टू इंजेक्शन टॉप…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.