रुपावरूनच केली होती तिची पारख…..

आमच्या वर्गात ती फेमस होती.

सगळा वर्ग तिच्याच बद्दल बोलत असे. नव्हे तसं बोलल्याशिवाय कुणाला राहवतच नसे.

तिच्यावरच्या कमेंट्स, तिला चिडवणं, तिच्याबद्दल तिरस्कारयुक्त बोलणं असं काहीसं कायम चाललेलं.

ती होतीही तशीच. कुठला तरी lose पंजाबी ड्रेस घालायची. घोट्याच्या जरा वरच आलेली सलवार आणि must अशी ओढणी.

केस कसे तरी बांधलेले, आणि चेहऱ्यावर पावडर फासलेली. जुनाट bag किंवा कॅरी bag घेऊन फिरायची. सोबत कुठल्यातरी काळातली mineral water ची बाटली आणि एक disposable ग्लास असायचा.

आमच्या वर्गातल्या थोड्याश्या high-class वातावरणात आम्ही तिला कधी मिसळूच दिले नाही. ती तरीही माझ्याशी बोलायची आणि मी कसलाही ताळमेळ न ठेवता तिचा अपमान करायचे.

ती पुस्तक घेऊन काहीतरी विचारण्यासाठी यायची आणि मी तिच्या बुद्धिमत्तेची कीव करत तिला उडवून लावायचे.

course संपला, वर्गातले सगळेच तसे एकमेकांशी close झालेलो. मनातून वाईट वाटत होतं त्याबरोबर नवीन क्षितीज खुणावत होतं. माझ्या आयुष्याला तर नव्या जोडीदाराच्या रूपाने नवे वळण मिळाले होते. माझ्या नवीन आयुष्यात मी सुखात होते. तशातच एकदा पुन्हा कॅम्पस वर जाण्याची वेळ आली. ती भेटली. टाळता येणार नव्हतं म्हणून ओळखीच हसू गेलं. तशी ती जवळ आली. म्हणाली, ‘खुश हो?’ म्हटल, ‘हं’. का कुणास ठाऊक पण वाटलं हिला ‘sorry’ म्हणावं. म्हटलं, “sorry!” तशी ती म्हणाली, “अरे छोडो, तुम खुद खुद्से परेशान थी, तभी तो चीढती थी। होता हैं ऐसा.” तिच्याकडून मला ह्याची अपेक्षा नव्हती.

नंतर काही कारणाने, computer lab मध्ये गेले. तिथे lab technician शी बोलताना कळले कि, ‘ती ‘अजूनही प्रोजेक्ट सबमिशन च्या मागे होती. तेव्हाच तिच्या काही पर्सनल गोष्टींवर प्रकाश पडला. तिच्या नवऱ्याचं बाहेर कुठेतरी अफेअर होतं. त्याने हिला फसवलं, हिच्या वडिलांकडून पैसे घेतले आणि परदेशात गेला. फक्त त्याला भेटायचं म्हणून हिने आमच्या कॉलेजमध्ये अडमिशन घेतले. एका मोठ्या मानसिक धक्क्यातून ती जात होती. तशाच काहीशा धक्क्यातून त्यावेळी मीही गेले होते. मला आधार देणारे कुणीतरी होते, ती एकटीच सहन करत होती.

तिला समजून घ्यायला हवं होतं असं वाटून गेलं. अजूनही वाटत राहतं. का मी फक्त तिच्या राहण्या, वागण्यावरून तिची पारख केली?

कित्येकदा, माणसाच्या वरवरच्या वागण्याला आपण फार महत्व देतो. सरळ नावं ठेऊ लागतो, टर उडवतो.

तो माणूस असा का वागतोय ह्याच्या मुळाशी आपण जातच नाही. मुळाशी पोहोचलो तर तो माणूस आपल्याला कळू शकेल ना?

कोणताही माणूस पूर्णपणे वाईट नसतो. त्याच वागणं त्याच्या मनात चाललेल्या असंख्य गोष्टींचा आरसा असतो. हे तिला कळाले म्हणून तर ‘छोड दो यार!’ असं ती म्हणू शकली. मी तो समजून घ्यायला हवा होता. असो, आता कुणी असं विचित्र दिसलं कि टर उडवावीशी वाटत नाही. समजून घ्यावस वाटत. हेही काही कमी नाही.

मनाचे श्लोक

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय