रिच डॅड, पुअर डॅड! – भाग २ (Rich Dad Poor Dad)

Rich Dad Poor Dad

मित्रांनो, मागच्या लेखात तुम्हाला रिच डॅडने रॉबर्टला शिकवलेले सहा धडा सांगीतले होते, आज रिच डॅड आपल्याला बाकीचे धडे समजावत आहेत.

धडा सातवा – अडथळ्यांवर मात करा.

अर्थसाक्षर झाल्यानंतर लगेचच आर्थिक दृष्ट्या स्वातंत्र्य मिळतं, असं नाही. त्यासाठी अनेक अडथळ्यांना तोंड द्यावं लागतं, श्रीमंत बनन्याच्या मार्गात पाच अडथळे आहेत,

पैसे गमावण्याच्या भीतीवर मात करावी लागते. पैसे न गमावलेला एकही श्रीमंत माणुस मल दाखवा, असं आव्हान रिच डॅड देतात.

भीती आणि संशयावर मात करा, पळा, पळा आभाळ कोसळत आहे, असं सांगत फिरणार्‍या भित्र्या सशाच्या गोष्टीतला ससा बनु नका,

लेखक गंमतीत सांगतो, के. एफ. सी. चे संस्थापक कर्नल सॅंडर्स यांनी जगाला खोटं ठरवलं, वयाच्या पासष्टाव्या वर्षी नवा व्यवसाय सुरु करुन अवघ्या काही वर्षात उत्तुंग उंचीवर पोहचवला, कारण त्यांनी त्या भित्र्या सशाला चक्क तळुन विकलं!..

आळस झटका. कामाला लागा. मनात लोभ बाळगा, थोडीशी हाव आणि काही मिळवण्याची तीव्र इच्छा तुमच्यातला आळस नाहीसा करायला तुम्हाला प्रेरीत करेल, म्हणुन ‘दाग अच्छे है’ च्या धर्तीवर “सेल्फीश बनना अच्छा है” असं अनोखं समीकरण लेखक प्रस्तुत करतो.

सवयी बदला. जर तुम्ही सर्वात आधी स्वतःला पैसे दिले, म्हणजे खर्चा आधीच बचत-गुंतवणुक करण्याची सवय लावली, तर तुम्ही आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या जास्तीत जास्त मानसिक सामर्थ्यवान बनाल.

उद्धटपणा सोडा. अहंकार आणि अज्ञान माणसाला खड्ड्यात घेऊन जातात. फाजील आत्मविश्वासाचा शेवट पैसा गमावण्यामध्ये होतो. एखादी गोष्ट माहीत नसल्यास, मान्य करुन, समजुन घ्यावी, अज्ञान लपवण्यासाठी उद्धटपणाचा वापर करणारे, लोक बढाईखोर असतात. तोर्‍यात वागतात. तेव्हा एखाद्या विषयात आपण अज्ञानी आहोत असं समजताच, आधी शिक्षण घ्यायला सुरुवात करा, सोबत त्या विषयावरचं चांगलं पुस्तक शोधा.

धडा आठवा – सुरुवात करा.

आपण भरपुर शिकतो, आणि पैशासाठी काम करत राहतो, कारण नौकरी शोधणं आणि पैशासाठी काम करणं, हे खुप सोपं आहे,

श्रीमंत होण्यासाठी एक मोठं आणि प्रबळ कारण शोधा. आजुबाजुला असलेली, प्रेम करणारी माणसं प्रत्येक अडचणीवर मात करण्याचं बळ, उर्जा आपल्याला देतात.

मला आयुष्यभर काम करत राहयचं नाही, मी नौकरदार असलेलं मला आवडणार नाही, अशी मनाशी खुणगाठ बांधा. मग ते तुमच्याकडुन हवं ते करुन घेईल.

श्रीमंत लोक खुप मेहनत करतात, त्यांना जगभर फिरण्याचं स्वातंत्र्य हवं असतं, तरुण वयातच, त्यांना उत्तम जीवनशैली हवी असते, आणि ती उपभोगण्यासाठी स्वतः मोकळं असणंही त्यांना आवश्यक असतं.

माझ्या आयुष्यावर आणि माझ्या वेळेवर माझाच ताबा हवा, असा स्वतःकडेच हट्ट धरा.

मग पैशाने आपल्यासाठी काम करणं, आपल्यासाठी काम करणं, गरजेचं होतं.

श्रीमंत लोक आपल्या मुलासाठी खुप काही मागे ठेवुन जातात.

धडा नववा – निवड करा.

आता निवांत जगुन, आयुष्यभरासाठी गरीब रहायचयं का आता थोडेसे कष्ट करुन आयुष्यभर श्रीमंतीत जगायचंय यापैकी एकाची निवड करा.

रोज आपल्या हातात पडणार्‍या रुपयाचं सामर्थ्य ओळखा.

रोज आपल्या हातातल्या मालमत्ता आणि डोक्यातलं ज्ञान वाढवत रहा.

शिक्षणात गुंतवणुक करा. वेगवेगळे कोर्स जॉईन करा, पुस्तके वाचा, व्हिडीओ बघा, यशस्वी लोकांच्या सहवासात रहा, अयशस्वी लोकांना टाळा.

यश मिळवण्यासाठी आजुबाजुंच्यांना प्रेरित करा.

खरे बुद्धीमान लोक नेहमीच नव्या कल्पनांचं स्वागत करतात.

धडा दहावा – मित्रही काळजीपुर्वक निवडा.

मैत्रीमध्येही प्रचंड सामर्थ्य आहे. मित्रांची निवड आर्थिक परिस्थीतीवरुन करा असा ह्याचा अर्थ नक्कीच नाही,

गरीबांशी संबध ठेवु नका असे लेखक अजिबात सांगत नाही, फक्त त्यांच्या विचारांचा प्रभाव आपल्यावर पडु देऊ नका, असे सांगत आहे.

पण जेव्हा मार्गदर्शनाची गरज असेल, तेव्हा ज्यांच्याकडे सल्ले मागायला जाल ते, आपल्यापेक्षा जास्त बुद्धीमान असतील, अशाच लोकांशी चर्चा करा, असा लेखकाचा मतितार्थ आहे.

ज्यांच्याकडे पैसे नाहीत असे मित्र पैसे कसे मिळतात हे कसे काय सांगु शकतील.

त्यासाठी तुमच्या आतल्या गोटात श्रीमंत मित्रच हवेत, असा लेखकाचा आग्रह आहे.

धडा अकरावा – प्रथम स्वतःला पैसे द्या.

स्वयं शिस्त अंगी बाळगा. स्वतःवर ताबा नसेल तर श्रीमंत होता येत नाही. पैसे कमवावेत आणि पैसे उधळावेत याला काहीच अर्थ नाही. माणसं कफल्लक होतात ती स्वयंशिस्तीच्या अभावानेच.

स्वयंशिस्त ही गरीब आणि श्रीमंत यांच्यातला फरक सांगणारी फार महत्वाची किंबहुना पहील्या क्रमांकाची गोष्ट आहे.

आर्थिक दबाव आल्यावर जे स्वतःला हीनदीन समजु लागतात. दबाव सहन करण्याची ज्यांची क्षमता खुप कमी आहे, ते कधीच श्रीमंत होवु शकत नाहीत.

ज्यांच्याकडे शिस्त आणि धैर्य नसतं, ते इतरांकडुन पराजीत होतात.

म्हणुन एकुन लोकसंख्येच्या नव्वद टक्के लोक आयुष्यभर फक्त कष्ट करतात.

धडा बारावा – चांगले आदर्श डोळ्यासमोर ठेवा.

गल्लीत क्रिकेट खेळताना मुलांचा आवेश बघीतलाय तुम्ही, ते कधीचेच, विराट, धोनी आणि सचिन तेंडुलकर झालेले असतात.

तसंच रोजच्या कामामध्ये, आर्थिक गोष्टींचे निर्णय घेताना आपण धीरुभाई अंबानी, जे आर डी टाटा, आणि वॉरेन बफे होवुन निर्णय घ्यायला पाहीजे, मग यश मिळते.

निदान संदीप महेश्वरी आणि विवेक बिंद्रा, यांना पाहुन पाहुन त्यांच्यासारखे तर होवुच शकतो आपण!

हे नायक आपल्याला स्फुर्तीशिवाय आणखीही खुप काही देतात, ते गोष्टी खुप सोप्या करुन सांगतात! ते करु शकतात, तर मी ही करु शकतो, ही जिद्द निर्माण होते.

धडा तेरावा – द्या, म्हणजे मिळेल

रिच डॅड म्हणायचे, तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल तर ती आधी तुम्ही द्या, मग ती तुमच्याकडे भरभरुन येईल. खुप पैसे हवे आहेत, तर थोडे पैसे दान द्या, खुप हसणारी, हसवणारी लोकं आजुबाजुला हवी आहेत, तर लोकांना खदखदुन हसवा! खुप प्रेमाचे भुकेले आहात, तर मन खुलं करुन सर्वांवर मुक्तहस्ताने खुप प्रेम करा, जिवलग मैत्रीसाठी आसुसलेले आहात तर मैत्री करण्यासाठी आधी एक हात पुढे करा.

जे तुम्हाला मनातुन हवं आहे, ते आधी द्या. कारण ते दिलं की नेहमी चक्रवाढ व्याज घेऊन कित्येक पटींनी परत येतं.

बॅंकेत आपण पैसे डिपॉझीट भरतो मगच आपल्याला व्याज मिळतं, इतकं सोप्पं गणित आहे हे! बॅंकेत शहाणपणाने वागणारे आपण मात्र व्यावहारीक जगात इतरांनी आपल्याजवळ येण्याची, पुढाकार घेण्याची वाट का पाहत राहतो?

जर आपण एखाद्या शेगडीसमोर लाकुड घेऊन उभे राहीलो आणि तिला म्हणालो, की आधी तु मला उब उष्मा दे, मगच मी तुला इंधन म्हणुन लाकडं देईन, हे हास्यास्पद नाही का?

मग रोजच्या जीवनात आपण असं का करतो?

रॉबर्टच्या ह्या फिलॉसॉफीने मला मंत्रमुग्ध केलं, आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलवला, आणि माझ्या आर्थिक आयुष्याला निश्चित दिशा दिली, मला आर्थिक स्वातंत्र्य मिळवुन देण्यात मदत केली, अगदी असंच आयुष्य तुमच्याही वाटयाला येवो, अशा शुभेच्छांसह,

धन्यवाद!..

रिच डॅड पुअर डॅड – मराठी (पुस्तक खरेदी करण्यासाठी)


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

3 Responses

  1. Chandrashekhar Ganesh Apte says:

    Beautiful book. I read this book many times.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!