विचार करा आणि श्रीमंत व्हा! – भाग २ (Think And Grow Rich)

hink-and-grow-rich

‘विचार करा आणि श्रीमंत व्हा!’ लेखाच्या पहील्या भागाचे आपण खुप स्वागत केलेत, त्याबद्द्ल मनःपुर्वक धन्यवाद!

फक्त विचार बदलवुन हवी तेवढी संपत्ती मिळवण्याच्या प्रवासाची नेपोलियन हिल याने तेरा पावले शोधुन काढली.

तीव्र इच्छाशक्ती, श्रद्धा आणि स्वयंसुचना ही पहिली तीन पावले आहेत. आता पुढचा प्रवास समजुन घेऊया!

पाऊल चौथे – विशेषज्ञीय ज्ञान

लेखकाचं म्हणणं आहे, सामान्य ज्ञान कितीही मोठं असलं, कितीही जास्त असलं, तरी संपत्ती मिळवण्याच्या दृष्टीने ते तुटपुंजं ठरतं. प्रत्येक क्षेत्रात विशेष ज्ञान मिळवुन जलदपणे संपत्ती प्राप्त करण्याची संधी असते!

ज्ञान असणं वेगळं आणि पैसा मिळवण्यासाठी त्याचा वापर करणं वेगळं! हेन्री फोर्ड आणि थॉमस अल्वा एडीसन या दोघांजवळही शालेय ज्ञान अजिबात नव्हतं, पण आपल्या विशेष ज्ञान, आणि त्याचं पैशाच्या रुपात परावर्तन करण्याच्या कलेनं, त्या दोघांना अमेरीकेतल्या सर्वात श्रीमंत यादीत नेऊन ठेवलं.

एक हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टर, आपल्या विशेष ज्ञानाच्या बळावर, कमी श्रमात, साधारण डॉक्टरांच्या अनेक पटीने कमाई करतो. प्रत्येक क्षेत्रातल्या तज्ञाला विशेष ओळख मिळते, सन्मान मिळतो, आणि त्यासोबत पैसाही मिळतो.

ज्ञानाच्या प्रवाहामध्ये सतत भिजायला हवे, आयुष्यभरासाठी शिकत रहायला हवे.

स्टुअर्ट अस्टिनविअर नावाचा एक कन्सट्रंक्शन इंजिनीअर होता. बाजारात मंदी आली, वयाच्या चाळीशीत, विवाहित असताना त्याने पुन्हा कायद्याच्या शाळेत प्रवेश घेतला, आणि लौकरच एक प्रगत वकील म्हणुन नावारुपाला आला. यशस्वी होण्यासाठी, नेहमी ज्ञान घेण्यासाठी आसुसलेलं असावं.

विशेष ज्ञानाच्या जोडीला एक मौल्यवान कल्पना, एकदम जलद गतिने संपत्तीच्या शिखरावर घेऊन जाते. उदा. फेसबुक, एप्पल, अमेझॉन, ओला-उबेर, मॅकडोनाल्ड, कोकोकोला, पतांजली, बिगबझार अशा कुठल्याही बिझनेस तुफान लोकप्रिय बिजनेस मॉडेलचा अभ्यास केल्यास हेच दिसुन येईल की ह्या उद्योजकांनी आपल्या विशेष ज्ञानाला एका मौल्यवान कल्पनेची जोड दिली.

पाऊल पाचवे – कल्पना

कल्पना म्हणजे एक कार्यशाळा असते, जिथे माणुस आपल्या सगळ्या योजना तयार करत असतो, मनाच्या अफाट कल्पनाशक्तीला वापरुन आपल्या संवेदना, इच्छा यांना मुर्त रुप दिलं जाऊ शकतं.

आपल्या कल्पनाशक्तीच्या बळावर मानवाने मागच्या पन्नास वर्षात जे काही प्राप्त केलं आहे, सृष्टीची रचना झाल्यापासुन इतकं संशोधन कधीच झालं नव्हतं. लेखकाचं म्हणणं आहे की अजुनही अनेक शोध लागायचे बाकी आहेत, कारण आपण अजुनही आपल्या कल्पनाशक्ती वापरण्याच्या बाबतीत प्राथमिक स्तरावर आहोत.

  • निष्क्रीयतेमुळे कल्पनाशक्ती अकार्यक्षम होते.
  • कल्पनाशक्तीचा वापर करुन इच्छित संपत्ती मिळवण्यासाठी एक किंवा अनेक योजना बनवा.
  • डॉ. गुनसाल्स हे एक शिक्षणतज्ञ होते, ते लेखकाचे शिक्षक होते,

त्यांना अनेकदा वाटायचे की एक नवं कॉलेज सुरु करावं, त्यासाठी त्यांना दहा लाख डॉलर्स हवे होते, दोन वर्ष त्यांच्या डोक्यात ही कल्पना घोळत होती, अनेक लोकांनी ही कल्पना अशक्यप्राय असल्याचं मान्य करुन अनेकांनी हे खुळ सोडुन दिलं असतं, पण डॉ. गुनसाल्स यांना एक रहस्य माहीत होतं,

एके रात्री त्यांनी दहा लाख डॉलर्ससाठी तीव्र इच्छा व्यक्त केली, त्यांनी एक निर्णय घेतला, “एक आठवड्यमध्ये मी हे पैसे मिळवणारच!”

त्यांनी दृढ विश्वास ठेवला, की ते पैसे त्यांना लवकरच मिळणार आहेत, त्यांची सारी अस्वस्थता दुर झाली आणि मन शांत शांत झाले, दुसर्‍या दिवशी त्यांनी एका चर्चमध्ये प्रवचन दिले, जर त्यांना दहा लाख डॉलर्स मिळाले तर ते कशा पद्धतीची शिक्षणसंस्था उभारतील, याचे प्रामाणिक बारीकसारीक वर्णन करुन, त्याचे सगळ्यांच्या डोळ्यासमोर चित्र उभे केले. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर,

“पोटतिडकेनं कळकळीनं मी सर्व उपस्थित सर्वांना मी माझं स्वप्न विशद केलं, मी प्रत्यक्ष ईश्वराशीच संवाद साधत होतो.”

पाऊल सहावे – योजना

कल्पना ह्या अस्ताव्यस्त पसरलेल्या असतात. त्यांना व्यावहारिक रुपात रचणं, त्यांना साध्य करण्यासाठी करावयाच्या छोट्या छोट्या कृतींचा आराखडा बनवणं, म्हणजे योजना बनवणे!

लेखक समजावतो, पैसे मिळवण्याची आपली योजना निश्चित करण्यासाठी आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत वारंवार चर्चा करा, ह्यालाच लेखक मास्टर माईंड नाव देतो.

एक योजना अयशस्वी ठरली, तर निराश होवु नका, उत्साहाने दुसरी योजना बनवा. पुन्हा प्रारंभ करा.

कुणीही प्रयत्न सोडुन आपल्या मनात हार स्वीकारेपर्यंत अयशस्वी होत नसतो.

एक पळपूटा कधीच जिंकत नाही आणि एक विजेता कधीच पळुन जात नाही.

संपत्तीला आपण अंतःकरणातुन दिलेली हाक ऐकु जाते, आपण दिलेलं निमंत्रण ती निश्चितपणे ऐकु शकते.

या जगाची, मनोभावे सेवा करुन, आनंद मिळवत, ऐच्छिक संपत्ती प्राप्त करता येते.

दृढनिश्चयाने योजना राबवण्यासाठी नेतृत्वगुण आत्मसात करणे आवश्यक ठरते.

श्रीमंत बनण्यासाठी अमाप संधी आजुबाजुला दडलेल्या आहेत. योजना कार्यान्वित करा, आणि चिकाटीने तिला पुर्ण करा.

पाऊल सातवे – निर्णय

अनिर्णय आणि टाळाटाळ हे आपले सर्वात मोठे शत्रु आहेत, आपण त्यांच्यावर विजय मिळवायलाच हवा.

श्रीमंत लोकांना त्वरित निर्णय घेण्याची आणि गरज पडल्यास हळुहळु बदलण्याची सवय असते.

गरीब लोकांना स्वतःची निर्णयक्षमता नसते, म्हणुन इतरांच्या मतानं सहज प्रभावित होतात. वर्तमानपत्रे आणि शेजारच्यांशी चर्चा करुन ते आपली मते बनवतात.

म्हणुन लेखक म्हणतो, मास्टर मांईंड ग्रुप सोडुन इतर कोणावर विश्वास ठेवु नका.

न्युनगंड बाळगणारे लोक कळत नकळत आपलाही विश्वास नष्ट करुन टाकतात, त्यांच्यापासुन दुर असलेले बरे!

म्हणुन आपलं मन आणि मेंदु वापरा, आणि स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. डोळे आणि कान सताड उघडे ठेवा, आणि तोंडाचा आवश्यक तेवढाच वापर करा.

खुप बोलतात ते खुप थोडं करतात.

अमेरीकेला स्वातंत्र मिळवुन देण्याची योजना ४ जुलै १७७६ ला एका बंद हॉलमध्ये छप्पन्न सदस्यांनी बनवली होती. त्या एका मिटींग मधल्या एका निर्णयामुळे अमेरिकेला स्वातंत्र मिळाले.

आपल्याला काय हवयं, हे ज्याला ठाऊक असतं, तोच त्वरित निर्णय घेऊ शकतो. तो व्यक्ती आपल्या शब्दांनी आणि आपल्या कर्तूत्वाने आपलं उदिष्ट वेळोवेळी जगासमोर ठेवतो.

निर्णयाच्या निश्चिततेसाठी साहस लागतं.

पाऊल आठवे – चिकाटी

उदिष्ट्य साध्य करण्यासाठी चिकाटी आवश्यक असते. यशाची तेरा पावलं चालण्यासाठी सुद्धा चिकाटी हवी.

तुम्ही स्वतःचं, एक निश्चित ध्येय आखलं, विचारपुर्वक एक योजना निश्चित केली, आणि स्वतःसाठी सुचना तयार केल्या, पण जोपर्यंत हवी ती संपत्ती तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत हवी ती कृती करण्यासाठी चिकाटी अत्यंत आवश्यक आहे.

स्पष्ट ध्येय, निर्दोष योजना असणारी, आपल्या आजुबाजुला हजारो लोकं अपयशी होतात कारण त्यांच्यात चिकाटीचा अभाव असतो.

संपत्ती आकर्षित करण्यासाठी मनाला तयार करा. इच्छित वस्तुंचं स्पष्ट चित्र तुमच्या मनात उमटु द्या.

तुम्हाला एक घर हवं आहे, ते किती स्केअर फुटाचं आहे, त्याची रचना कशी आहे, ते कसं दिसतं? त्याचा रंग कोणता आहे? हे डोळ्यासमोर असल्यास त्या स्वप्नाचा ध्यास घेणं सोप्पं असतं.

समजा, तुम्हाला एक कार हवी आहे, त्या कारची कंपनी कोणती आहे?, त्या कारचा मॉडेल नं, कलर, किंमत, कारचं मायलेज तुम्हाला माहीत आहे का?, तिची शोरुम कोठे आहे, बुकिंग केल्यावर, ती कार किती दिवसात मिळते? ही सगळी माहीती शोधुन ठेवा, जसं की तुम्ही ती कार खरोखर आत्ता बुक करणार आहात, विकतच घेणार आहात. अशा आनंदाच्या मनस्थितीत वावरण्याची सुरुवात करा.

तुमच्यातल्या बहुतांश जणांनी ‘द सिक्रेट’ व्हिडीओ पाहीला असेल, नसेल पाहीला तर आवर्जुन बघा, त्यात कल्पनेत कार अशी चालवायची हे खुप छान पद्धतीने सांगीतलयं.

थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो, एका निवांत ठिकाणी बसा, आपले दोन्ही हात समोर घ्या, शांतपणे त्यांचं निरीक्षण करा, आता डोळे बंद करा, कल्पना करा, की तुमची ड्रीमकार तुमच्या कडे आहे, तिची स्टीअरींग हातात घ्या, आता कार सुरु करा,

प्रवासाला निघा, गिअर बदला, हॉर्न वाजवा, प्रवासाचा आनंद घ्या, जोरजोरात ओरडा, मनसोक्त वेगाने गाडी चालवा, त्यात हरवुन जा…
मनपसंत कार हातात येत नाही, तोपर्यंत हे करत रहा!

आणि ह्या कृती वारंवार करण्यासाठीच चिकाटी हवी, असे लेखक सांगतोय.

धन्यवाद!

(क्रमशः)

लेखक मोटिव्हेशन संदर्भात व्हाट्सअप वरती विविध कोर्सेस घेतात. त्यासाठी अभिप्रायातून त्यांना सम्पर्क करता येईल.

वाचण्यासारखे आणखी काही….

पंकज कोटलवार यांचा ब्लॉग
अर्थसाक्षर ब्लॉग
उदय पिंगळे यांचा ब्लॉग

विचार करा आणि श्रीमंत व्हा (पुस्तक खरेदीसाठी येथे क्लिक करा)

Think And Grow Rich (Click here to buy book)


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!