तब्बल १३०० वर्षे टिकाव धरून उभं असलेलं सुरुंग टिला मंदिर

भारतात हजारो वर्षापूर्वी नांदत असलेल्या संस्कृतीचे दाखले आपल्याला आजही अनेक ठिकाणी बघायला मिळतात.

मानव हा नेहमीच आपल्यामागे आपल्या प्रतिभेचे दाखले ठेवण्यासाठी अग्रेसर राहिला आहे. अगदी हजारो वर्षापूर्वी ही ह्या गोष्टीला अपवाद नव्हता.

भारत असो वा जग प्रत्येक संस्कृती ने आपल्यामागे आपल्या प्रतिभेची छाप सोडली आहे. भारत हजारो वर्षापूर्वी सगळ्यात संपन्न देश म्हणून अस्तित्वात होता.

अगदी १७ व्या शतकापर्यंत भारताची अर्थव्यवस्था जगातील व्यवहाराचा ९०% अधिक भाग व्यापून होती ह्या वरून भारतातून सोन्याचा धूर निघत असेल हे अतिशोयक्ती वाटत नाही.

कोणतंही भव्यदिव्य काम करायला किंवा प्रगत संस्कृतीचे दाखले निर्माण करताना पैसा लागतो. म्हणूनच ज्या संस्कृतीकडे पैसा आणि अर्थव्यवस्था मजबूत होती तिने आपल्यामागे ठेवलेले प्रतिभेचे दाखले तितकेच उच्च आहेत.

भारत तर जगात त्याकाळी सगळ्यात प्रगत होता. म्हणून इकडे आजही त्या प्रतिभेचे दाखले त्या श्रीमंतीची साक्ष देतात. पण आज डोळे बंद करून जगाच्या जगरहाटीत धावणाऱ्या किती भारतीयांकडे ह्याकडे बघायला वेळ आहे?

किंबहुना आपले पूर्वज असं काही निर्माण करू शकतात ह्यावर त्यांचा विश्वास बसत नाही. काळाच्या ओघात ह्यातले अनेक दाखले परकीय शक्तींनी नष्ट केले तर जे त्यातून बचावले त्याकडे लक्ष द्यायला किंवा ते समजून घेण्याची मानसिकता आपली नाही हे जळजळीत सत्य आपल्याला बघायला मिळते.

भारतात असलेल्या मंदिरांना हजारो वर्षाची परंपरा आहे. प्रत्येक मंदिर हे विज्ञान, तंत्रज्ञान, स्थापत्यशास्त्र ह्या सोबत कलेचा अदभूत अविष्कार आहे.

पण ते बघण्याची दृष्टी आपण गमावून बसलो आहोत हे नक्की. असंच एक जमिनीत दबलेल आणि लपलेलं मंदिर २००६ – २००७ च्या सुमारास ए.एस.आय. चे तत्कालीन प्रमुख डॉक्टर अरुण शर्मा ह्यांनी जगासमोर आणलं.

हे मंदिर अगदी भव्यदिव्य नसलं तरी ह्या मंदिराच्या निमिताने भारताच्या मंदिर बांधणीतील विज्ञान, तंत्रज्ञान किती अत्युच्य होतं ह्याचा प्रत्यय पूर्ण जगाला झाला आहे.

एकीकडे जगातील अनेक वैज्ञानिक इकडे येऊन ह्या मंदिर बांधणीचा अभ्यास करत आहेत पण आपण भारतीय मात्र ह्या मंदिरा बद्दल पूर्णपणे अनभिज्ञ आहोत.

surang tilaसुरुंग टीला (Surung Tila- Chhattisgarh )

सुरुंग टीला (Surung Tila- Chhattisgarh ) हे छत्तीसगडमधील मंदिर आजही भारताच्या एका प्रगत अश्या वैज्ञानिक बांधणीचे दाखले देत तब्बल १३०० पेक्षा जास्ती वर्ष दिमाखात उभे आहे.

हे मंदिर भव्यदिव्य आणि कलाकुसरीत अगदी सर्वोच्च नसलं तरी ह्याचं बांधकाम हे संशोधनाचा विषय झालेला आहे. हे मंदिर पांढऱ्या दगडातून बनवलं गेलं आहे. ह्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ठ म्हणजे ह्याचं भुकंपरोधी बांधकाम.

ह्या मंदिरात ३ मनोरे असून ज्यावर हे उभे आहेत त्या प्लाटफोर्म ची उंची जमिनीपासून साधारण ३०-३५ फुट आहे.

ह्यावर जाण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत त्या बऱ्याच ठिकाणी खचलेल्या आहेत. ११ व्या शतकात आलेल्या भयंकर आणि तीव्र भूकंपात ह्या मंदिराच्या पायऱ्या खचल्या.

ह्या मंदिराच्या परिसरातील सगळं काही नष्ट झालं. पण मंदिराच्या रचनेला कसलीच इजा झाली नाही.

११ व्या शतकात आलेल्या ह्या भूकंपात प्रचंड हानी झाली आणि ह्यामुळेच ह्या भागातून एका संस्कृतीचं अस्तित्व पुसलं गेलं असेल असा कयास बांधला जातो.

पण अश्या प्रचंड भूकंपात फक्त दगड रचून आणि त्यात सिक्रेट पेस्ट वापरून सिमेंट केलेलं बांधकाम कसं टिकून राहिलं?

आज २१ व्या शतकात वापरल्या जाणाऱ्या मजबूत अश्या सिमेंटचं आयुष्य हे साधारण १०० वर्ष पकडलं जाते.

१०० वर्षानंतर सिमेंट हे मातीप्रमाणे होते. म्हणजे बांधकामाला पकडून ठेवण्याची त्याची मजबुती संपते.

आज १३०० वर्षानंतर लहान मोठ्या अश्या कित्येक भूकंपाना पुरून उरत सुरंग टीला मंदिर दिमाखात उभं आहे त्याहीपेक्षा अजून येणारी कित्येक दशकं हे बांधकाम असंच मजबूत राहील असा वैज्ञानिकांचा कयास आहे.

सुरंग टीला मंदिर काळाच्या ओघात टिकून राहण्यामागे ते बांधताना वापरलं गेलेलं विज्ञान, तंत्रज्ञान आणि स्थापत्यशास्त्र कारणीभूत आहे.

हे मंदिर बांधताना जे विज्ञान किंवा पद्धती वापरल्या गेल्या त्याचा उल्लेख ‘मयमतम’ ह्या पौराणिक ग्रंथात केला गेला आहे.

ह्या ग्रंथाचं आयुर्मान साधारण ४५०० वर्षापेक्षा जास्ती आहे. ह्या मंदिराच्या मधोमध अनेक पोकळ असणारे खांब बांधकाम करताना बांधले गेले आहेत. हे साधारण ७५ फुट खोल आहेत.

चारी बाजूने मंदिराची भिंत आणि मध्ये हे पोकळ आत जमिनीत गेलेले अनेक खांब असं का केलं असावं ह्याचं उत्तर जर आपण शोधलं तर ह्या मंदिराच्या बांधकामात किती प्रगत तंत्रज्ञान आणि विज्ञान वापरलं गेलं आहे हे आपल्याला समजून येईल.

बांधकामाच्या मधोमध असणारे हे पोकळ खांब हवेची पोकळी निर्माण करतात. ह्या हवेच्या पोकळीमुळे हे मंदिर भूकंपाचा अतिशय तीव्रतेचा धक्का सहन करू शकते.

हवेच्या पोकळीमुळे भूकंपाच्या वेळेस होणारी हालचाल तसेच निर्माण होणारं बल हे दुसरीकडे वळवले जाते आणि रोखले जाते.

त्यामुळे भूकंपाचा बांधकामाला लागणारा धक्का अथवा हालचाल हि कैक पटीने कमी होते. त्यामुळेच तब्बल १३०० वर्ष हे मंदिर सगळ्या भूकंपांना सहन करू शकलेलं आहे.

आज २१ व्या शतकात भुकंप विरोधी बांधकामात हि पद्धत वापरली जाते. तब्बल ४५०० वर्षापूर्वी लिहलेल्या ग्रंथात भुकंप विरोधी बांधकाम करण्याची पद्धत विषद केलेली आहे तर १३०० वर्षापूर्वी त्या पद्धतीचा आधार घेऊन बांधलेलं मंदिर आजही ते तंत्रज्ञान किती अचूक आहे ह्याची नोंद जगाला घ्यायला भाग पाडत आहेत.

ह्या पोकळ खांबांसोबत ह्या मंदिराच्या बांधणीत वेगळ्या अश्या सिमेंट चा वापर दगड जोडण्यासाठी केला गेलेला आहे. १३०० वर्षानंतरही सिमेंट जसंच्या तसं असून आजही प्रत्येक दगडाला त्याच मजबुतीने जखडून ठेवलेलं आहे.

ह्या बांधकामातील प्रगत तंत्रज्ञानामुळे आजही इतके वर्षानंतर मंदिर काळाच्या कसोटीवर पुरून उभं आहे. भले तो भुकंप असो वा उन, वारा, पाउस.

हे झालं मंदिर बांधणी मागचं विज्ञान पण ज्या ठिकाणी आपण मंदिर बांधत आहोत हे भुकंपप्रवण क्षेत्र आहे ह्याचा अंदाज ते बांधताना केला गेला होता.

मंदिर साधारण ७ व्या ते ८ व्या शतकातील आहे. तर इकडे आलेला भुकंप तब्बल ३००-४०० वर्षानंतर आलेला होता.

म्हणजे मंदिर निर्माणाच्या आधी ह्या बांधकामाचं आयुष्य तितक असेल आणि त्या नंतर सुद्धा अश्या प्रकारच्या नैसर्गिक महाप्रलयाला हे मंदिर टिकून राहील ह्याचा अभ्यास केला गेला होता. हे विज्ञानाशिवाय अशक्य आहे.

दैवी शक्ती आणि इतर गोष्टी असल्या तरी मंदिर बांधकामाची जागा, त्या जागेचा अभ्यास अगदी भूत, वर्तमान आणि भविष्य असा.

त्या नंतर तिकडे असलेल्या नैसर्गिक आपत्ती ची जाणीव आणि त्या प्रमाणे बांधकामात केलेल्या उपाययोजना हे सगळे काय दाखवते?

आज १३०० वर्षानंतर आपण जिकडे पोहचले आहोत तिकडे भारतात आपले पूर्वज त्याहून पुढे होते. हे सगळ एलियन लोकांनी केलं आहे असा एक मतप्रवाह असला तरी एलियन मग भारतात का आले?

त्याकाळी अस्तित्वात असलेल्या इतर संस्कृती कश्या काय वंचित राहिल्या? फक्त मंदिर बांधून एलियन निघून गेले का? हे प्रश्न अनुत्तरीत आहेत.

माझ्या मते आपली संस्कृती प्रगत होती विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत हे जगाला पचवायला जड जाते आहे म्हणूनच एलियन नावाचं गोंडस बाळ जन्माला घातले जाते.

मुळात जिकडे भारतीयांना आपल्या पूर्वजांच्या तंत्रज्ञान आणि विज्ञानावर विश्वास नाही तिकडे जगाला काय सांगणार. कधी जमल्यास नक्की ह्या मंदिराला भेट द्या.

फक्त एकच काळजी घ्या की मंदिरावर चढून सेल्फी आणि फोटो च्या मोहात त्याच पावित्र्य कमी होईल असं काही करू नका.

तसंच त्याचं बांधकाम आणि ऐतिहासिक महत्त्व आपण कमी करत नाही ह्याची काळजी घ्या. आपल्या प्रगत संस्कृतीचा ठेवा आपल्या पुढच्या पिढीकडे देण्याची जबाबदारी एक भारतीय नागरिक म्हणून लक्षात ठेवा.

Manachetalks

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय