किर्लोस्कर ब्रदर्स बस नाम ही काफी हैं…. (Thiland Cave Rescue)

१० जुलै २०१८ ला थायलंड इकडे संपलेल्या १८ दिवसांच्या थरार नाट्यानंतर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. काय? कसं? केव्हा? झालं ते त्या मुलांची सुटका ह्यावर अनेक प्रसारमाध्यामतून अनेकांनी वाचलं असेल पण ह्या सगळ्या घडामोडीत भारताच्या किंबहुना एका मराठी उद्योजकाच्या कंपनी ने आपलं महत्वाचं योगदान देऊन त्या १२ जणांचे प्राण वाचवण्यास मदत केली आहे. किर्लोस्कर ब्रदर्स ह्या एकमेव भारतीय कंपनी च्या अधिकाऱ्यांनी ह्या रेस्क्यू मिशन मध्ये भाग घेतला होता.

आपल्या फुटबॉल कोच सह मुलं जिकडे गुहेत अडकलेली होती त्या ठिकाणी पोहचण्यासाठी गुहेतून पाणी काढून टाकणं गरजेचं होतं. पाणी काढण्यासाठी जेव्हा पंप चा विचार केला गेला तेव्हा ह्या क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केलेल्या एकाच कंपनीचं नाव समोर आलं ते म्हणजे किर्लोस्कर ब्रदर्स. १८८८ साली महाराष्ट्राच्या पुण्यात स्थापन झालेल्या ह्या कंपनी ला तब्बल १३३ वर्षांचा वारसा आहे. लक्ष्मणराव किर्लोस्कर ह्यांनी १८८८ मध्ये कंपनी ची स्थापना केली. शंतनुराव किर्लोस्कर ह्यांनी आपल्या वडिलांकडून कंपनी ची सूत्रे हाती घेतल्यावर किर्लोस्कर ब्रदर्स हे नाव जगभर पोहचले. १९५० – १९९१ ह्या काळात कंपनी ची वाढ ३२,४०१% टक्के इतकी अवाढव्य होती. ह्यावरून शंतनुराव किर्लोस्कर ह्यांनी अक्षरशः शून्यातून विश्व निर्माण केलं असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. हि वाढ भारताच्या औद्योगिक इतिहासात सर्वाधिक आहे. पंप, इंजिन, कॉमप्रेसर, लेथ मशीन तसेच इतर विविध गोष्टी कंपनी बनवत असली तरी किर्लोस्कर पंप जगातील एक सर्वोत्तम पंप गणले जातात. अगदी ०.१ किलोवॉट पासून ते २६ मेगावॉट पर्यंत सगळ्या शक्तीचे पंप बनवताना ह्या कंपनी चे शक्तिशाली पंप ३५,००० लिटर / प्रती सेकंद ह्या वेगाने लिक्विड पंप करू शकण्याची क्षमता राखून आहेत. ह्यामुळेच जेव्हा थायलंड मध्ये गुहेत अडकलेल्या मुलांची सुटका करण्यास गुहेत असलेल्या पाण्याची अडचण थायलंड सरकार समोर आली तेव्हा थायलंड सरकारने किर्लोस्कर ब्रदर्स ने मदत करण्यासाठी भारत सरकारकडे अनुमती मागितली आणि भारत सरकारने ह्याला मान्यता दिल्यावर किर्लोस्कर कंपनीकडे युद्ध पातळीवर आपल्या नावाला पुरून उरण्याची जबाबदारी आली.

प्रसाद कुलकर्णी आणि श्याम शुक्ला ह्या दोन भारतीयां सोबत इतर ५ जणांची टीम बनवण्यात आली. दोन भारतीय, एक नेदरलँड्स देशाचा सदस्य, एक युनायटेड किंगडम देशाचा सदस्य आणि इतर थायलंड मधील अधिकारी अशी टीम ५ जुलै ला त्या जागी पोहचली. ४ किलोमीटर लांबीच्या गुहेतून पाण्याचा निचरा करण्याचं लक्ष किर्लोस्कर च्या टीम कडे देण्यात आलं. सतत होणारा पाउस आणि अतिशय चिंचोळा भाग आणि जनरेटरवर मिळणारी कमी अधिक दाबाची इलेकट्रिक उर्जा ह्यामुळे जास्ती क्षमतेचे पंप बसवणे कठीण असताना वेळ खूप महत्वाची होती. हि गुहा अतिशय दुर्गम असून त्यात ९० अंशांची वळणं होती. तसेच प्रसंगी स्कुबा डायवर ला कठीण वाटणाऱ्या पाण्याखालून त्या मुलांची सुटका करणं हे खूप मोठ दिव्य होतं. पाणी कसं बाहेर काढता येईल ह्याची योजना आखून टीम ने कामाला सुरवात केली. आपल्या नावाला जागताना किर्लोस्कर च्या भारतीय बनावटीच्या पंपानी आपली कामगिरी फत्ते करताना योग्य त्या वेळेत पाण्याचा निचरा केल्याने स्कुबा ड्रायव्हर ला मुलांपर्यंत तर मुलांची सुखरूप सुटका होईपर्यंत हे पंप पूर्ण क्षमतेने गुहेतील पाण्याची पातळी कमी करत होते.

अगदी कमी वेळात, अपुऱ्या साधन संपत्ती मध्ये भारताच्या किर्लोस्कर ब्रदर्स च्या टीम ने ह्या मुलांच्या सुटकेत पडद्यामागची महत्वाची भूमिका बजावली. सर्व मुलांची सुखरूप सुटका झाल्यावर थायलंड सरकारने भारत सरकारचे आभार मानताना त्यात खास करून किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीचे आभार मानले. एका मराठी उद्योजकाने उभारलेल्या छोटाश्या रोपट्याने आज इतका नावलौकिक कमवावा हे निश्चित एक भारतीय आणि मराठी माणूस म्हणून सुखावणारे आहे. किर्लोस्कर ब्रदर्स ने ह्या हि आधी जागतिक पातळीवर गुणवत्तेचा आदर्श ठेवला आहे. किर्लोस्कर ब्रदर्स ने जगातील सर्वात मोठा इरिगेशन प्रोजेक्ट सरदार सरोवर गुजरात इकडे बनवला आहे. किर्लोस्कर ब्रदर्स चे पंप भारताच्या अणुभट्टीत हेवी वॉटर पंप करण्यासाठी वापरले जातात. अणुभट्टीत जिकडे वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा गुणवत्ते कस लागतो तिकडे किर्लोस्कर पंप खरे उतरतात ह्यावरून किर्लोस्कर ब्रदर्स बस नाम ही काफी हे.. हे अगदी खरं वाटते.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय