अश्रूंची किंमत… (Dhind Express- Hima Das)

राहण्यासाठी जागा नसताना प्रतुल शर्मा नावाच्या एका डॉक्टर ने तिच्या राहण्याचा खर्च आणि जागा आपल्या पद्धतीने मदत मागून उभी केली. एका भात पिकवणाऱ्या साध्या, गरीब शेतकरी कुटुंबातून आलेल्या हिमा चा प्रवास इतका खडतर आहे कि आज तिला पदक घेताना तो १८ वर्षाचा काळ त्या २ मिनिटात पूर्ण आठवला असेल.

आय.ए.ए.एफ. च्या फिनलंड इथल्या २० वर्षाखालील स्पर्धेत भारताच्या हिमा दास (Hima Das) ने वयाच्या १८ व्या वर्षी इतिहास घडवताना ४०० मीटर स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं. ५१.४६ सेकंदाची वेळ नोंदवताना हिमा ने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. कोणत्याही धावणाच्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला ती बनली. दुसऱ्या क्रमांकावर आलेली रोमानिया ची आंड्रेया मिकोलोस ने नोंदवलेली वेळ ५२.०७ सेकंदाची होती तर ही स्पर्धा जिंकण्याची दावेदार असलेली अमेरिकेची टायलर मेंसन ५२.२८ सेकंदाची वेळ नोंदवत तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली. हिमा आणि दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या धावपटू मधील वेळेच अंतर ०.६१ सेकंदाने जास्ती होतं. भारताच्या पी.टी.उषा ला १ शतांश सेकंदाने एका जागतिक स्पर्धेत पदक हुकल असताना ०.६१ सेकंद वेळेचा फरक हिमा च्या धावण्यातील कौशल्य अधिक अधोरेखित करत आहे.

पदक स्वीकारुन झाल्यावर भारताचे राष्ट्रगीत चालू झाल्यावर हिमा च्या डोळ्यातून अश्रू वाहताना अनेक लोकांनी बघितलं असेल. राष्ट्रप्रेमाची आणि देशाच्या अभिमानाची झलक त्या अश्रूतून दिसत असली तरी त्यामागे १८ वर्षाचा प्रवास आहे. पदक जिंकल्यावर हिमा ने काढलेले शब्द भारताच्या खेळातील आणि खेळांडूवरील दृष्टिकोनावर मार्मिक भाष्य करून जातात. “While you all were sleeping, I rocked the world“ आपल्या वडिलांशी फोन वर बोलताना काढलेले हे शब्द एका वेळेस दोन्ही गोष्टी सांगतात. एकतर हिमा दास नावाची कोणी भारतीय धावपटू अश्या एखाद्या जागतिक स्पर्धेत भाग घेते आहे हे भारतीयांच्या ध्यानीमनी ही नव्हतं. कोणाच्या खिजगणतीत नसलेली हेमा दास अचानक सर्व भारतीयांच्या चर्चेचा विषय बनते हा दुसरा भाग. एकीकडे गर्व, आनंद होता तर दुसरीकडे आपल्या खेळाला दुजाभाव दिल्याची भावना.

आसाम मधल्या ढिंग ह्या छोटाश्या गावातून आलेली हिमा दास तिच्या गावात “ढिंग एक्स्प्रेस” म्हणून ओळखली जाते. लहानपणापासून खेळाची आवड असलेली हिमा अगदी २ वर्षा आधीपर्यंत फुटबॉल टीम मध्ये येण्यासाठी प्रयत्न करत होती. फुटबॉल खेळताना तिचा धावण्याचा वेग बघून तिच्या कोच ने तिला धावण्यात करियर करण्याचा सल्ला दिला. ढिंग सारख्या गावातून तिला एकटीला गुवाहाटी ला यावं लागलं. राहण्यासाठी जागा नसताना प्रतुल शर्मा नावाच्या एका डॉक्टर ने तिच्या राहण्याचा खर्च आणि जागा आपल्या पद्धतीने मदत मागून उभी केली. एका भात पिकवणाऱ्या साध्या, गरीब शेतकरी कुटुंबातून आलेल्या हिमा चा प्रवास इतका खडतर आहे कि आज तिला पदक घेताना तो १८ वर्षाचा काळ त्या २ मिनिटात पूर्ण आठवला असेल.

एक परिपूर्ण असणाऱ्या धावपटूला साधे बूट घेण्यासाठी पैसे नाहीत पण तिकडे एक दोन वेळा १०० रन केलेल्या टुकार खेळाडूसाठी लोकं १० कोटी मोजतात. उघड उघड धंदा केलेल्या खेळासाठी लोक रात्र रात्र जागून खेळ बघतात आणि त्यात देशाची अस्मिता शोधतात. कोण जिंकला, कोण हरला, तर कोणी कोणाला किती कोटी रुपयांना विकत घेतलं हे माहित असूनसुद्धा त्याला खेळ म्हणतात ह्याच मला तरी आश्चर्य वाटते. त्याहीपेक्षा त्याला देशाची अस्मिता जोडली जाते हे अजून विदारक आहे. एकाच खेळाच्या भोवती १३० कोटी भारतीय फिरत असताना एका छोट्या गावातून येऊन देशाच प्रतिनिधित्व एका जागतिक स्पर्धेत करणाऱ्या हिमा दास बद्दल आम्ही खेळात देशाचा सो कॉल्ड अभिमान शोधणारे सामान्य भारतीय अनभिज्ञ असतो ही ह्या देशाची शोकांतिका आहे. कोणीतरी आपल्या कौशल्याने देशाच नाव एथेल्याटीक्स मध्ये उंचीवर नेल्यावर त्याच खेळाशी संलग्न संस्था त्या खेळाडूला इंग्रजी बोलता येत नाही ह्यावर ट्वीट करते. बर ते लिहताना त्यातही स्पेलिंग मिस्टेक करते. नंतर माफी मागून सारवासारव करते. ह्यापेक्षा एका खेळाडूच ह्युमीलीयेशन असू शकत नाही.

जिकडे देशाच्या खेळासाठी संलग्न असणाऱ्या संस्था जेव्हा आपल्याच खेळाडूंना अशी वागणूक देतात तेव्हा कोणत्या तोंडाने आपण मेडल च्या गोष्टी करणार आहोत? आता दोन तीन दिवस चर्चा होईल. कोणीतरी नेता, राज्य अनेक कोटीची मदत हिमा ला जाहीर करतील. कोणीतरी स्पोर्ट्स साठी जागा उपलब्ध करून देईल. पण काही दिवसांनी नक्की कोणाला काय मिळालं हे जगाच्या जगरहाटी मध्ये लुप्त होईल. ह्याला आपण भारतीय पण जबाबदार आहोतच की मेस्सी, रोनाल्डो, उसेन बोल्ट, घडवा पण बाजूच्या घरात माझ्या मुलाने मात्र सचिन तेंडूलकर व्हायचं ह्यासाठी खेळ सुरु होण्याअगोदर लाखो रुपयांचं क्रिकेट कीट हातात देत प्रशिक्षण देणारे आपणच भारतीय आहोत. कारण इतर खेळात पैसा नाही. इकडे काय साधी एक आय.पी.एल. खेळला तरी आयुष्याच कल्याण झालं. माझा क्रिकेटवर राग नाही पण धंदा बनलेल्या क्रिकेटचा नक्कीच राग आहे.

हिमा दास चे ते अश्रू खूप काही मला सांगून गेले एका सामान्य कुटुंबातून असामान्य प्रवास केल्यावर आपल्या कार्याची दखल म्हणून देशाच राष्ट्रगान म्हंटल जाते हे कोणासाठी ही अभिमानाची गोष्ट आहेच. पण त्या पलीकडे हिमाचा एकटीने, जिद्दीने केलेल्या प्रवासाची परिपूर्णता त्या अश्रून मधून सगळ्यांच्या समोर आली हे नक्की. त्यात तिचा प्रवास होता ज्यात धावण्याच्या सरावासाठी जागा उपलब्ध करण्यापासून ते लोकांकडून पैसे मागून भाड्याच एक घर उपलब्ध करून देण्यापर्यंत. म्हणून हिमा दास जेव्हा तिच्या कोचशी फोनवर बोलली. तेव्हा तिचे शब्द होते “What have I done?” त्या अश्रूंची किंमत हिमा दास ला तर नक्कीच कळली असेल पण माझ्या सारख्या किती भारतीयांना कळली हा मोठा प्रश्न आहे.

वाचण्यासारखे आणखी काही…..

माणसं जोडावी कशी? …. (भाग ३)
सुंदर ते ध्यान!
निर्भय बना!


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय