आनंदी जीवनाचे पंचवीस सोपान…..

मन आणि विचार शुद्ध असतील, तरच मन शांत होईल, आतमध्ये नेहमी प्रेमाच्या भावना उचंबळुन येतील, इतरांशी आपले संबंध सुदृढ बनतील, त्यासाठी करावयाच्या पंचवीस कृती, आज मी तुम्हाला सांगणार आहे. (How to become happy in life?)

१. आपल्या आयुष्याचं बारकाईनं अवलोकन करा, आपल्या आतमध्ये निरखुन बघा, आणि बाहेरच्या जगाचही बारकाईनं निरीक्षण करा!

दिवसभर आपल्या मनात कसल्या ना कसल्या भावनांचं थैमान घालणं, सतत सुरुच असतं, त्याकडे नितळपणे पाहता आलं पाहीजे. राग, क्रोध, स्वार्थ, द्वेष, प्रेम, प्रसन्नता असं काय आहे आपल्या मनाच्या खजिन्यात? आणि बाहेरच्या जगात काय चालु आहेत? कसे आहेत आपल्या आजुबाजुचे लोक? कसे वागतात? कसे बोलतात? कसा विचार करतात?

बस्स! निरीक्षण करावं!

२. नेहमी लक्षात असु द्यावं, की जीवन खुप खुप छोटुसं आहे आणि विश्वास बाळगावा, की दिवस पालटतात!

कुणास ठाऊक, कोणता दिवस आपला शेवटचा दिवस असणार आहे? मग कशाला मने दुखवायची? कशाला हेवेदावे ठेवायचे? कुणाशी वैरभाव बाळगायचा? टॉकटाईम संपण्याआधी सगळ्या प्रियजनांशी मोकळेपणाणे रोज मनसोक्त बोलत जाऊ की!

एकेक क्षण अनमोल आहे, त्याचा स्वतःसाठी आणि इतरांसाठी सदुपयोग करुया.

३. नेहमी हसणं तब्येतीला चांगलं!

असं हसावं, की इतरांनी आपल्याकडे बघुन म्हणावं, ते बघा, आयुष्य किती सुंदर आहे, आणि असं हसवावं, लोकांनीही स्वतःच्या आयुष्यावर प्रेम करायला शिकावं.

जेव्हा आयुष्य तुम्हाला दुःखाची शंभर कारणं दाखवतं, तेव्हा आयुष्याला हसण्याची हजार कारणे दाखवुन द्या. सतत हास्य बाळगल्याने, सगळ्या चिंता पळुन जातात.

४. उत्साहाने जगा, आणि इतरांची स्तुती करण्याच्या संधी शोधा!

दिवसातली प्रत्येक कृती उत्साहाने करावी, ओझं म्हणुन नको. छोटे छोटे आनंदाचे क्षण साजरे करावेत. उत्साह ही जगातली सर्वात मोठी शक्ती आहे, ज्याच्याजवळ जास्तीत जास्त उत्साह आहे, तोच जिंकतो.

५. ‘ध्यान’ जीवनावश्यक आहे!

थोडासा वेळ काढुन स्वतःच्या आतमध्ये, मौनात जावे. बळ मिळेल, तुमच्या मनाची शोभा वाढेल, स्वतःप्रति, इतरांप्रति, आतुन निखळ प्रेमाचे निर्भेळ झरे वाहायला लागतील. हाच तर, आपला, आपल्या चेतनेचा मुळ स्वभाव आहे.

६.जगातली सर्वात सुंदर गोष्ट, स्वतःच्या आतमध्ये रममाण होणं!

आपल्या आतमध्येच परम-आनंदाची कारंजी दडलेली आहेत, सत्य आहे, प्रकाश आहे, आणि प्रेम आहे. तिथे कसलाच अपराध नाही आणि कूठलेच भयही नाही.

आतापर्यंत मनोवैज्ञानिक देखील मनाच्या तळाशी पोहचु शकले नाहीत, इतकं गुढ आहे आपलं मन!

७. लोकांसोबतचा आपला संपर्क आणि संबंध, प्रभावशाली असावा.

दुसर्‍यांच्या आनंदात सहभागी झालं की, हर्ष आणि आनंद दुर जाऊ शकत नाहीत आणि दुसर्‍यांचं दुःख पाहुन उदास झाल्यास, स्वतःची दुःख जवळ येऊ शकत नाहीत.

८. आपल्या माणसांसाठी वेळ काढाच!

आपल्या जवळच्या माणसांसाठी वेळ काढा, नाहीतर जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा आपली वाटणारी माणसंच जवळ नसतील.
आयुष्य हे चित्रासारखं आहे, मनासारखे रंग भरत गेलं की ते फुलासारखं खुलुन दिसतं.

९. आजुबाजुच्या जगाला अजुन सुंदर बनवणं, आपल्याच हातात असतं!

माणसांत रस घेतला की जग सुंदर बनतं, चांगल्या विचारांनी जगता आलं तर आयुष्य खुप सुंदर बनतं, माणसाला माणुस जोडण्याची कला आली की आयुष्य खुप सुंदर बनतं.

उन्ह कितीही प्रखर असलं तरी समुद्र आटवु शकत नाही.
उठा! प्रसन्नपणे जगाला सामोरे जा, प्रत्येक दिवसात चमकण्याच्या आणि खिदळण्याच्या संधी दडलेल्या आहेतच.

१०. आपल्या भावनांना शुद्ध बनवलं, की आपोआप आनंद मिळतो.

समय कठिण आहे, तर आव्हानाचा आनंद व्यक्त करा, एखादी लढाई हरलात तर खुप काही शिकलो म्हणुन आनंद व्यक्त करा, तुमच्यावर कोणी जळतयं तर स्वतःचं कौतुक करुन आनंद व्यक्त करा,

ध्येय अवघड आहे, असं वाटल्यास ‘आपण किती ग्रेट आहोत’ कारण आपण असाध्य ते साध्य करण्याचं स्वप्न पाहतोय, हे आनंदाचं कारण शिल्लक राहतचं!

आनंद ही एक शुद्ध भावना आहे, जी वाईट काळातही निर्माण केली जाऊ शकते.

११. ध्येय निश्चित करा. (अल्पकालीन आणि दीर्घकालीन दोन्ही)

ध्येयावर न पोहचणे ही शोकांतिका नाही, पोहचण्यासाठी ध्येयचं नसणं, ही खरी शोकांतिका आहे. तुमच्यात प्राप्त करण्याची हिंमत असेल तर तुमचं प्रत्येक स्वप्न पुर्ण होवु शकतं.

आणि ध्येय इतकं भव्य ठेवावं, की पराभुत झालो तरी, आपण इतरांपेक्षा जास्तच उंची गाठलेली असेल.

१२. ‘प्रार्थना’ हे प्रभावी वेदनाशामक औषध आहे.

प्रार्थना हे जगातलं सर्वात शक्तिशाली वायरलेस कनेक्शन आहे. सत्याचा सत्याशी संवाद आहे. एखादी गोष्ट करण्यात आपण असमर्थ ठरलो तर त्याला शब्दांत बांधुन प्रार्थनेच्य स्वरुपात देवाजवळ पाठवा, भगवंत प्रत्येकाच्या ह्र्द्यीचे भाव जाणतो आणि त्याला प्रत्यक्षात आणतो.

१३. आवश्यकता असेल तिथे नक्की बदल घडवा, भिऊ नका!

पटत नाहीत आणि खटकतात, त्या गोष्टी साहस करुन, पुढाकार घेऊन बदलाव्याच लागतात, कधी स्वतःमधल्या, कधी इतरांमधल्या!..

कोणताही बदल सुरुवातीला नकोसा असतो, थोड्या वेळाने त्याच्यातले दोष दिसतात पण शेवटी तोच बदल हवाहवासा वाटु लागतो.

१४. आपल्या मर्यादा ओळखा!..

मर्यादा आस्तित्वात आहेत का मर्यादा आहेत हा भ्रम आहे? आपण स्वतःला घातलेली बंधनच आपल्याला रोखु शकतात, तेव्हा मर्यांदाना ओळखा, त्यांच्या जागा ओळखा, बंधने तोडा, आणि वाटचाल करत रहा!

१५. ‘मित्र’ अनमोल असतात, त्यांना हरवु देऊ नका!

देव ज्यांना रक्ताच्या नात्यात बांधायला विसरतो, त्यांना मित्र म्हणुन पाठवतो. मनातलं ओझं कमी करण्याचं, हक्काचं ठिकाण म्हणजे मैत्री!..

१६. उत्कृष्ट अवश्य बना, उत्कृष्टतेच्या हव्यासाचं ओझं बाळगु नका!

आपण आपलं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केव्हा करु शकतो, माहितीये? जेव्हा आपण कसल्याही तणावात नसतो, तेव्हाच आपलं मन त्या कामामध्ये पुर्णपणे एकाग्र होतं!

क्रिएटीव्हीटी आणि स्ट्रेस दोन्ही एका वेळेस एका मेंदुत नांदुच शकत नाही. त्यामुळे तणाव झटकुन मुक्त व्हा! आता जे काम कराल, त्यात शंभर टक्के मन लावा.

१७. आपण असं काही अजब बनावं, की कोणी आपली भविष्यवाणी करुच शकु नये!

स्वतःच्या भविष्याबाबत ना, आपण खुप जिद्दी आणि महत्वकांक्षी असावं, पठडीबाहेर, चाकोरीबाहेर जाऊन जीवन जगण्याची उर्मी, सळसळ असावी. रोज रोज अनुभवावी! रोज नवीन काहीतरी शिकत जावे, नवनवीन कल्पनांना जन्म द्यावा, भविष्य अनप्रेडीक्टेबल असलं की आपल्याला जगायला मजा येते,

आणि इतरांना आपल्या आयुष्याचं अवलोकन करायला मजा येते.

१८. हसा, हसवा विनोदी बना!

तुमच्या साध्या हसण्यामध्येही जादु आहे, आगळी वेगळी जादु आहे, ती तुम्हाला अंतरातली सगळी दुःखे विसरायला भाग पाडते.

स्मित-हास्य हाच जीवनाचा अनमोल खजिना है, सतत स्मितहास्य बाळगण्याची सवय लावुन घेतल्यास, परिस्थिती कशीही असो, तुम्ही यशस्वी व्हाल!

१९. चुकांना घाबरु नका!

आपण चुका करत नाही, बस्स!, आपले छोटे छोटे आनंदी अपघात होतात, चुकांपासुन शिकण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे, दुसर्‍या कोणावर चुकीचे खापर फोडण्याऐवजी, चुक झाल्याचे मान्य करा.

चुका करा, त्यापासुन शिका, पुढची वाटचाल करा.

२०. पुर्वाग्रह सोडुन द्या!

भुतकाळाचं ओझं सतत मनावर वागवल्यास, नुकसान कोणाचं आहे? ‘हा असा’, ‘ती तशी’, ‘हे अशेच’ असली लेबलं मनातल्या मनात लावुन आपण मुक्तपणे, निखळ संवाद साधु शकणार नाहीत.

कॉम्पुटरसुद्धा टेम्पररी फाईलच्या ओझ्याने हळुहळु चालु लागतं, त्याला फास्ट करण्यासाठी नको असलेल्या फाईल डिलीट माराव्या लागतात ना!..

२१. स्वतःला धन्य धन्य समजा.

धन्यवाद ही सर्वात लहान पण सर्वात शक्तीशाली प्रार्थना आहे. आभार मानन्यासाठी फक्त निमित्त शोधा!

बायबलमध्ये एक वचन आहे, जो आभारी असेल त्याला आणखी दिलं जाईल, जो कृतज्ञ नसेल, त्याच्याकडुन जे त्याला दिलं गेलं असेल, तेही काढुन घेतलं जाईल. मग ते पैसा असेल, आरोग्य असेल, रोजच्या वापरातील आवश्यक वस्तु असतील किंवा आजुबाजुची प्रेमळ माणसं असतील.

दिवसातुन प्रत्येक क्षणी, मनाच्या कणाकणातुन धन्यभागी असल्याची अनुभुती घेऊन बघा! मनाच्या गाभार्‍यात, दिव्यतेचा, अदभुत आनंदाचा अनुभव येईल!

आपल्याला मिळालेली प्रत्येक गोष्ट ही भगवंताने पाठवलेला प्रसाद आहे, असं समजल्यास, आपली प्रत्येक तक्रार पळुन जाईल!

२२. दया-कर्म आणि इतरांची सेवा करण्यासाठी फक्त संधी शोधा!

तुम्ही केलेलं कोणतंही निस्वार्थपणे केलेले काम आठवुन बघा, जसं की एखादं श्रमदान, किंवा एखाद्या गरजुला केलेली मदत!

कोणत्याही मोबादल्याशिवाय केलेले काम, अमुल्य असं आत्मिक समाधान देऊन जाते, कधीनाकधी हा अनुभव तुम्ही घेतला असेलच.

२३. नेहमी विद्यार्थी अवस्थेत असणं, किती छान असतं!

जिज्ञासा, कुतुहुल हे दोघे साथीदार आपल्याला नवनवीन कला, शास्त्रे शिकण्यासाठी प्रोत्साहन देतात. नवीन काहीतरी शिकणं, किती आनंददायी असतं!

२४. स्वप्न अशक्याला शक्य करुन दाखवणारं असावं.

पुरेसं साहस असलं की अशक्य, असाध्य वाटणारं स्वप्नही एक ना एक दिवस नक्की पुर्ण होतं. या रस्त्यावर हिम्मत हरुन चालत नाही, न थकता, हसतमुखाने, दृढनिश्चयासह स्वप्नपुर्ती होईपर्यंत, वाटचाल करत रहावी लागते.

२५. रोज रात्री, आजच्या दिवसात काय काय मिळवलं, याचं मुल्यांकन करावं.

वेळ एखाद्या वाहत्या नदीसारखा असतो, कारण एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करु शकत नाही, एकदा गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही.

रात्री झोपताना, दिवसातले आनंदाचे प्रसंग आठवल्यास, पुन्हा एकदा आनंद दरवळतो, आणि काही कटु प्रसंग घडले असतील, ते कसे टाळता आले असते, याचा गंमतीशीर अभ्यास करावा.

स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी आपण सतत आतुर असायला हवे!

“मी रोज प्रत्येक बाबतीत अधिकाधिक चांगला होत आहे.”

धन्यवाद!..

मनाचेTalks च्या वाचकांच्या प्रतिक्रिया

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

7 thoughts on “आनंदी जीवनाचे पंचवीस सोपान…..”

  1. खूप छान लेख आहे सर
    सर मला मोटिव्हेशन संदर्भात कोर्स करायचा आहे

    Reply
  2. Khupach channnn लेख
    धन्यवाद Sir 🙏🙏🙏 asha सुंदर लेखासाठी
    Ani अनमोल मार्गदर्शन साठि कारण positive राहण्यासाठी या ghosti आजच्या घडीला खूप उपयोगी पडतात
    तुमचे sagle ch लेख प्रेरणाdayi संकट prasangi /negative vatat asel अशावेळी navin hopes देतात अणि मनाला एक नवीन उभारी मिळते
    नमस्कार तुम्हाला अशा अनमोल मार्गदर्शन साठी 🙏🙏🙏

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय