विचार करा आणि श्रीमंत व्हा! – भाग ३ (Think And Grow Rich)

“जीवनाच्या खेळात, वेळ आपली प्रतिस्पर्धी म्हणुन उभी आहे, जिला अनिर्णय अजीबत स्वीकार्य नाही”, तेव्हा, उठा, श्रीमंत बनण्यासाठी आजपासुनच ताबडतोब कामाला लागा!…….

आपल्याला इच्छा आहे तेवढी संपत्ती कमावण्यासाठी, कोणकोणते गुण आवश्यक आहेत, याविषयी नेपोलियन हिल याने विचार करा आणि श्रीमंत व्हा, ह्या पुस्तकामध्ये पंधरा पावले सांगितली आहेत. मागच्या दोन भागात (मागील भागांचे दुवे लेखाच्या शेवटी दिलेले आहेत) मी आठ पावलांचं वर्णन केलं होतं, आज पुढचा मार्ग प्रस्तुत करत आहे.

पाऊल नववे – मास्टर माईंडची शक्ती वापरा!..

संपत्ती कमवण्यासाठी संघटित, सुव्यवस्थित कृती कराव्या लागतात, वेळोवेळी सुसंवाद घडवण्यासाठी आणि निश्चित उदिष्ट्य साध्य करण्यासाठी दोन किंवा अधिक लोकांची आवश्यकता असते.

संपत्ती जमा करण्यासाठी एक शक्तीचा अखंड स्त्रोत निर्माण करणं आवश्यक आहे, आखलेल्या व्यापक स्तरावरच्या आणि मोठ्या प्रमाणावर राबवायच्या योजना, मनाची बण्धने तोडुन, प्रत्यक्षात आणण्यासाठी आपला एकट्याचा मेंदु पुरेसा शक्तिशाली नसतो, तेव्हा इतर काही जणांचं सहकार्य लाभल्यास अनेक पटीने उर्जा आणि शक्ती निर्माण होते, ह्यालाच लेखकानं मास्टर माईंडची शक्ती असं नाव देतो.

दोन व्यक्ती, एक निश्चित हेतु समोर ठेवुन, प्रामाणिक संवाद साधतात, आपलं ज्ञान वापरतात आणि कृती करतात, तेव्हा एक अमुर्त, अदृश्य अशी एक तिसरी शक्ती निर्माण होते!

श्रीमंत लोक आपल्या अवतीभवती अशी विश्वासु माणसं तयार करण्यात यशस्वी होतात, ज्यांच्याशी ते आपल्या ध्येयपुर्तीसाठी बनवल्या जाणार्‍या आराखड्याविषयी चर्चा केल्याने प्रोत्साहित होतात. एन्ड्रु कार्नेजी यांनी आपल्या यशाचं श्रेय आपल्या पन्नासहुन अधिक जणांच्या मास्टर माईंड समुहाला दिलं होतं.

कमी कालावधीत, प्रचंड श्रीमंत झालेल्या, प्रत्येकाने कळत नकळत ही मास्टरमाईंडची शक्ती वापरलेली असते. तेव्हा आपल्या विश्वासाच्या व्यक्ती निवडा, त्यांना आपलसं करा, आणि चर्चेतुन त्यांच्याकडून आपल्या स्वप्नपुर्तिसाठी उर्जा आणि सहकार्य मिळवा.

एका बॅटरीच्या वेगवेगळ्या संचापेक्षा अनेक बॅटर्‍यांचा समुह जास्त सक्षम असतो, कारण समुहात जोडल्यावर प्रत्येक बॅटरी क्षमतेपेक्षा जास्त उर्जा निर्माण करते, अगदी याच तत्वाचा वापर करुन जे लोक अवतीभवती बुद्धिमान लोकांना बाळगतात, त्यांच्यात अधिकची शक्ती निर्माण होते.

हेन्री फोर्ड आणि थॉमस अल्वा एडीसन दोघांची मैत्री झाली, दोघेजण अनेकदा आपल्या व्हिजनविषयी एकमेकांशी वारंवार खुली चर्चा करायचे आणि तेव्हापासुनच दोघांच्याही उत्कर्षाची सुरुवात झाली, तेव्हा आपणही यशस्वी किंवा आपल्याबद्द्ल आपुलकी असणार्‍या माणसांशी मास्टर माईंड संपर्क स्थापन केलाच पाहिजे.

सकारात्मक विचारांचा प्रवाह जितका ताकदवान असेल तितका संपत्तीचा ओघ देखील प्रवाही असतो.

पाऊल दहावे – कामवासनेचं रुपांतर उर्जेमध्ये करा.

वासनेत एक प्रचंड शक्ती आहे, या भावनेने प्रेरित झालेले लोक प्रचंड कृत्य करण्यास उद्युक्त होतात, अत्यंत महान उपलब्धी मिळवलेल्या लोकांनी आपल्या कामवासनेचं रुपांतर उर्जेमध्ये करण्याची कला साधलेली असते.

प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एक स्त्री असते, हे वाक्य उगीच जन्माला आलेलं नाही, जीवनात आश्चर्यजनक पद्धतीने संपत्तीवान झालेले लोक, महान लेखक, कवी, संगीतज्ञ, कलाकार, खेळाडु, नेते आणि आपपल्या क्षेत्रात शिखरावर पोहचलेले लोक, त्यांच्या जीवनाचा लेखकानं अभ्यास केल्यास, त्यांना असं आढळुन आलं की त्यातील बहुतांश लोकांना, एका स्त्रीकडुन प्रेरणा भेटत होती.

माणसाच्या किंवा प्राण्याच्या कामवासनेच्या ग्रंथी नष्ट झाल्यास, त्याच्यातल्या काहीतरी करुन दाखवण्याचा, कर्तेपणाचा स्त्रोतही नष्ट होतो. जसं वंध्यत्व आलेला बैल, गाईसारखा सरळसुत बनतो, तसंच, वंधत्व आलेले स्त्रीपुरुषही आपली लढाऊ वृत्तीच हरवुन बसतात.

कामवासनेची भावना, कुठल्याही प्रकारच्या मानसिक उत्तेजनांपेक्षा सर्वात तीव्र आणि शक्तिशाली आहे. नदीला महापुर आल्यास, ती रौद्र रुप धारण करुन गावच्या गाव उद्धवस्त करते, पण त्याच नदीला बांध घालुन, धरण बांधुन अडवल्यास, ती सर्वश्रेष्ठ सर्जनही करते, कामवासनेला अनिर्बंध न होवु देता, तिचं निर्मितीक्षम कल्पनाशक्तीत रुपांतर करण्यात यशस्वी झाल्यास सहावं ज्ञानेंद्रिय जागृत होतं.

सामान्य माणुस आणि बुद्धिमान माणुस यांच्यात ह्या सहाव्या इंद्रियाचाच फरक असतो. कामवासनेच अमर्याद शक्ती नियंत्रित होवुन तिचं रुपांतर निर्मितीक्षम विचार शक्तीत होतं, तेव्हा अंतर्मनाचं अफाट मार्गदर्शन आपलं रुपांतर अनोख्या व्यक्तिमत्वात करतं!

लेखक म्हणतो की स्त्रीला वश करणं, खुष करणं हीच पुरुषाची सर्वात मोठी उत्तेजक शक्ती असते.

अब्राहम लिंकन वयाच्या चाळीशीपर्यंत झगडत होता, त्यानंतर त्याच्या आयुष्यात ‘एन रुटलेज’ नावाची स्त्री आली, जिथुन पुढे लिंकन यशाच्या शिखरावर पोहचला, अगदी त्याउलट नेपोलियन बोनापार्टची पहीली पत्नी जोसेफाईन जोपर्यंत त्याला उत्तेजित करत होती तोपर्यंत तो प्रत्येक लढाई जिंकत सुटला, आणि जेव्हा त्या दोघांत बेबनाव झाला, तेव्हा मात्र नेपोलियनचे साम्राज्यही उद्ध्वस्त झाले.

व्यक्तिगत चुंबकत्व प्रबळ करणारे पाच घटक –

  • हस्तांदोलन – अशा लोकांच्या हाताच्या स्पर्शात चुंबकत्व असतं, ते ताबडतोब जाणवतं!
  • आवाजाचा स्वर – प्रबळ कामवासना असणार्‍यांचा आवाज संगीतमय आणि सुंदर असतो.
  • शरीराची ठेवण आणि चालना – हे लोक अतिशय जलद चालतात, आणि त्यांच्या चालीत डौल आणि सहजता असते.
  • विचारांचं कंपन – हे लोक आपल्या विचारांच्या कंपनांनी आजुबाजुच्यांना प्रभावित करु शकतात.
  • शारिरीक सजावट – हे लोक आपल्या बाह्यरुपाबद्द्ल फार जागरुक असतात, आणि व्यक्तिमत्वाला शोभतील असेच कपडे घालतात.

पाऊल अकरावे – अर्धचेतन मन

माणसाचं सचेतन मन आणि असिमीत बुद्धीमत्ता यांच्यात दुवा म्हणुन अर्धचेतन मन काम करतं!

अर्धचेतन मन हे विचार साठवण्याचं कोठार आहे, तिथुन हवा तो विचार आपण आपल्या चेतन मनात आणु शकतो. आपल्या सुप्त मनावर आपण पुर्णपणे ताबा मिळवु शकत नाही, पण कुठलीही योजना, इच्छा किंवा हेतु त्याच्या स्वाधीन मात्र करु शकतो.

सुप्त मन हे आपल्या भावनांच्या, संवेदनांच्या प्रभावाखाली वावरतं, आपल्या मनात सात प्रकारच्या मोठ्या सकारात्मक भावना आणि सात प्रकारच्या मोठ्या नकारात्मक भावना दडलेल्या असतात.

स्वयंसुचना दिल्यास सकारात्मक भावनांचा प्रभाव निर्माण करुन अचेतन मनाशी संवाद साधता येतो.

प्रार्थना करणं, हे एक प्रकारे आपल्या अचेतन मनाशी संवाद साधणंच आहे, आनंदी, समाधानी मनाने केलेली प्रार्थना परिणामकारक ठरते, भीतीचा पगडा असलेल्या मनस्थितीत केलेली प्रार्थना व्यर्थ जाते.

ज्याप्रमाणे रेडीओ ध्वनीलहरी पोहचवतो, अगदी तसंच तुम्हीही आपल्या असिमीत बुद्धीमत्तेशी नियमित संवाद साधु शकता. अंतःकरणपुर्वक केलेल्या प्रार्थनेचे शब्द असिमीत बुद्धीपर्यंत पोहोचतात, आणि त्याचं प्रत्युत्तर कल्पनेच्या, निश्चित योजनेच्या रुपात मिळतं.

पाऊल बारावे – मस्तिष्क/मेंदु

आपल्या मेंदुत, अत्यंत सुव्यस्थितपणे रचलेल्या, दहा ते चौदा अब्ज पेशी आहेत, प्रत्येक माणसाचा मेंदु विचारांच्या कंपनांचं ग्रहण आणि प्रक्षेपण करण्यास सक्षम असतो.

उत्तेजित झालेला मेंदु विचारांची गती प्रचंड वाढवतो, तेव्हा दुसर्‍यांनी प्रक्षेपित केलेले विचार आणि कल्पना आकर्षित करतोच, सोबत स्वतःच्याही विचारांचं इतरांवर यशस्वी प्रक्षेपणही करतो.

पाऊल तेरावे – सहावं इंद्रियं

आधीच्या बारा तत्वांवर प्रभुत्व मिळवलं की तेरावं तत्व आपल्याला शिखरावर घेऊन जातं. माणसाला आपल्या पाच ज्ञानेंद्रियाव्यतिरीक्त अन्य कुठल्यातरी मार्गाने निश्चित ज्ञान असं मिळत असतं.

ज्यावेळी मानवी मन असाधारणपणे उत्तेजित झालेलं असतं, तेव्हा त्याला हे ज्ञान मिळत असतं. सहावं इंद्रिय उत्तेजित झालं की ह्रद्याची गती पण सामान्याहुन अधिक होते. या शक्तीचा वापर करण्याची क्षमता मंदगतीने प्राप्त होत असते. या तत्वाचा वापर करुन तुम्हीही लाभान्वित होवु शकता.

ही अज्ञात शक्ती मोठमोठ्या विचारवंतांच्या, पुढार्‍यांच्या, कलावंतांच्या, संगीतज्ञांच्या, लेखकांच्या, राजकारण्यांच्या प्रेरणेचा स्त्रोत असते.

ही होती श्रीमंत असण्यासाठी आवश्यक असणारी तेरा रहस्य, यशस्वीतेचा ‘एन्ड्रु कार्नेजी’ फॉर्मुला या पुस्तकाची प्रेरणा आहे, जो वापरुन लाखो लोक प्रचंड श्रीमंत झाले. ही सोपी मुलभुत तंत्र वापरुन तुम्हालाही संपत्तीवान होण्यासाठी शुभेच्छा!..

शेवटी मला पुस्तकातलं अप्रतिम वाक्य आठवतयं, “जीवनाच्या खेळात, वेळ आपली प्रतिस्पर्धी म्हणुन उभी आहे, जिला अनिर्णय अजीबत स्वीकार्य नाही”, तेव्हा, उठा, श्रीमंत बनण्यासाठी आजपासुनच ताबडतोब कामाला लागा!..

धन्यवाद!..

मागील दोन भाग वाचण्यासाठी खालील दुव्यांवर क्लिक करा….

विचार करा आणि श्रीमंत व्हा! – भाग १
विचार करा आणि श्रीमंत व्हा! – भाग २

विचार करा आणि श्रीमंत व्हा! पुस्तक खरेदी

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय