सुपाच्य आहाराचे गुण….

योग्य काळी घेतलेला आहार उत्तम तृप्ती देतो.

भूक कडाडून लागल्यावर खाल्लेली चटणी भाकरीसुद्धा चविष्ट लागते पण पोटभर जेवल्यावर कोणी आवडीचा पदार्थ दिल्यास त्याची म्हणावी तशी मजा घेता येत नाही, हो ना !

सात्म्य म्हणजे व्यक्तीशः अनुकूल आहार

उदाः काहींना कच्चे शेंगदाणे🥜 खाल्ले की जुलाब होतात, शिमला मिरचीची भाजी खाल्ली की गुदभागी जळजळ होते असा असात्म्य आहार वगळून जो सहज रूचतो व पचतो तो आहार बाधत नाही व नित्य सेवनी असावा!

लघु आहार उदाः साळीच्या लाह्या, भाताची पेज, मूगाची पेज, राजगीर्‍याचे किंवा वरीचे पदार्थ लवकर पचतात.

स्निग्ध आहार अन्नास एकसंघता आणतो, रूची निर्माण करणार्‍या बोधक कफास चालना देतो. वाताचे शमन करतो म्हणजेच (inhibits or delays degenerative changes) पेशींची उत्पत्ती व स्थिती या अवस्थांना बल देतो व पेशींचा लय म्हणजेच झीज लवकर होऊ देत नाही. त्यामुळे वातविकार व वार्धक्य 🏻यापासून संरक्षण होते.

ऊष्ण आहार अग्निबल म्हणजेच जरण शक्ती (अन्न पचवण्याची शक्ती) व अभ्यवरण शक्ती (अधिक मात्रेत आहार सेवन करण्याची क्षमता) वाढवतो.

अधिक शीघ्र व अधिक संथ गतीने खाऊ नये.

उदाः उशीरा उठून बाहेर जाताना घाईघाईत किंवा उभ्यानेच खाणे किंवा अति सावकाश खाणे.

द्रवबहुल आहार हा अदोष असतो.

उदाः आपण पाहतो फक्त चपाती/भाकरी व सुकि भाजी खाण्यापेक्षा त्यासोबत 🥣पातळ भाजी किंवा🥛 ताक इ. द्रवाहार असल्यास अन्न थोडे अधिक जाते व पचतेही.

योग्य मात्रेत केलेला आहार सुखपूर्वक जीरतो व रसरक्तादी सप्तधातूंच साम्य प्रस्थापित करतं.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय