Form 26AS बद्दल माहिती आणि त्याचे महत्व…

इन्कम टॅक्स भरणे हे एकच काम नाही. टॅक्स भरण्यात अनेक कठीण कामांचा समावेश होतो. टॅक्स भरायचा म्हणजे त्याची पूर्वतयारीच फार असते. जसं की, आपलं करपात्र उत्पन्न किती आहे हे बघणं, वेगवेगळ्या कलमांतर्गत मिळणाऱ्या वजावटी आणि सवलतींचा दावा करणं, हे सगळं जाऊन आपल्याला नक्की भराव्या लागणाऱ्या टॅक्सचं गणित मांडणं आणि सर्वात शेवटी म्हणजे हा टॅक्स भरणं. ही सगळी प्रक्रिया नाही म्हटलं, तरी थोडीफार गुंतागुंतीची आणि गोंधळात टाकणारी आहे. ह्यासाठी सर्वात आधी आपल्याला सर्व प्रकारच्या फॉर्मची माहिती असणे आवश्यक आहे.

या सगळ्यात अनेकदा ऐकू येणारी गोष्ट म्हणजे TDS. त्यापाठोपाठ बोलण्यात येतो तो फॉर्म 26AS. ह्या दोन्ही गोष्टी नेमक्या काय आहेत ते जाणून घेऊया.

फॉर्म २६ AS म्हणजे काय?

एका पॅन क्रमांकासंदर्भात कर-कपातीचे झालेले सर्व व्यवहार एकत्रितपणे दाखवणारे कागदपत्र म्हणजे फॉर्म २६ एस. टीडीएस (Tax Diducted at Source), टीसीएस (Tax Collected at Source), रिफंड म्हणजे परतावा, इत्यादी संदर्भातील सगळी माहिती म्हणजे-

  • टॅक्स कोणी कापला,
  • कधी, केव्हा, किती कापला
  • तो कुणाकडे जमा झाला
  • परतावा किती मिळणार

अशी सगळी माहिती ह्या फॉर्मद्वारे मिळते. यालाच टॅक्स क्रेडिट स्टेटमेंट असंही म्हणतात.

फॉर्म २६ ASचे महत्व-

  • फॉर्म २६ AS हा आपल्या नावावर जमा झालेल्या सर्व टीडीएसचा तयार आहवाल आहे. हा फॉर्म आपल्याला आपला आयकर सहजपणे भरण्यास मदत करतो.
  • आपण आपल्या उत्पन्नाचे विविध स्रोत, प्रत्येक स्रोतांवर वजा केलेला कर, आणि त्यावर घेतलेल्या कर-सवलती ह्यात पाहू शकतो.
  • आपण किती कर देणं लागतो हे पाहण्यासाठी सर्व आवश्यक तपशील या फॉर्ममध्ये असतात.

फॉर्म २६ ASचे भाग-

१. भाग A-टीडीएसच्या माध्यमाद्वारे वर्षाकाठी आपण भरलेले कर तसेच आपला पगार, आपण देत-घेत असलेले भाडे, आपल्या ठेवींवरील व्याज या साऱ्यावर करकपात होते. ही सारी माहिती फॉर्मच्या भाग A मध्ये आपल्याला आढळते.

  • भाग A१ –
    आपला टीडीएस आपण फॉर्म १५ G किंवा १५ H सादर केल्यावर कापला जातो. ही माहिती फॉर्मच्या भाग A१ मध्ये आढळते.
  • भाग A२-
    जेव्हा आपण आर्थिक वर्षात स्थावर मालमत्तेची विक्री करता, तेव्हा खरेदीदार तुम्हाला संबंधित टीडीएस वजा करून पैसे देतो. स्थावर मालमत्तेच्या विक्रीसंबंधित टीडीएसची माहिती भाग A२मध्ये आढळते.

२. भाग B-इतर स्रोतांवर आपल्या वतीने गोळा केलेल्या टॅक्सबद्दलची माहिती या भागात आढळते.

३. भाग C-आपण भरलेल्या टॅक्सबद्दलची सर्व माहिती या भागात आढळते

फॉर्म २६ AS डाऊनलोड कसा करावा?

26 AS हा फॉर्म आयकर कायद्याच्या कलम २०३ AA अंतर्गत मिळतो. आयकराच्या इतर सर्व फॉर्म्सप्रमाणे तो ऑनलाईन उपलब्ध आहे. तो डाऊनलोड करायच्या ३ पद्धती आहेत.

  1. आयकरखात्याच्या ई-फायलिंगच्या (https://incometaxindiaefiling.gov.in) वेबसाईटद्वारे
  2. TRACES (https://www.tdscpc.gov.in/app/login.xhtml) वेबसाईटद्वारे
  3. नेटबँकिंगद्वारे

ह्यापैकीTRACES ह्या (https://contents.tdscpc.gov.in/en/taxpayer-home.html)वेबसाईटवर जाऊनही उरलेल्या २ पर्यायांचा वापर करता येतो.

१. दिलेल्या वेबसाईटवर जाऊन टॅक्स पेयर हा पर्याय निवडा.

२. नंतर खाली दाखवल्याप्रमाणे हा पर्याय निवडून नेट बँकिंग किंवा आयकर विभागाच्या ईफायलिंग वेबसाईटला (https://incometaxindiaefiling.gov.in) भेट देऊन आपले युजर नेम आणि पासवर्ड वापरून आपला फॉर्म डाऊनलोड करता येतो.

कोणत्याही वेबसाइट वरून डाउनलोड केलेला फॉर्म 26AS हा पासवर्ड सुरक्षित आहे. हा पासवर्ड म्हणजे DD-MM-YYYY स्वरूपात आपली जन्मतारीख असते.

सौजन्य :http://www.arthasakshar.com/

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय