“आयेगा आनेवाला” एक सुरीली आठवण………

Lata Mangeshkar

महल चित्रपटाच्या “आयेगा आनेवाला” या गाण्याच्या रेकॉर्डींगच्या वेळची गोष्ट. सतत पाच दिवस या गाण्याच्या तालमी चालू होत्या. संगीतकार खेमचंद प्रकाशजी अनेक बदल गाण्याच्या चालीमधे करत होते. लतादीदी तेव्हढ्या वेळा तालमी करत होत्या.

लतादीदी वयाने लहान, उपाशीपोटी सर्व काही सहन करत होत्या. गाण्यामधे Echo Effect येण्यासाठी लतादीदी पावलांचा आवाज न करता दुरुन हळूहळू चालत येत माईकजवळ यायच्या व दुरुन आवाज येत आहे असा परिणाम मिळायचा. त्यासाठी खूप वेळा त्याना हे करावे लागले.

पाच दिवसानी अखेरीस या गाण्याचे रेकॉर्डींग झाले तेव्हा लतादीदी म्हणाल्या या गाण्याची धून माझ्या रोमारोमात भिनली होती. प्रत्येक सुराशी आणि शब्दाशी मी एव्हढी एकरुप झाले होते की ते गाणे म्हणताना मला कसलाही त्रास न होता अतिशय सहजतेने मी म्हटले. वादकासह सर्वांचे कठोर परिश्रम, उत्कृष्ट चाल, लतादीदींचा स्वर्गीय आवाज, योग्य शब्द आणि सुंदर अभिनयासह झालेले शूटींग यामुळे हे गाणे माईल स्टोन झाले आहे. इतक्या वर्षांनी अजूनही ते ताजे आणि सर्वाना हवेहवेसे वाटण्याचे कारण हेच आहे.

“आयेगा आनेवाला”

वाचण्यासारखे आणखी काही…..

पंकज कोटलवार यांचा ब्लॉग
संगीत शेंबेकर यांचा ब्लॉग
शब्द तुझे नि माझे ब्लॉग


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.