अन्नसेवन करताना पंचज्ञानेंद्रियांचा सहभाग असावा….

diet

डोळ्याने अन्न न्याहाळावे, नाकाने त्याचा गंध अनुभवावा, कानाने (अन्न बनवताना भाजी इ. चिरण्याचा किंवा घास मोडून चावून खाण्याचा) सूक्ष्म आवाज अनुभवावा. जिभेने अन्नाची स्वादिष्ट चव चाखावी.

त्वचेने अन्नाचा स्पर्श अनुभवावा अर्थात यावरून तुम्हाला कळाले असेलच कि चमच्याने का खाऊ नये. आपल्या भारतीय पद्धती शास्त्रीय असून त्या पाश्चात्य प्रभावाने सोडून आरोग्याच्या मैलोदूर आपण जात आहोत हा ऊलटा प्रवास लवकर थांबवायला हवा अन्यथा विनाश अटळ आहे!

आज हाॅटेलमध्ये किंवा चारचौघात हाताने जेवायला आपल्याला लाज वाटत आहे. पाश्चात्यांच्या चांगल्या गोष्टि घ्याव्यात पण स्वदेशी चांगल्या गोष्टि का सोडाव्यात?

त्यांचा स्वाभिमान बाळगण्याऐवजी लाज का वाटावी?

चमच्याने खाल्ल्यावर मनसोक्त जेवल्यासारखे का वाटत नाहि नेहमी हाताने जेवणार्‍यांनाच कळले असेल.
हाताने खाणार्‍यांना अजून एक छान सवय आपोआप लागते नखे वेळेवर कापण्याची जेणेकरून नखात अडकलेली घाण पोटात जात नाही.

नाहितर पाश्चात्य प्रभाव असणार्‍यांना नखे वाढवून हाताने जेवणे किती अवघड जाईल विचार करा, चमचाचा शोध यातून तर लावला नसेल ना? ज्यांची काहि ज्ञानेंद्रिये कार्यरत नसतील त्यांनी खेद वाटून न घेता उपलब्ध इंद्रियांचा लाभ घ्यावा.

टिपः- वाईट सवयी लवकर सुटण्यासाठि विशिष्ट मिश्किल किंवा उपहासात्मक भाषाशैली वापरली आहे, वैयक्तिक कोणाला दुखावण्याचा उद्देश नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.