शरीरातील सात उर्जा चक्रे आणि त्यांची कार्ये..

शरीरातील सात उर्जा चक्रे

योगशास्त्रात, मानवी शरीरातील सात योगिक चक्रांच्या अस्तित्वाबद्दल महिती सांगितलेली आहे.

ही सात चक्रे अशी

 • सहस्त्रार चक्र
 • आज्ञा चक्र
 • विशुध्द चक्र
 • अनाहत चक्र
 • मणिपुर चक्र
 • स्वाधिष्ठान चक्र
 • मूलाधार चक्र

१. मुलाधार चक्र –

हे चक्र पाठीच्या कण्याच्या मूळ सुरूवातीला स्थित असते.

या चक्रामुळे मानवाला चेतनाशक्ती, जोम आणि संवर्धन ही वैशिष्ट्ये प्राप्त होतात. मात्र हे चक्र जर अयोग्यपणे कार्यरत झाले तर परिणामस्वरूप आळस व स्वकेंद्रित वृत्ती निर्माण होऊ शकते.

मुलाधार चक्र असंतुलित झाल्यास
 • ज्यांचे मूळ चक्र असंतुलित असते ते छोट्याशा कारणावरून राग येऊन आक्रमक व त्रस्त होतात.
 • अशा व्यक्ती लोभी असतात आणि भौतिक सांसारिक गोष्टींना जास्त महत्त्व देतात, ह्या लोकांना स्वतःला असुरक्षित वाटते.
 • व्यक्ती स्वतःला मातीशी एकनिष्ठ ठेवण्यास असमर्थ असतात तसेच बाहेरच्या जगापासून स्वतःला वेगळे करतात.
 • दैनिक कार्ये पूर्ण करण्यास आणि शिस्तबध्द व संघटित राहण्यास त्यांना अवघड जाते.
 • जे लोक चिंताग्रस्त, लाजाळू तसेच अति बेचैन असतात त्यांचे मूळ चक्र कमी सक्रिय असते.
मुलाधार चक्र संतुलित असल्यास –

अशी व्यक्ती निरोगी असतो तसेच त्याचे एकूणच हितस्वास्थ्य उत्तम असते. तो किंवा ती शारिरीक रित्या सक्रिय तसेच निश्चयी होतात.

२. स्वाधिष्ठान चक्र

हे चक्र माकडहाडात, ओटीपोटाचे क्षेत्र आणि पाठीच्या कण्याच्या तळाशी किंवा बेंबीच्या केंद्रस्थानी स्थित असते.

स्वाधिष्ठान चक्र असंतुलित झाल्यास
 • अशी व्यक्ती भावनिकरित्या अस्थिर तसेच अधिक संवेदनशील असतो.
 • ते अपराधीपणा तसेच अप्रतिष्ठेच्या भावनेने भरलेले असतात आणि स्वतःला संसार सुखापासून दूर ठेवतात.
 • ते स्वतःला गर्दीपासून दूर ठेवून वेगळे राहणे पसंद करतात.
 • असंतुलित स्वादिष्ठान चक्रामुळे कोणतीही व्यक्ती स्वप्नाळू स्वभावाबरोबरच अत्यंत भावुक असतो किंवा नाटकीय होतो. व्यक्ती लैंगिक आसक्तीमुळे ग्रस्त असतो. विपरित लिंगासाठी असलेली ओढ ही धोकादायक असू शकते.
स्वाधिष्ठान चक्र संतुलित असल्यास

हे लोक सर्जनशील व भावना व्यक्त करणारे तसेच आनंदाला स्वतःच्या जीवनात निश्चितपणे आणण्याचा प्रयत्न करणारे असतात. निरोगी आणि समाधानी नातेसंबंध यांच्यामुळे निर्माण होतात.

अशा व्यक्तींमध्ये इमानदारी तसेच नैतिकता असते आणि ह्यांना नात्यांचे मोल असते.

३. मणिपुर चक्र

हे चक्र नाभीच्या केंद्रस्थानी बरगड्यांच्या खाली स्थित असते.

हे चक्र चेतनेचा केंद्रबिंदू मानले जाते ज्यामुळे शरीराच्या आतील ऊर्जेचे संतुलन होते. मणिपूर चक्र इच्छाशक्तीला नियंत्रित करते.

स्वतःसाठी आणि दुसऱ्यांबद्दलचा आदर मनामध्ये बिंबविते.

मणिपुर चक्र असंतुलित झाल्यास
 • अशी व्यक्ती तापट व आग्रही स्वभावाच्या होतात.
 • त्यांचा स्वभाव दुसऱ्यांबद्दल मतप्रदर्शन करणारा आणि पटकन राग येणारा असू शकतो.
 • अशा लोकांमध्ये आत्मविश्वास, आत्मसन्मानाची कमतरता असते.
 • त्यांना भावनात्मक समस्या असतात, त्यांचा स्वभाव भित्रा तसेच सहज घाबरणारा व अशांत असतो.
 • त्यांना अयशस्वी होण्याची भीती असते म्हणून प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांना दुसऱ्यांचा सल्ला घ्यावा लागतो.
 • कोणताही निर्णय घेताना ते भिडस्त असतात आणि त्यांना असुरक्षिततेची भावना असते.
मणिपुर चक्र संतुलित असल्यास
 • मणिपुर चक्र संतुलित असणार्‍या व्यक्ती खंबीर तसेच आत्मविश्वासपूर्ण असतात.
 • स्वतःच्या ध्येयांना पूर्ण करण्यासाठी आरामदायक सुखी जीवनाचा त्याग करतात.
 • ह्या व्यक्ती स्वतःवरं व दुसऱ्यांवर प्रेम करतात
 • ते इतरांचा आदरही करतात व त्यांच्यात चांगले नेतृत्त्व गुण असतात.

४. अनाहत चक्र

अनाहत चक्राचे स्थान हे छातीच्या मध्यभागी स्थित असते.

हे चक्र नाते संबंधांना नियंत्रित करते तसेच बिनशर्त प्रेमाकरिता आसन आहे.

निःस्वार्थीपणा, स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी प्रेम, क्षमा, अनुकंपा तसेच आनंद हे संतुलित अनाहत चक्राचे लक्षण आहे.

जर चक्र उत्तम प्रकारे संतुलित आणि शुध्द असेल तर इच्छा लगेचच पूर्ण होतात.

अनाहत चक्र असंतुलित झाल्यास
 • अशी व्यक्ती सतत एकानंतर एक भावनांनी भारावलेला (जसे की राग, उदास, ईर्ष्या, आनंद) असल्याचे अनुभव करतो.
 • भावनाशील स्वभावामुळे अपमानजनक व द्वेषपूर्ण नातेसंबंधांबरोबर जगावे लागते.
 • जेव्हा हे चक्र पूर्ण निष्क्रिय होते तेव्हा व्यक्ती प्रेमास विरोध करतो, परिणामस्वरूप त्याला स्वतःचा तीव्र तिटकारा येतो.
 • आपण निरूपयोगी असल्याची भावना निर्माण होते. निम्न सक्रिय असलेल्या चक्राचे लोक इतरांना स्वतःच्या अपयशासाठी दुसऱ्यांना दोष देतात.
संतुलित अनाहत चक्राचे फायदे
 • ह्या व्यक्ती निरपेक्ष प्रेम करण्यास सक्षम असतात.
 • हे लोक इतरांबद्दल खरी अनुकंपा व आत्म स्वीकृती दाखवितात.
 • त्यामुळेच ते इतरांवर निरपेक्ष प्रेम करण्यास व लोकांना स्वीकारण्यास अनुमती देता.
 • असे लोक स्वभावाने निःस्वार्थी असतात.
 • ज्या लोकांचे अनाहत चक्र संपूर्णपणे उघडलेले व शुध्द असते ते अध्यात्माचा देखील अनुभव घेतात.
 • सगळ्यांवर निरपेक्ष प्रेम करणे ही हृदय चक्र उघडण्याची प्राथमिक पध्दत आहे. स्वतःवर प्रेम करून आणि स्वतः बद्दल कृतज्ञ असल्यावरच व्यक्ती दुसऱ्यांवर प्रेम करू शकतो.

५. विशुध्द चक्र

विशुध्द चक्र गळ्याच्या दिशेने उघडते

हे चक्र दळणवळण तसेच वक्तव्याचे केंद्र आहे.

श्रवण शक्ति व ऐकणे या गोष्टी कंठ चक्राने नियंत्रित केल्या जातात.

यामुळे व्यक्तीला संवाद करण्याचा तसेच निवड करण्याचा अधिकार मिळतो.

विशुद्ध चक्र असंतुलित झाल्यास
 • अशी व्यक्ती बोलताना ओरडून बोलतो.
 • कोणी बोलण्याच्या आधी अथवा कोणाचे ऐकून घ्यायच्या आधीच ते ओरडून अधिकारवाणीने बोलतात.
 • त्यांचा आवाज मोठा किंवा कर्कश्य असतो आणि ते इतरांच्या बाबतीत स्वतःचे मत बनवितात तसेच गोष्टींचे अति विश्लेषण करतात.
 • ज्या व्यक्ति कुजबुजतात, लाजाळूपणे किंवा तोतरे बोलतात, त्यांचे कंठ चक्र निम्न सक्रिय असते.
 • अशा लोकांना संभाषण करणे कठीण जाते तसेच बोलताना योग्य शब्दांचा उपयोग करून बोलणे अवघड जाते.
विशुद्ध चक्र संतुलित असल्यास
 • कंठ चक्र संतुलित असलेल्या लोकांच्या आवाजात, अनुनादासहित सुस्पष्टता तसेच आवाजातील स्वच्छपणा व लयबध्दता भिनविली जाते.

६.आज्ञा चक्र

आज्ञा चक्र दोन्ही भुवयांच्या मध्ये तसेच नाकाच्या पुलाच्या थोडेसे वर आहे. हे डोळ्यांच्या मागे तसेच डोक्याचा मध्यभागात स्थित असल्याचे म्हटले जाते.
परंपरागत पध्दतीने स्रिया कुंकू लावतात आणि पुरूष कपाळावर तिलक लावतात तिथे अजना चक्र सक्रिय होते. या चक्रामुळे मिळणारी ऊर्जा स्पष्ट विचार, आत्म चिंतन तसेच आध्यात्मिक जागरूकता प्राप्त होण्याची परवानगी देते.

आज्ञा चक्र असंतुलित असल्यास

 • अशा लोकांवर अति क्रियाशील कल्पना शक्ती असणे, वास्तवापासून दूर जाणे असे परिणाम होऊ शकतात.
 • हे लोक काल्पनिक जगात राहतात आणि वारंवार भयावह स्वप्नांमुळे त्रस्त असतात.
 • अशा व्यक्तीला घटना लक्षात ठेवून आठवणे कठीण जाते आणि त्यांची मानसिकता न बदलणारी व पूर्वग्रहदूषित असते.
 • अशा लोकांचे लक्ष सहज विचलित होते, चिंतेमुळे ते प्रभावित होतात तसेच त्यांची वृत्ती आलोचनात्मक व सहानुभूतीहीन असते.
 • अशा व्यक्तींची स्मृती कमकुवत असते, त्यांना शिकण्यात अडचणी येतात
 • कुठल्याही गोष्टींची कल्पना करणे तसेच काल्पनिक चित्र डोळ्यांसमोर आणणे कठीण जाते.
 • त्यांच्या / तिच्यामध्ये अंतर्ज्ञानाचा (इन्ट्युशन) अभाव असतो तसेच दुसऱ्यांसाठी ते भावनाशून्य असतात व व्यवहारात नेहमी नकारात्मक भूमिका असते.
आज्ञा चक्र संतुलित असल्यास
 • हे लोक आकर्षक व्यक्तिमत्वाचे तसेच अंतर्ज्ञानी असतात.
 • त्यांच्या प्रसन्न स्वभावामुळे त्यांना गोष्टी स्पष्ट दिसतात आणि इतरांबद्दल कोणतेही पूर्वग्रह न ठेवता ते त्यांना स्वीकारतात.
 • ते प्रतिकात्मक रित्या विचार करून जीवनाचा अर्थ लक्षात घेतात. जेव्हा तृतीय नेत्र चक्र संतुलित असते तेव्हा लोकांना आपल्या स्वप्नांना लक्षात ठेवण्यास व त्याचा अर्थ लावणे सोपे जाते तसेच त्यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते.

७. सहस्र चक्र

सहस्र चक्र डोक्याच्या शीर्ष भागावर म्हणजेच टाळूवर, कपाळापासून वरच्या बाजूने चार बोटांच्या रूंदीवर, दोन्ही कानाच्या दरम्यानच्या मध्यरेखेत स्थित असते.

सहस्र चक्र जगाचे तसेच स्वतःचे संपूर्ण भान ठेवून व्यक्तीची बुध्दी आणि परमात्म्याच्या आध्यात्मिक ऐक्याचे प्रतिनिधित्व करतो.

सहस्त्र चक्र असंतुलित झाल्यास
 • अशा व्यक्तीच्या मनात वेड्यासारखे विचार येतात आणि ह्या व्यक्ती भूतकाळात तरी जगतात नाहीतर भविष्याची चिंता करतात.
 • असा व्यक्ती स्वार्थी बनतो तसेच जाणीव नसलेला व स्वत्वाचे नुकसान होण्यास सामोरे जावे लागते, जीवनात उद्देश्यांचा अभाव असल्याने, निराशा येते तसेच आनंदाची उणीव निर्माण होते.
 • निम्न सक्रिय सहस्र चक्रामुळे मनात स्वार्थी विचार येतात त्यामुळे नीतिमत्ता आणि नैतिकतेमध्ये कमतरता निर्माण होते.
 • हे लोक सर्वोच्च शक्तीकडून मार्गदर्शन घेण्यास असमर्थ असतात तसेच स्वतःला यासाठी अपात्र मानतात.
सहस्र चक्र संतुलित असल्यास
 • हे लोक आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात तसेच त्यांना आंतरिक शांतता प्राप्त होते.
 • हे लोक अविरतपणे विश्वासाला ज्ञानामध्ये बदलून स्वतःची आत्म जागरूकता वाढवितात.

हे सर्व चक्र संतुलित करण्याचा सर्वात साधा, सोपा आणि मोफत उपाय म्हणजे ध्यान, ध्यान आणि ध्यान करणे!..

आपण ध्यान केल्यास, त्याचा फायदा आपल्या कुटूंबीयांना देखील होतो, ज्या समाजात खुप लोक ध्यान करतात, तिथे गुन्हे होण्याचे प्रमाण आपोआप कमी झाले, असे आढळुन आले.

तुम्ही रोज ध्यान करता का? चक्रे बॅलन्सिंग करण्यासाठी तुम्ही काय काय करता, ते कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा.

धन्यवाद!..

ऊर्जा चक्रे संतुलित करण्यासाठी व्हिडीओ:

वाचण्यासारखे आणखी काही….

आर्थिक
प्रेरणादायी
पालकत्व


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

Previous articleजगजीवनची सुरक्षा…..
Next articleआत्महत्या….
लेखक व्यवसायाने आर्किटेक्ट आहेत. जीवनातील बर्‍यावाईट घटनांवर, आठवणींवर आणि अनुभवांवर लेख लिहण्याची त्यांना आवड आहे. रोजच्या जीवनातल्या, आजुबाजुला घडणार्‍या घटनांमध्ये, छोट्यामोठ्या प्रसंगामध्ये, आयुष्याचे बहुमुल्य धडे लपलेले असतात, यावर त्यांचा विश्वास आहे, असे हलकेफुलके प्रसंग आणि त्यातुन आयुष्याला समृद्ध करणारे, लपलेले नवनवे अर्थ शोधुन, त्यांची नर्मविनोदी शैलीत मांडणी करणं, हा त्यांचा आवडता छंद आहे......

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.