आत्महत्या….

रात्रभर त्याला झोप आली नव्हती, आर्थिक अडचणी, डोक्यावर कर्जाचा डोंगर, आईचं आजारपण, वडिलांचा राग-राग, बायकोची किरकिर, मुलाचं शिक्षण, मुलीचं लग्न असे अनेक प्रश्न त्याला आळीपाळीने छळत होते.

शेवटी पहाटे शिवारात जाऊन, स्वतः:ची सुटका करण्याचा विचार त्याने एकदाचा पक्का केला!..

ठरल्याप्रमाणे तो चारलाच उठला, काळोखातच शेतात पोहोचला, उजडायच्या आतच हे शेवटचं काम उरकायचं होतं, त्यानं फास तयार केला, दोर फांदीला बांधला, मनाचा हिय्या करून, डोळे बंद केले.

रक्ताचं पाणी करून कसलेल्या शेतीला शेवटचं एकदा डोळे भरून बघण्याची इच्छा झाली, म्हणून त्याने कष्टाने डोळे उघडले!..

तेवढ्यात समोरच्या गोठ्यातल्या हंबरणाऱ्या गायीकडे त्याचं लक्ष गेलं, नुकतंच जन्मलेल्या तिच्या पाडसाला ती किती मायेनं चाटत होती, तिच्या डोळ्यात अपार माया होती.

आणि तेवढ्यात समोरून चिवचिव करत आलेला रंगबेरंगी पक्ष्यांचा थवा दिसला, जणू काही त्याला संदेशच देत होता, की जीवन इतकंही वाईट नाहीये रे!..डोळे उघडून बघ!..इतरांवर प्रेम करून बघ!..ह्या निसर्गामध्ये हरवून बघ!..

आजूबाजूची नुकतीच लुसलूसलेली कोंब, आणि हिरवीगार पालवीही, त्याला संघर्ष करण्यासाठी हिंमत देत होती!..

तो भान हरपून, समोर बघतच राहिला!..शून्यात हरवल्यासारखा!..

काही क्षणातच काळोख नाहीसा होऊन तांबडं फुटलं होतं, आणि वातावरणात प्रसन्नतेचं वारं भरलं होतं,

निसर्गाचा हा साक्षात्कार अनुभवताच, त्याच्या अंगावर सरसरून काटाच आला, आणि त्याचे हात जागीच थबकले!..

आत्महत्या करण्याचा बेत रद्द करून, समाधान आणि प्रसन्नतेने तो घरी गेला!..

मनातली घालमेल थांबली होती, त्याच्या आयुष्यात उजडलेली ही पहाट लढण्यासाठी नवी ऊर्जा घेऊन आली होती!..

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय