अन्नसेवन करताना पंचज्ञानेंद्रिये सहभागी असल्यास असे नेमके काय होते बरे?

diet

आपल्या आवडीच्या पदार्थाचे नाव जरी काढले कि लाळ सुटते कि नाही, तोंडात अगदि तीच प्रक्रिया येथे घडते.

डोळ्याने न्याहाळल्याने, नाकाने गंध घेतल्यानेच; विशेषतःखाण्याचे शौकिन लोक ;कधी ताट समोर येते असे वाट पाहतात.

अशा लोकांच्या खाल्लेले अंगी सुद्धा लवकर लागते व ज्यांची पंचज्ञानेंद्रिये ईकडे तिकडे भटकत असतात त्यांनी बदाम,अंडी ई.कितीही पौष्टिक खाल्ले तरी अंगी लागत नाही.

मी तर केवळ ☕चहाच्या वासावरून त्यात साखर जास्त आहे कि चहा पावडर जास्त आहे ई.ओळखणारे तसेच 🍵आमटिच्या वासावरून ती चविष्ट झाली आहे कि नाही असे ओळखणारे व्यक्ति पाहीलेत.

पंचज्ञानेंद्रियांच्या सहभागाने मूळात आपण जेवायला बसलो आहोत याची जाणीव अंतर्मनापर्यंत व पर्यायाने निगडीत यंत्रणांपर्यंत पोहोचते, त्यामुळे अन्नावर 😋रुचि उत्पन्न होते,लाळ निर्माण होते.

म्हणजे बोधक कफाचा सम्यक स्राव पाझरू लागतो जो घासाला ओलावा देऊन एकसंघता आणतो,🍛अन्नाची चव जाणवण्यासाठि सुद्धा सहाय्यक होतो. पाचक रसांचा स्राव पाझरू लागतो नि 🔥जाठराग्नि प्रज्वलित होतो; अन्न रूपि हविद्रव्य स्विकारण्यासाठी.

सुरूवात चांगली झाली कि पुढची घडी बरोबर बसते. पचन सुलभ होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.