सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या उज्वल भविष्यासाठी एक चांगला पर्याय घेऊन आलेली आहे. या योजनेत पैसे गुंतवून मुलींच्या उच्च शिक्षणासाठी निधी जमा करणे पालकांसाठी शक्य होणार आहे.
सुकन्या समृद्धीचे खाते उघडण्याची पद्धत
या योजनेअंतर्गत कुठल्याही व्यावसायिक बँकेत किंवा जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडता येते. या योजने अंतर्गत एका कुटुंबात जास्तीत जास्त २ मुलींसाठी सुकन्या समृद्धी खाते उघडता येते. एका वेळी जुळ्या मुली जन्मल्या असतील तरच तिसरे खाते काढण्याची परवानगी मिळू शकते. सुकन्या समृद्धीचे खाते उघडण्यासाठी बँकेच्या किंवा पोस्ट ऑफिसच्या शाखेतून अर्ज मिळू शकतो. ICICI बँकेचा या योजनेसाठीचा अर्ज येथे क्लीक करून आपण मिळवू शकता.
या योजनेअंतर्गत उघडलेले खाते देशातील कुठल्याही बँकेत ट्रान्सफर करता येते जेणेकरून मुलीच्या पालकांची बदली झाल्यास खाते चालू ठेवणे शक्य होईल.
सुकन्या समृद्धी योजना इंग्रजीमध्ये येथे वाचा.
वयाची अट :
या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून १० वर्षाची होईपर्यंत खाते उघडले जाऊ शकते.
सुकन्या समृद्धी खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
१) मुलीच्या पालकांचे ओळखीचे प्रमाणपत्र ( पॅन कार्ड/ आधार कार्ड / पासपोर्ट इत्यादी )
२) निवासाचे प्रमाणपत्र ( इलेक्ट्रिसिटी बिल/ टेलेफोन बिल इत्यादी )
३) मुलीचे जन्म प्रमाणपत्र
जमा रकमेची कमाल आणि किमान मर्यादा :
या खात्यात किमान १००० रुपये आणि त्यानंतर १०० च्या पटींमध्ये रक्कम जमा करता येते. एका वर्षात कमाल दीड लाखापर्यंत रक्कम जमा केली जाऊ शकते.
मॅच्युरिटी कालावधी :
खाते चालू केल्यापासून २१ वर्षापर्यंत हे खाते चालू राहते तर खाते चालू केल्याच्या तारखेपासून १४ वर्ष पर्यंत रक्कम जमा करावी लागते. मुलीच्या वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर खात्यातील ५०% रक्कम काढता येते.
टॅक्सेशन ८०क :
इनकम टॅक्सच्या कलाम ८० क अंतर्गत या खात्यात जमा केलेली रक्कम ही टॅक्सफ्री असते. आणि यावर मिळाले व्याजही EEE अंतर्गत टॅक्सफ्री आहे
इंटरेस्ट रेट :