डिजिटल लेखनचोरी

Mr-Bean-Cheating

आपल्याला काय वाटते ते कागदावर सगळ्यांना उतरवायला जमतेच अस नाही. आपल्या कल्पना कितीहीछान असल्या तरी त्याला मूर्त स्वरूप द्यायला ती कला एकतर स्वतःकडे असावी लागते अथवा जोपासावी लागते. आधीच्या काळी आपल्या कल्पनांना कागदावर उतरवायला माध्यम नव्हते. जी माध्यम होती ती मोजकीच आणि तितकीच खर्चिक सुद्धा. सोशल मिडिया आल्यामुळे आपल्यातल्या उपजत गुणांना कुठेतरी समोर मांडायचं एक चांगल माध्यम मिळाल. जे सोप्प, सुटसुटीत, कोणताही खर्च न करता एका क्षणात जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचण्याच माध्यम.

digital-lekhanchori-MTफेसबुक च्या विश्वाने कित्येक अश्या अडकलेल्या भावनांना मोकळ होण्याचा एक रस्ता दिला. मग काय सगळेच सुटले. जो तो लिहित सुटला. ज्याच्या त्याच्या कल्पनाशक्ती प्रमाणे!! एका क्षणात अनेक लोकांपर्यंत आपल्याला काय वाटते ते जाऊ लागल. पण ह्या सगळ्यात एक गोष्ट झाली ती म्हणजे सगळेच स्वतःला लेखक आणि कवी किंवा लेखिका आणि कवियत्री समजायला लागले. ‘र’ ला ‘त’ आणि ‘ल’ ला ‘ळ’ जोडून चारोळ्या आणि कवितांचा पाउस पडायला लागला. लोक रोज सकाळी ब्रश केल्या प्रमाणे दुहेरी, चारोळी, एकेरी आणि असे अनेक प्रकाराने व्यक्त व्हायला लागली. लेखांच्या बाबतीत हि काही वेगळ नव्हत. पण ह्या सगळ्या चढाओढीत आपण कुठेतरी मागे पडू नये ह्यासाठी मग चोऱ्या सुरु झाल्या.

चोऱ्या, पण सात्विक पद्धतीने. म्हणजे आपल्याला आवडलेल्या ज्या लेखात किंवा कवितेत आपल्याला प्रसिद्ध करण्याची क्षमता असेल ती आपण ढापायची. मग ज्याने / जीने ते लिहल आहे. ती व्यक्ती जिकडे नसेल त्या ठिकाणी आपल्याच नावावर खपवायची. सोशल मिडिया ने दिलेली मोकळीक आपण अनेक प्रकारे वापरायला शिकलो त्यातलाच एक भाग. समोरून कोणी सांगितलच तर आम्हाला आवडली म्हणून शेअर केली. पण मूळ लेखक माहित नाही असा आव आणायचा. कोणी वाद घातलाच तर लोकांना चांगल शेअर केलेल पण आवडत नाही म्हणत त्याचीच बोंब मारायची. बर कोणी सांगितलच तरी पोस्ट मध्ये एडीट करू शकत नाही सांगत. तुम्ही काय करायचे ते करू शकता म्हणून आपण सेट असतोच. पण ह्या सगळ्यात आपण काय मिळवत आहोत? ह्याचा विचार कोणीच करत नाही.

get-some-originalखोटी प्रसिद्धी, खोटा मान सन्मान, खोटी प्रतिष्ठा मिळवताना क्षणिक आनंद नक्कीच मिळतो. पण कुठेतरी आपल मन आपल्याला खात असते नाही का? फेसबुक वरची कोणा दुसऱ्याची पोस्ट आपण आपल्या नावावर खपवली कि त्यावर मिळणाऱ्या कमेंट ने किंवा लोकांच्या प्रतिक्रियेने आपल्या अंगावर मुठभर मास चढते. खूप आनंद हि होतो. लोकांच्या मनात हि तुमच्याबद्दल स्थान निर्माण होते. पण हे किती वेळ? कोणीतरी पटकन कमेंट करते किही पोस्ट अमुक-अमुक लेखकाने लिहिलेली आहे. हे वाचताच आपली चोरी पकडली जाते. पण ते आता इतक्या कमेंट आणि चढलेल्या मुठभर मासामुळे सगळ्यांसमोर स्वीकारणं हा आपल्या आत्मसन्मानाचा प्रश्न होतो. मग काय आपण तुटून पडतो आपल्या फाटलेल्या आत्मसन्मानाला ठिगळ लावायला. वास्तविक तीच ठिगळ अजून आपला सन्मान आणि आपल समाधान लयाला नेत असतात. पण हे खूप कमी जणांना समजते. आपल खोट कातड उघड पडल तर ते चटकन स्वीकारून पुढे जाण्यात मोठेपणा असताना आपण ते घातलच नाही असा आव आणतो.

एक लेख किंवा चोरी करून त्यातून मिळालेल्या प्रसिद्धी ने आपल्याला काय मिळते? १०० लाईक आणि १० फ्रेंड रिक्वेस्ट. आपण एकदा चोरी करू , दोनदा करू पण जे आपलच नाही ते आपल्यात येणार कुठून. आपण कितीही दुसऱ्याच कातड उसन घेतल तरी कधीतरी आपल खर रूप बाहेर येतेच मग हा चोरी करण्याचा अट्टाहास कशाला? लेख किंवा कविता हे आतून आलेल्या भावनांचं चित्रण असते. ते व्यक्त करण्याची प्रत्येक माणसाची एक पद्धत असते. जर ते आपल नसेल तर आपण तस पुन्हा लिहूच शकत नाही. जरी आपण लिहण्याचा प्रयत्न केला तरी ते तस बाहेर येण अशक्य असते. ह्या सगळ्यातून आपण कोणत समाधान मिळवत आहोत? जर फेसबुक च्या लाईक्स आणि कमेंट मधून आपण आपली पात्रता आणि आनंद शोधत असू तर नक्कीच आपण डिप्रेशन कडे किंवा निदान चोर बनण्याकडे वाटचाल करतो आहोत. एका न संपणाऱ्या स्पर्धेत स्वतःला अडकून घेत आहोत. ज्यात जाताना आनंद होतो पण शेवट मात्र आपण फेसबुक बंद करण्यापर्यंत होतो. कारण जेव्हा लोक चोर म्हणून किंवा तुमच खर रूप ओळखतात ते सहन करण आपल्या क्षमतेपलीकडे असत.

कोणताही लेख किंवा कविता ही शेअर करताना मूळ लिहिणाऱ्याचा मान हा राखला गेला पाहिजे. आपण लिहित नसू, पण जे चांगल लेखन अस वाटत असेल ते पुढे ढकलताना ते आपल नाही हि एक ओळ आपण लिहताना का कचरावं ? जर आपला उद्देश सगळ्यांपर्यंत चांगल पोहोचवणं आहे, मग ती ओळ लिहल्याने तो उद्देश नाहीसा होतो का? जर होत नसेल तर मग न लिहण्याच कारण ही लेखनचोरी आहे. अशी चोरी करून आपण कोणाला फसवतो आहोत? लोकांना? नक्कीच नाही. त्यांना कळते ते कोणाच आहे. ज्याच असते तो सुद्धा काहीच म्हणत नाही. कारण क्रिकेट पीच वर उभे राहून तेंडूलकर चे कपडे घातले तरी पहिल्या बॉलवर आपली विकेट पडते. मग फसते ते कोण? समोरची लोक कि ते कपडे घालून पीच वर गेलेले आपण. ह्याचा विचार ज्याचा त्याने करावा.

digital-lekhanchoriकायद्याने शिक्षा होईल नाही होईल. आपली चोरी पकडली जाईल नाही जाईल. आपली चोरी पकडून पण आपल कोणी काही वाकड करू शकेल असही नाही. चोरी करून आपण प्रसिद्धही होऊ. पण ह्या सगळ्यात आपण कोणाला समाधानी करत आहोत? कोणत्या फसव्या गोष्टींमागे धावत आहोत ह्याचा विचार एकदा नक्की करावा. चांगली पोस्ट, कविता किंवा इतर कोणतेही लेखन पुढे शेअर करण हे नक्कीच एका चांगल्या आणि प्रगल्भ व्यक्तिमत्वाच लक्षण आहे पण ते केव्हा जेव्हा आपण त्या लेखनाच क्रेडीट योग्य व्यक्तीला देऊ तेव्हाच. ते आपण स्वतः घेऊन एक गुन्हेगार बनून आपल्या स्वतःला तर नक्कीच पण आपल्यावर प्रेम करणाऱ्या, ओळखणाऱ्या आपल्याच माणसांना फसवत आहोत ह्याची जाणीव असण हे खूप महत्वाच आहे. म्हणून कोणताही लेख, कविता त्याच क्रेडीट न लावता पोस्ट करण हि लेखनचोरीच आहे.

1 Response

  1. Datta walvankar says:

    Very correctly put forward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!