वेळेच्या नियोजनाबद्दल महत्त्वाच्या सात टिप्स

असं समजा, तुमचं बँकेत एक अकाउंट आहे. ज्यात रोज सकाळी एक ठराविक रक्कम जमा होते….. आपोआप. समजा ८६,४०० रुपये. पण हे पैसे तुम्हाला त्याच दिवशी वापरावे लागतात. कारण संध्याकाळी तुमचा अकाउंट परत झीरो होऊन जातो.
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत ८६,४०० रुपये तुमच्या खात्यात जमा होतात…… आपोआप. यातले तुम्ही पूर्ण पैसे वापरून घ्या किंवा अर्धे वापरा किंवा नका वापरू, संध्याकाळी तुमचा बॅलन्स परत झीरो.
हो, असा अकाउंट प्रत्येकाजवळ असतो. पण पैशांचा नाही, वेळेचा.
रोज सकाळी आपल्या खात्यात २४ तास म्हणजेच ८६,४०० सेकंद जमा होतात. दिवसाच्या अखेरीस आपोआप अकाउंट बॅलन्स झीरो होऊन जातो.
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत ८६,४०० सेकंद खात्यात जमा होतात.
मग आपले पैसे हरवले, चोरले किंवा वाया गेले तर आपल्याला चुटपुट लागते, तशी चुटपुट वेळ वाया गेला, तरी आपल्याला खरोखर होते का? निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.
- वेळेच्या सदुपयोगाबद्दल आपण सतर्क राहायला पाहीजे.
- वेळेच्या व्यवस्थापनामुळे कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करता येतो आणि त्यानुसार कामे उरकता येतात.
- अत्यंत घाईगर्दीच्या वेळेस अचानक उद्भवलेली महत्त्वपूर्ण कामे वेळेत पूर्ण करता येतात आणि परिस्थितीवर ताबा मिळवणे शक्य होते.
- उत्पादनक्षमता वाढवता येते.
- मनावरच्या ताणाची पातळी कमी करता येते.
- कार्यालयीन कामे आणि व्यक्तिगत आयुष्यात पार पाडायच्या गोष्टी यांचा समतोल साधता येणे शक्य होते.
एक चीनी म्हण आहे. ‘उद्या’ उमलणारी सर्व फुलं ‘आजच्या’ बियांमधून जन्म घेतात..
म्हणजे उद्याची आपली रंगबेरंगी, स्वप्नं लवकरात लवकर पुर्ण होण्यासाठी आजचा प्रत्येक क्षण, फक्त आणि फक्त स्वप्नपुर्तीच्या दिशेने वापरला जाणं, आवश्यक आहे.
वेळेच्या नियोजनाबद्दल ह्या सात टिप्स
१) ध्येय ठरवा, तुमचा प्रत्येक बहुमुल्य क्षण, तुमची ध्येये प्रत्यक्षात आणण्यासाठीच खर्च करा.
- ध्येयावर न पोहोचणे, ही शोकांतिका नाही. पोहोचण्यासाठी ध्येयच नसणे, ही खरी शोकांतिका आहे.
- तुम्ही कुठे जात आहात तुम्हाला माहिती नसेल, तर तुम्ही कुठे पोहचाल, कोणास ठाऊक?
- तेव्हा तुमच्यासमोर नेहमीच एखादं उद्दिष्ट अथवा ध्येय असावं.
- त्यामुळे तुमच्या कामाला, आणि ध्येय साध्य करण्यासाठी, तुम्ही जो वेळ देता, त्याला एक दिशा प्राप्त होते.
- अजुन दहा वर्षांनी तुम्हाला कोणं व्हायचंय ते आजच ठरवा….आत्ताच !
२) कामाला प्राधान्यक्रम द्या.
- योजना तयार करण्यासाठी खर्च केलेला एक मिनिट ती योजना अमलात आणताना दहा मिनिटे वाचवते.
- काम उद्या वर ढकलणे, क्रेडिट कार्ड वापरण्यासारखे आहे. बिल मिळेपर्यंत फार मजा येते.
- जेव्हा ध्येय गाठण्याचा प्रयत्न तुम्ही करत असता, त्यावेळी इटालियन अर्थतज्ज्ञ परेटो यांचा ‘८०-२०’ हा नियम वापरा.
- परेटो यांनी असं म्हटलंय की, ८० टक्के पुरस्कार तुम्हाला २० टक्के प्रयत्नांतून मिळू शकतात.
- हे अतिशय मौल्यवान २० टक्के प्रयत्न कोणते, ते समजून घेतल्यानंतर तुमचे अग्रक्रम तुम्ही ठरवू शकता.
- अशा तऱ्हेने तुम्हाला लाभदायक ठरतील अशा गोष्टींना आधी वेळ देणं, हे महत्त्वपूर्ण ठरतं.
३) कामांची यादी बनवणं.
- सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
- दिवसभरात कोणकोणती कामं करायची, याची आखणी मनाशी करायला हवी.
- कामाची यादी आदल्या दिवशी झोपण्यापूर्वी किंवा सकाळी करता येईल.
- त्यामुळे कॅलेंडर किंवा कामाच्या वेळापत्रकाशी जुळवून घेता येतं किंवा कामांची यादी करून आवश्यकतेनुसार त्यात बदलही करता येईल.
- या दोन्ही पद्धतींचा उपयोग गरज भासेल त्याप्रमाणेही करता येणं शक्य आहे.
- त्यामुळे कामाचं प्राधान्य लक्षात घेऊन, एकापाठोपाठ एक काम, फटाफट, उरकणं शक्य होतं.
४) शारीरिक व मानसिक दृष्टीनं प्राइम टाइम लक्षात घ्या.
- एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा.
- तुम्ही दिवसातल्या ज्या वेळात कामाच्या दृष्टीनं उत्साही, क्रियाशील असता, त्या वेळेत काम पूर्ण करणं उत्तम.
- स्वतःला विचारा की तुम्ही पहाटेच्या वेळी काम करताना अधिक तरतरीत असता, रात्री काम करायला तुम्हाला अधिक आवडतं की, दुपारच्या वेळी तुम्हांला कामासाठी उत्साह अधिक असतो?
- हे जाणून घेऊन त्यावेळी काम केलं तर ते अधिक दर्जेदार आणि लवकर पूर्ण होतं.
- तुमच्यासाठी महत्त्वाची आणि प्रथम करायला हवीत अशी कामं करण्यासाठी वेळ देणं हा वेळेचं नियोजन करण्याचा सगळ्यात परिणामकारक मार्ग आहे.
- कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.
५) लवचिकता
- कामात अनेकदा अडथळे येण्याची, बिघाड होण्याची किंवा दुसऱ्या एखाद्या गोष्टीकडे लक्ष वेधलं जाण्याची शक्यता असते.
- या सगळ्या गोष्टी गृहीत धरून कामाची आखणी करायला हवी आणि कामाची पद्धत ठरवायला हवी.
- वेळेचं नियोजन करणारी तज्ज्ञ मंडळी नेहमी असं सुचवतात की, प्रत्येकानं आपल्याजवळ असलेल्या वेळापकी ५० % वेळाचंच नियोजन करावं, तशा प्रकारेच कामाची आखणी करावी.
- फक्त निम्म्या वेळाचंच तुम्ही वेळापत्रक बनवल्यानं तुमच्या उरलेल्या निम्म्या वेळात तुम्हाला कामात येणारे अडथळे किंवा अचानक समोर आलेली आणीबाणीची परिस्थिती यांच्याशी सामना करता येतो.
६) कामातली चालढकल टाळा.
- अनेकदा पुढय़ातलं काम पुढे ढकलण्याची किंवा टाळण्याची वृत्ती बाळगलीत, तर तुमचं काम कंटाळवाणं होतं.
- अशा वेळी त्या कामाचे छोटे छोटे भाग करावेत आणि एक एक भाग पूर्ण करावा
- मग मोठं काम करताना कंटाळा टाळण्यासाठी त्या कामाला ठराविक वेळ द्यावा.
- कामाचा सगळा भार एकदम पेलण्यापेक्षा एका वेळी थोडं थोडं काम पूर्ण केलंत, तर तुम्ही अशा टप्यावर पोचाल, जिथे तुम्हालाच ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची आवड निर्माण होईल.
७) अनावश्यक गोष्टीकडे, दुर्लक्ष करण्याची कला शिका.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
The best
Nice