कळतयं, पण वळत नाही!

नमस्कार मित्रांनो, काही महीन्यापुर्वीची गोष्ट आहे, मी माझ्या गावापासुन सत्तर किलोमीटर दुर असलेल्या बांधकामाच्या एका साईटवर कारने निघालो होतो, प्रवासात कंपनी आणि साईटवर काही शिकायला मिळेल म्हणुन आमच्या कॉलेजचे तीन विद्यार्थी गाडीमध्ये सोबत होते.

गप्पा मारत, गाणी ऐकत आम्ही जात होतो, त्यांच्यापैकी एक मुलगा, म्हणजे अतिशय चुणचुणीत, स्मार्ट व्यक्तिमत्व, वागायला, बोलायला हुशार, बुद्धी तल्लख, सगळ्या क्षेत्रातलं ज्ञान, टेक्नोलॉजीपासुन व्यवहारज्ञान सगळ्यामध्ये एक नंबर, पण त्याची डिझाईन आणि मार्कशीट अत्यंत वाईट! मला कळेना, असे का?

त्याने सांगितले, अभ्यासात मन लागत नाही, सतत एका मुलीचे विचार मनात येतात, स्वप्न मोठी आहेत, योग्य मार्ग सुचत नाहीत, संधी मिळत नाहीत, वगैरे वगैरे.

न राहवुन मी त्याला नकळत मी मोटव्हेशनचे धडे द्यायला लागलो, की तो म्हणाला, “सगळं कळतयं, सर, वळत नाही!..”

मित्रांनो, हे त्याचं एकट्याचं दुखणं नाही, हे आपल्यापैकी बहुतांश लोकांचं दुखणं आहे, आपल्या प्रत्येकालाच, कुठल्याही क्षेत्रातलं, किती नॉलेज असतं?, अवघड प्रसंगात, दुसर्‍याला मार्ग सुचवण्याचं, सल्ले देण्याचं काम आपण सगळे सहजतेने करु शकतो, मग आपल्या स्वतःच्या आयुष्यात मोठा बदल घडवणं, आपल्याला का जमु नये? “कळतयं, पण वळत नाही.”

“कळतयं, पण वळत नाही.” म्हणजे काय?

कळतयं कुणाला?

मन आणि बुद्धीला – पुस्तकं वाचुन, व्हिडीओ बघुन, व्हॉटसएप फेसबुक वर ज्ञान घेऊन, मनाला खुप गोष्टी कळतात, रोज ह्या ज्ञानात भरपुर घसघशीत भर पडत आहे.

वळत कोणाला नाही?

शरीराला! विचार आणि कृती यांच्यात अंतर पडलं की ‘कळतयं पण वळत नाही’ ही अडचणीची अवस्था प्राप्त होते.

उदा. सुविचार, एखादा प्रेरणादायी लेख पटला, आवडला, आता मनाने पक्कं ठरवलं, उद्या सकाळी लवकर उठुन फिरायला जायचे, व्यायाम करायचा, प्राणायाम करुन ध्यान करायचे, मनाने पक्कं ठरवल्यामुळे ठरलेल्या वेळी जाग पण आली, पण आता शरीराचा विरोध सुरु होतो.

  • मन म्हणतं, उठा, उठा, सकाळ झाली, व्यायाम करायची वेळ झाली…… पण निद्रासुख घेत असलेले सगळे ‘इंद्रिय’ त्याविरुद्ध बंड करतात.
  • डोळे म्हणतात, सगळं खरं आहे, पण मला उघडावं नाही वाटत आहे….😥
  • नाक म्हणतं, उठु नकोस, माझ्यातुन अजुन पाणी येईल….🤧
  • अंग म्हणतं, खुप थकवा आलाय, थोडा वेळ पडुन रहा….🤒
  • डोकं म्हणतं, नको, मी पण ठणकतोय…..🤕
  • पाय म्हणतात, नको, मी पण दुखतोय…..😩

एका मनावर सहा-सात जण भारी पडतात, आणि हा विचार करण्यातच झोपे्चा दुसर राऊंड पुर्ण होतो. 🛌

उशीरा उठल्यावर मन त्याला टोचणी सुरु करतं, “तु असलांच आहेस, जे ठरवतोस, ते कधीच करु शकत नाहीस, तु अपयशी झालास!” ह्या द्वंद्वाचा परीणाम आत्मविश्वास ढासळण्यात होतो.

कारण एकच – कळतयं, पण वळत नाही!

अजुन एक उदाहरण बघु

एखाद्या लठ्ठ व्यक्तीला माहीत असतं, चिप्स, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज खाऊ नये, त्याचं मन बुद्धी त्याला आठवण करुन देतात, माझी चरबी वाढत आहे, शरीर बेडौल झालय, वजन तुफान वाढलयं, हे माझे शत्रु आहेत, ओके, मी हे खाणार नाही, पण

स्टमक मात्र म्हणतं, ते काहीही असो, मी भुकेलेला आहे, मला आत्ता या क्षणी खाद्य हवं आहे.

जीभ म्हणते – मला टेस्टी, चिप्स, पिझ्झा किंवा फ्रेंच फ्राईज हवेच आहेत, ती चव आनंददायी आहे, आणि मला ती पुन्हा एकदा अनुभवयाची आहेच.

पुन्हा एकदा भावना जिंकतात, ज्ञान हरतं, विचार हरतात.

दोघांच्या भांडणात गोंधळलेले, आपण मॅक्डोनाल्ड कडे वळतो, पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतो.

‘मला हाये ना, भुक कंट्रोलच होत नाही, कारण कळतयं पण वळत नाही.”

पुन्हा मनाची टोचणी – तु खुप कमकुवत आहेस, लगेच इंद्रीयांना हार गेलास! …….. पुन्हा आत्मविश्वास खल्लास!

स्वतःमधली ही वाढती अस्वस्थता दुर करण्यासाठी टी.व्ही बघितला जातो, लंडनच्या भाषणात मोदी काय म्हणले? पासुन राधिका गुरुनाथला कसा धडा शिकवते? रांगडे पाटलाच्या घरात काय चाललयं? नाहीतर असलंच काहीतरी……

ऑनलाईन पोर्टल चाळत बसायचे, अपडेट राहण्याच्या नावखाली फेसबुक व्हॉट्सएपवर मनोरंजन शोधायचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो. मनोरंजनाची इतकी साधने असुनही ‘करमना झालयं’, ‘बोअर व्हायलयं’ अशी मनाची तक्रार सुरुच का राहते?

कारण “कळतयं पण वळत नाही.”

आता हीच गोष्ट आयुष्यातल्या इतर ठिकाणी होते.

एखादा महाविद्यालयीन तरुण मोठ्मोठी स्वप्ने पाहतो, त्याच्यासमोर स्पष्ट असतं, एमपीएससी होण्यासाठी खुप घासावं लागतं, पुस्तकं जमवतो, लायब्रर्‍या लावतो, अभ्यासिकांचे पैसे भरतो, टाईमटेबल बनवतो, काही दिवस उत्साहाने पाळतोही, मग मोटीव्हेशन छुमंतर होतं.

अभ्यासात मन लागत नाही. आता आयपिएल बघावीशी वाटते , सगळे सांगतात अभ्यास कर, “कळतयं पण वळत नाही.”

समजा, तुम्ही एखादा बिजनेस करता, तुम्ही द सिक्रेट पुस्तक वाचता, लॉ ऑफ अट्रॅक्शन्चे व्हिडीओ बघता, लेख वाचता, शक्य ती सारी माहीती एकत्र करता, तुमचा व्हिजनबोर्डही बनवता, त्याप्रति मनातुन शंभर टक्के समर्पित होता.

ह्या सगळ्याचा परिणाम तुमच्या सुप्त मनात स्वप्नांची पेरणी होऊन, नवनव्या उत्साहवर्धक कल्पनांची रोपं जोमाने उगवु लागतात. त्या कल्पनांना प्रत्यक्षात आणलं की आयुष्य तीनशे साठ अंशाने बदलणार असतं.

पण आता आळस येऊ लागतो. ध्येयाप्रती तीव्रता आधीपेक्षा कमी होवु लागते. सुरक्षित कोषातुन बाहेर पडुन अधिकचं काम करायला शरीर स्पष्ट नकार देतं. ….मग कारणं शोधली जातात.

  • आज खुप उन आहे.
  • सध्या ही गोष्ट करायला पैसे नाहीयेत.
  • “बघुया, कल्पना छान आहे, अंमलात आणुया थोड्या दिवसात”, तो दिवस दुर दुर जात राहतो. पुन्हा तीव्र इच्छा पेटल्याशिवाय तो दिवस येत नाही.

आता बंडखोरीचा झेंडा सुप्त मन आपल्या तगड्या हातात घेतं, मी तुला एकाहुन एक अदभुत, नावीन्यपुर्ण, तुझ्या फायद्याच्या कल्पना पाठवल्या, तु त्यांचा कचरा केलास, तु नालायक आहेस, एक नंबरचा आळशी आहेस, XXXXXXX XXXXXXXXXXX XXXXXXXXXXX रिकाम्या जागा भरुन घ्या.

तर सुप्त मन खुप ताकतवान आहे, त्याला दुखावलं की मनाच्या घरासमोर, विचारांच्या दारासमोर, स्ट्रेस, फस्ट्रेशन, डिप्रेशन आगंतुक ठाण मांडुन बसतात. भावनांच्या भिंतीना तडे जातात.

कधी रागाची शॉर्टसर्किट होऊन चिडचिड होते, कधी आत्महत्येचा दोर खुणावु लागतो.

हे सगळं टाळता येऊ शकतं का? नक्कीच हो. एक हजार एक टक्के हे सारं टाळता येतं आणि आनंददायी जीवनाकडे वाटचाल करता येते.

हे सगळं मी माझ्या अनुभवावरुन सांगत आहे, जर हा संघर्ष तुम्ही तुमच्या जीवनात अनुभवताय, तर हे मी ही तुमच्याइतकचं फेस केलयं, म्हणुन तर मी हे इतकं डिटेल लिहु शकतो.

कळतयं पण वळत नाही, ही माझी समस्या कित्येक वर्ष होती, त्या धडाडीच्या वर्षांमध्ये मी कसलीच प्रगती करु शकलो नाही.

माझं वजन भयंकर वाढलं होतं, उधळपट्टी सुरु होती, आर्थिक ताणतणाव होते, नातेसंबंध प्रेमळ नक्कीच नव्हते, ना जवळचे असे मित्र होते, मन सतत अस्थिर होतं, आयुष्यच नकोसं झालं होतं.

एके दिवशी मलाच अशा नीरस आयुष्याचा कंटाळा आला, आणि मी काही उपाय शोधुन काढले, अंमलात आणले आणि माझं आयुष्य बदललं.

आता आनंदी जीवन जगण्याची आणि प्रश्नांकडे तटस्थपणे बघण्याची कला मी बर्‍यापैकी शिकलो आहे. आर्थिक, मानसिक आणि सामाजिक पातळीवर मी समाधानी आहे.

मी अंमलात आणलेले उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, तुम्हालाही ह्यात काही नवीन भर टाकायची असल्यास स्वागत आहे.

आज सगळे मिळुन ‘कळतयं, पण वळत नाही’ ह्या आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या शत्रुला आपल्या मनातुन उपटुन दुर फेकुन देऊयात.

‘वळवण्यासाठी’ रामबाण उपाय

१) मन आणि शरीर यांना जोडणारा एकच दुवा आहे, श्वास! – कसलाही निगेटीव्ह (म्हणजे त्रास देणारा) विचार मनात आला, की (शक्य असल्यास डोळे बंद करुन) जोरजोराने वीस दिर्घ श्वास घ्यायचे.

टेंशन गायब होणार म्हणजे होणार.

२) जागृत मन इंद्रियांच्या आग्रहापुढे टिकत नाही, त्यासाठी मोठ्ठा बॉस सुप्त मनाच्या हातात विचारांच्या ऑफीसचा ताबा द्या. –उदा. सुप्त मन डोळ्यांना आज्ञा देईल, मला स्वतःला आनंदी ठेवायचे आहे, त्यासाठी व्यायाम, प्राणायाम, ध्यान अत्यावश्यक आहे, तुझी इच्छा असो वा नसो, तुला उघडावेच लागेल.

आता डोळे विरोध करु शकत नाहीत, त्यांची झोप उडुन जाईल, जीभ असो वा अजुन कोणी, एकेक इंद्रिय सुप्त मनाच्या शक्तीशाली ताकदीमुळे विरोध सोडुन देईल. गप्पगुमाने ऐकेल.

३) मन अनुकुल असो वा नसो, कामाला सुरुवात करा. स्वतःच्या बाबतीत कठोर व्हा. – मन फार गंमतीशीर आहे, एखाद्या कामाची शक्य तितकी टाळाटाळ करतं, आणि जबरदस्तीने, अनिच्छेने त्या कामाची सुरुवात केलीच, तर मात्र तीच गोष्ट करण्यात मजा यायला लागते, त्याचा अंतर्विरोध फक्त सुरुवात करण्यापुरताच असतो.

४) ‘रिप्लेस’ करा, ‘बदली’ करा – इतके सगळे करुनही एखाद्या दिवशी घात होईल आणि घातक इच्छा प्रबळ होतील. उदा. आपलं मन, इंद्रीय सगळे म्हणतायतं, खुप दिवस झाले, चल, आज पिझ्झा, फ्राईज चापुन कोक पिऊ.

आता त्या इच्छेचा जितका विरोध कराल, तितकी ती बळावणार, म्हणुन अजिबात विरोध करायचा नाही.

कधी कधी बॉस कसा लॉलीपॉप दाखवुन, सगळ्यांना शांत करतो, तसं सुप्त मन तडजोडीच्या सुरात म्हणालं, की बघा, पोरांनो, तुमची पिण्याची इ्च्छा पुर्ण नक्की होईल, पण कोक तब्येतीला चांगलं नाही, फ्रुट जुस मिळेल, पिणार का? बोला.

हुर्रे!….हो, हो, आम्ही तयार आहोत, जीभेसहीत सारे जिंकल्याच्या अविर्भावात ओरडतात, अशाच प्रकारे वाईट सवयींना चांगल्या, आरोग्यदायी, आपल्याला फायदा होईल अशा सवयींनी रिप्लेस करायचं.

५) पोस्टपोन करा. – समजा, एखादा वाईट विचार वारंवार मनात रुंजी घालतोय, जसं की आपल्या एका मित्राला काल आत्महत्या करावी वाटत होती, ही तर कॅंसरची लास्ट स्टेज, इथं गोळ्या औषधं काम करणार नाहीत!

समजा तुम्हाला तीव्रपणे एखाद्याला कडकडुन भांडावं-मारावं वाटतयं, सिगरेट दारु प्यावी वाटतेय, किंवा तुमची कसलीही एक वाईट सवय जी तुम्हाला बदलायचीय…..

अशा दुष्ट विचारांना फक्त पुढे ढकला.

  • आत्महत्या करायचीय, आजचा दिवस जगुन घेऊ, उद्या करु,
  • टि.व्ही. बातम्या, सिरीअल खुप बघावं वाटतयं, काही तासांनी बघु!
  • पिक्चरला जावं वाटतयं, पुढच्या आठवड्यात जाऊ!
  • भांडण मारामारी, शनिवारी ठरवु!
  • राग राग करायचायम संध्याकाळी करु!

वेळेच्या ओघात भावनांची तीव्रता कमी होत जाते, तुम्ही जिंकता!

“कळते पण, आणि हळुहळु वळते पण.”

अजुनही खुप काही सांगायचे आहे, लिहायचे आहे✍….. पण महीनाभर तेच करायचे आहे😘 , म्हणुन थांबतो.

येणारी प्रत्येक सकाळ तुमच्या आयुष्यात कळणारी आणि तुमच्या मनाप्रमाणे वळणारी असो, अशा शुभेच्छांसह, शुभ सकाळ!

धन्यवाद आणि मनःपुर्वक आभार!

Image Credit: freepik

वाचण्यासारखे आणखी काही….

आर्थिक
प्रेरणादायी
पालकत्व

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी८३०८२४७४८०या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

4 thoughts on “कळतयं, पण वळत नाही!”

    • सध्या कुठलाही कोर्स शेड्युल नाही. मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स विनामूल्य मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या व्हाट्स ऍप नम्बरवर ‘अपडेट्स’ असा मेसेज पाठवल्यास अपडेट्स पाठवले जातील. ‘अपडेट्स सब्स्क्रिप्शन’ बंद करायचे असल्यास STOP UPDATES असा मेसेज पाठवावा लगेल.

      धन्यवाद.

      Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय