हँगिंग पिलर म्हणजे तरंगता खांब असलेलं आंध्रप्रदेशातलं लेपाक्षी मंदिर

भारत जगातील एकमेव देश असा आहे की ज्याच्या संस्कृतीचे दाखले आजही हजारो वर्षांची संस्कृती दाखवत आहेत.

हे सांगताना ह्यातील महत्वाचा फरक जो भारत आणि इतर देशात आढळतो तो म्हणजे हे संस्कृतीचे दाखले अगदी भारताच्या उत्तर टोकापासून ते दक्षिण टोकापर्यंत आणि चारी दिशांना आढळून येतात.

इतर देशात ते काही ठिकाणा पुरती मर्यादित आहेत. चारी दिशांना असलेलं हे वैभव आपल्याला आजही भारताच्या त्या संस्कृतीचं अस्तित्व कुठवर होतं ते दाखवत आहे.

तुम्ही कुठेही जा पण आपल्या सोबत कला, तंत्रज्ञान, विज्ञान ह्याचा अविष्कार असलेली मंदिरे भारताची संस्कृती आजही टिकवून आहेत.

ग्रंथात किंवा आपण ज्याला पौराणिक कथेत लिहलेल्या, सांगितलेल्या अथवा एका पिढीकडून पुढल्या पिढीकडे दिलेल्या गोष्टी आपण किंवा अनेकजण थोतांड मानतात.

ह्या गोष्टी रचित आहेत किंवा त्याला कोणता संदर्भ अथवा वैज्ञानिक आधार नाही हे कारण ह्याला नाक मुरडणारे सांगत असतात.

देव, दानव ह्या भ्रामक कल्पना ते रामायण, महाभारत किंवा इतर अनेक संदर्भ हे सगळे फक्त काल्पनिक आहे असं मानणारा एक बुद्धीजीवी वर्ग आज आपल्याच संस्कृती ला समजून घ्यायला कमी पडतो की काय अस वाटू लागलं आहे.

विज्ञानाच्या कक्षेत ह्या कथा सिद्ध करता येतं नाही म्हणून ते थोतांड असं म्हणतांना ह्याचे दाखले म्हणून आज उभी असलेली हजारो वर्षाची परंपरा असेलेली मंदिरं मात्र एलियन आणि परग्रहावरील लोकांनी बांधली अशी पाश्चिमात्य लोकांनी उठवलेल्या आवईमध्ये आपला आवाज मिसळतो आहोत.

पौराणिक कथेत वर्णन केलेलं जर सगळं खोटं असेल तर वेरुळच्या कैलास मंदिरात चित्रित केलेलं रामायण काय सांगते?

बरं ज्या पद्धतीने आज रामायण सांगितले जाते त्याच पद्धतीने ते कैलास मंदिरात चित्रित केलेलं आणि कोरलेलं आहे. कैलास मंदिर आजही माझ्या मते विज्ञान, तंत्रज्ञानाचा सर्वोच्च अविष्कार आहे.

जगातील कोणतीही कलाकृती ह्या मंदिरापुढे फिकी आहे. कारण आजही ह्याच्या निर्मितीची कल्पना करणं पण शक्य होतं नाही इतक्या उच्च प्रतीचं तंत्रज्ञान, विज्ञान ह्यात वापरलं गेलं आहे.

जर मग अश्या मंदिरात रामायण पूर्णपणे चितारलेलं आहे तर त्याला नक्कीच काही आधार आणि खरेपणा असल्याशिवाय सर्वोच्च कलाकृतीत येणं शक्य नाही.

ह्याच रामायणाच्या एका कथेतील पात्राचा आधार घेऊन त्या जागेवर असलेलं एक मंदिर आपल्या सोबत हजारो वर्षांचा इतिहास घेऊन उभं आहे.

लेपाक्षी, आंध्रप्रदेश इकडे असलेलं विरभद्र मंदिर आजही तंत्रज्ञान आणि विज्ञान ह्या सोबत अनेक रहस्य घेऊन भारताच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देते आहे.

लेपाक्षी मंदिरा बद्दल पुराणात असे म्हंटल जाते की सितेला रावण लंकेला घेऊन जात असताना जटायु पक्षाने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. ह्यात रावणाने त्याचे पंख छाटले.

जटायु पक्षी जखमी होऊन पडला. राम सितेला शोधत ह्या जागी आल्यावर त्यांनी जखमी जटायू ला उठण्याची आज्ञा केली. ह्या आज्ञेला कन्नड मध्ये ‘ले – पाक्षी’ असं म्हणतात.

म्हणून त्या जागेला लेपाक्षी असं म्हंटल गेलं. हा पौराणिक संदर्भ बाजूला ठेऊन त्या ठिकाणी असलेल्या मंदिराकडे आपण आज तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या कक्षेतून बघितलं कि अनेक गोष्टी आपल्याला स्तिमित करतात.

लेपाक्षी मंदिराचं निर्माण विजयनगर साम्राज्यात साधारण १५ व्या शतकात झालं असल्याची नोंद असली तरी इकडे असलेल्या दोन गोष्टी मात्र कमीत कमी हजार वर्षापेक्षा जुन्या आहेत.

लेपाक्षी मंदिराच्या समोर असलेला नंदी तब्बल २० फुट उंच आणि ३० फुट लांब आहे.

हा पूर्ण नंदी एका दगडातून कोरण्यात आलेला आहे. नंदी मंदिरापासून २०० मीटर (६६० फुट) लांब आहे. ह्याची स्तिमित करणारी गोष्ट अशी आहे की हा नंदी आणि इकडे असलेलं प्रचंड असं नागलिंग एकाच सरळ रेषेत आहेत.

लेपाक्षी मंदिरात शंकराच्या अनेक पिंडींपैकी सगळ्यात मोठं असलेलं नागलिंग हे पण ग्रनाईट च्या एकाच दगडातून कोरण्यात आलेलं आहे. शंकराच्या पिंडीवर ७ नागांच छत्र आहे.

पूर्वीच्या काळी शंकराच्या पिंडीचं दर्शन हे नंदीच्या कानावर अंगठा आणि पहिलं बोट ठेवून त्यातून घेतलं जायचं. काळाच्या ओघात ही पद्धत बदललेली असली तरी पूर्वीच्या काळी प्रचलित होती.

६६० फुटापेक्षा जास्त लांब असलेल्या नंदीच्या कानांच्या मधून आजही ह्या नागलिंगाचे त्याच पद्धतीने दर्शन होते. म्हणजे हे नागलिंग आणि नंदी ह्यांची मांडणी एका सरळ रेषेत केली गेली आहे.

२०० मीटर पेक्षा जास्त अंतरावरून दोन कलाकृतींची एका सरळ रेषेत मांडणी तसेच त्यांची उंची ह्यातले गुणोत्तर काय दर्शविते? ह्यात गणित, विज्ञान, तंत्रज्ञान असल्याशिवाय हे शक्यच नाही.

आत्ता जे मंदिर अस्तित्वात आहे त्याच्या बांधकामाची पद्धत आणि ह्या दोन कलाकृतींच्या बांधकामात वापरण्यात आलेली पद्धत ह्यात कमालीचा फरक आहे.

म्हणजे मुख्य मंदिराचं बांधकाम हे ह्या दोन कलाकृतींच्या भोवती खूप नंतर झालेलं आहे. लेपाक्षी मंदिरात एकात एक दगड विशिष्ठ पद्धतीने साच्यात बसवून बांधकाम झालेलं आहे तर नंदी आणि नागलिंग हे एकाच दगडातून कोरलेलं आहे.

लेपाक्षी मंदीराचं अजून एक आकर्षण म्हणजे इकडे असलेला तरंगता खांब.

इकडे असलेला एक खांब अधांतरी होता. ह्या च्या खाली साधारण अर्ध्या इंचाची गॅप आहे. हे कसं शक्य आहे ह्यासाठी ब्रिटीश इंजिनिअर हॅमिल्टन ह्याने १९१० साली हा खांब हलवण्याचा प्रयत्न केला.

पण ह्यामुळे पूर्ण मंदीराचं बांधकाम आपल्या जागेपासून हललं गेलं. हा खांब एक टोकाला जमिनीला टेकला पण त्यामुळे पूर्ण मंदीराचं बांधकाम विस्कळीत झालं.

अजून जास्ती ह्याला हलवण्याचा प्रयत्न केल्यास पूर्ण मंदिर कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याने आपला नाद सोडून दिला. पण ह्यामुळे मंदीराचं नुकसान झालं ते कायमचं.

आज हा तरंगता खांब एका टोकाला जमिनीला टेकलेला असला तरी त्याच्या निर्मितीचं तंत्रज्ञान आजही एक रहस्य आहे.

हा खांब पूर्णपणे एकसंध दगडातून बनवला गेला असून ह्याचं वजन हजारो टन आहे. इतक प्रचंड वजन असलेला हा खांब एकतर अधांतरी कसा ठेवला गेला असेल?

तसेच कश्या पद्धतीने तो मुख्य मंदिराच्या साच्यात बसवला गेला असेल? जर ह्या खांबाच्या हलण्याने पूर्ण मंदिराच्या बांधकामाला धक्का बसत असेल तर हा खांब सेंटर ऑफ ग्राव्हीटी अथवा अन्य कोणत्या वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून असा बनवला गेला आहे का?

ह्या आणि अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं आजही उलगडलेली नाहीत. कारण मंदिरात अश्या खांबाची गरज, ते असं किचकट तंत्रज्ञान का वापरलं गेलं असेल अश्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आजही अनुत्तरीत आहेत.

ह्यातील तज्ञ आपापल्यापरीने उत्तरं सांगत असले तरी सगळे एकाच गोष्टीपाशी येऊन थांबते ते म्हणजे ह्या मंदिराच्या निर्माणातील तंत्रज्ञान आणि विज्ञान.

लेपाक्षी मंदिरात असलेला पायाचा ठसा हे पण आज न उलगडलेलं रहस्य आहे. पूर्वीच्या काळी माणसांची उंची, वजन आणि शरीर रचना प्रचंड होती असे दाखले देणारे अनेक अवशेष सापडले आहेत.

पूर्वीच्या काळी माणसांची उंची ९ फुटापेक्षा जास्ती आणि त्या आधीच्या काळात ती तब्बल २५ फुटापर्यंत असावी असं पौराणिक ग्रंथ ते आज सापडलेल्या काही अजस्त्र सांगाड्यावरून दिसून येते.

अर्थात ह्या बद्दल मतभेद असले तरी साधारण १५ ते २५ फुट उंची असलेल्या माणसाच्या पायाचा ठसा हा ह्या मंदिरात असलेल्या पायाच्या ठसाच्या आकाराशी मिळू शकतो.

त्याच वेळी नंदी ची उंची ते नागलिंगम ह्यांची उंची पण ह्या आकाराच्या माणसाला दर्शन घेण्यासाठी मिळते जुळते आहे.

Footprint-in-lepakshi-temple

कारण इतकी उंची असलेला माणूस प्रचलित रिती प्रमाणे शंकराच्या पिंडीच दर्शन घेऊ शकला असेल. ह्या जर तर मध्ये अनेक गोष्टी अनुत्तरीत असल्या तरी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींच्या निर्मितीत विज्ञान आणि तंत्रज्ञान वापरलं गेलं आहे.

ह्या मंदिरात असलेली गाईची ऑप्टीकल इल्युजन असलेली प्रतिमा काय दर्शविते? एकाच मूर्तीमधून गाय तीन वेगवेगळ्या दिशांना बघत असल्याचा अनुभव आपण घेऊ शकतो.

पौराणिक कथा आणि त्यातल्या गोष्टींवर, इतिहासावर आपला विश्वास नसणं समजू शकतो पण त्याच कथेंवर आधारित असलेल्या मंदिराच्या बांधणीतील तंत्रज्ञान आणि विज्ञानाचं उत्तर आपल्याला आजही देता येत नाही ह्याचा विचार पण आपण सगळ्याच गोष्टी थोतांड बोलताना करायला हवा.

कारण जर सगळं थोतांड असेल तर मग ह्या मंदिरांच निर्माण होणं शक्यच नाही. आज तब्बल हजारो वर्षानंतर असं एक नाही तर शेकडो मंदिरं काळाच्या कसोटीवर टिकून भारतात आहेत.

प्रश्न हा आहे की आपण त्यांच्या कडे वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाच्या चष्म्यातून कधी बघायला शिकणार आहोत.

Manachetalks

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय