सुखी वैवाहिक जीवन!

‘लॉ ऑफ अट्रॅक्शन’ वापरुन आयुष्यात लवकरात लवकर स्वप्नं पुर्ण करण्यासाठी कल्पनाशक्ती वापरुन, नियोजन करुन, सकारत्मकता कशी वाढवावी, ह्या एका मुळ उद्देश्याने मी व्हॉट्सएप कोर्स घ्यायची सुरुवात केली, पण कित्येक लोकांची खरी समस्या पैसे कमवण्यासंबंधी नाहीच, ते तर नखशिखान्त नात्यांच्या गुंत्यातच अडकलेत, काहीजण बळजबरीने लग्नाच्या नात्यांची ओझी वाहतायत,

कित्येकजणी मनातल्या मनात घुसमटतायत…

एक बहादुर नवरा, लग्नाच्या बायकोला सोडुन भलत्याचं ‘खर्‍या प्रेमाच्या’ पाखरावर जीव ओवाळुन टाकतयं, आणि त्या बिचार्‍याची पत्नी लेकरांना कुशीत घेऊन सैरभैर झालीय,

कोणी स्त्री परपुरुषासोबत नको ते करुन बसलीय, आणि त्याबद्द्लचा अपराधबोध तिला छळतोय, (असं तीच म्हणे!)

कोणी गडी भरलेला सुखाचा संसार आणि मांडलेला लग्नाचा मांडलेला डाव उधळुन टाकयला आतुर झालाय,

कोणाचं काय तर कोणाचं काय, ऐकावं ते नवलचं? नाही का?

प्रश्न एक – सर, माझ्या लग्नाला आठ वर्ष झाली, मला एक मुलगा आहे, खरंतर आईवडीलांच्या इच्छेखातर मी लग्न केले, कशाची कमतरता नाही, पण अजुनही माझे माझ्या नवर्‍याशी प्रेमळ असे सुर जुळलेच नाही, त्याला अजुनही आपले मानलेच नाही, आमच्या नात्यात अजुनही औपचारिकताच आहे, त्यामुळे मनात खोल निराशा येते.

प्रश्न दोन – माझे लग्न २०११ मध्ये झाले, एक मुलगा आहे, मला माझे सासरचे गाव अजिबात आवडत नाही, नवरा अजिबात वेळ देत नाही, लाड नाही की कोडकौतुक नाही, कसल्या महत्वकांक्षा नाहीत, डोंबलाची स्वप्ने नाहीत, आलेला दिवस ढकलायचा, जीवन अगदीच नीरस झालयं.

प्रश्न तीन – मी तीस वर्षांचा असुन चार वर्षापुर्वी माझं लग्न झालं, मला माझी बायको आवडेनाशी झालीय, माझं कॉलेजमध्ये एका मुलीवर जीवापाड प्रेम होतं, ती जर मला भेटली तर मी बायकोला सोडायला तयार आहे, त्या मुलीला आपलंस करण्यासाठी मी लॉ ऑफ अट्रॅक्शन कसा वापरावा? मार्गदर्शन करा.

ही काही प्रतिनिधिक उदाहरणे. लग्न म्हणजे काय, खेळ वाटतो,य का ह्या सगळ्यांना? का भातुकलीचा, लुटुपुटीचा डाव वाटतो, गंमत म्हणुन मांडला, गंमत म्हणुन मोडला?

आपण सगळे लग्नच का करतो, काहीजणांना लग्नाचा मुळ हेतु गवसत नाही बहुतेक? आणि काहीजण तो सोयीस्करपणे विसरतात, आणि इकडेतिकडे तोंड मारतात.

लग्न किती पवित्र बंधन आहे…..

आयुष्यभरासाठी एकमेकांचे व्हायचे, ‘मी तुला सांभाळीन’ हे वचन द्यायचे आणि ते शेवटच्या श्वासापर्यंत पाळायचे, म्हणजे लग्न!

जोडीदाराच्या चुका पोटात घालायच्या, त्याला आपलंच रुप मानायचं, त्याच्या सुखासाठी झटायचं, त्याला हवं नको ते बघायचं, म्हणजे लग्न!

दोघांनी मिळुन हसर्‍या चेहर्‍यांनी, मिचमिचत्या डोळ्यात, स्वप्नं साठवायची, आणि त्या स्वप्नांसाठी आयुष्य समर्पित करायचं, म्हणजे खरं लग्न!..
एकमेकांना छेडायचं, रुसायचं, फुगायचं आणि मनवायचं, आणि एका क्षणात सगळं विसरुन मिठीत यायचं, यासाठी करावं लग्न!

थकला भागला, दिवस संपला, की संध्याकाळी आतुरतेने तिला पहायला म्हणुन धावतपळत घरी जाऊन बेल दाबायची, तिचं एक गोड हास्य पाहावं, सारा शीण पळुन जावा, ह्यासाठी करतात लग्न!

त्याला ही भाजी आवडते, तो पदार्थ आवडतो म्हणुन अंग ठणकतं असतानाही, त्याच्या आवडीचे मेनु बनवुन त्याला खाऊ घालावं, आणि त्याने तृप्तीचा ढेकर दिला की आपलंही पोट भरावं, ह्यासाठी करावं लग्न!

नुसत्याच आवश्यकता भागवण्यासाठी, कधी शरीराची भुक भागवण्यासाठी, आणि कधी सुख ओरबडण्यासाठी लग्न केलं तर पदरात निराशाच पडणार.

नवर्‍याने बायकोला भावनाशुन्य बनुन सुंदर बाहुली असल्यासारखं वागवलं तर ती ही नवर्‍यावर नाही, तर फक्त त्याच्या एटीएम कार्ड मध्येच सुख शोधेल,

मान्य आहे, नाती जपण्याची, रुजवण्याची, खुलवण्याची, फुलवण्याची जबाबदारी दोघांचीही आहे, समजा, नसेल तर तुमचा पार्टनर तुमच्यावर असं जीव तोडुन प्रेम करतं, पण तुम्हाला सुरुवात करायला कोण आणि का अडवतयं?

“इतके वर्ष मी तेच तर केलयं.” हे तुम्ही नाही, तुमचा इगो बोलत आहे.

“माझा काही सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही?” आहे ना, नक्कीच आहे, पण एका पारड्यात सेल्फ रिस्पेक्ट आणि दुसर्‍या पारड्यात ‘प्रेम’ ठेवलं तर प्रेमाचं पारडं जड व्हायला कोणाची हरकत आहे.

अमेरीकेतला रिसर्च सांगतो, एकदा घटस्फोट घेतलेली माणसं, आयुष्यभर सुख शोधत राहतात, तीनतीन लग्न करतात आणि आयुष्याच्या शेवटी ‘माझा पहिला जोडीदारच खुप छान होता,’ अशी उपरती करुन घेतात.

काही महिने सांभाळलेल्या कुत्र्याचा लळा लागतो, मग कित्येक वर्ष चोवीस तास सहवासात राहुनही आम्हाला आमच्या जोडीदाराचा लळा कसा लागत नाही?

का इतके कोरडे आणि भावनाशुन्य बनत चाललो आहोत? असा कसा आटलाय आपल्यातला प्रेमाचा झरा?

का लग्नाचा जोडीदार आम्हाला आपलासा वाटत नाही, आणि ते सुख शोधायला आम्हाला बाहेर जावे लागते?

कमवणार्‍या बायका घटस्फोटाची वाट धरतायत, आणि हा पर्याय नसलेल्या, हाऊसवाईफ निराशेनं, तटस्थपणे आलेला दिवस ढकलतायतं, आणि नशीबाला दोष देत, आतल्या आत कुढत जगतायतं.

किती जटील प्रश्ण आणि किती गुंतागुंतीची उत्तरं!

अरे, माझ्या भावा बहिणींनो, फेसबुकवर अनोळखी माणसांपाशी तुम्ही मनं रमवता, आपलेपणा शोधता, चर्चा करता, मोकळे होता, इतकं प्रेम आणि आपलेपणा आपल्या हक्काच्या माणसाला दाखवलात तर तो नाही का विरघळणार.

माझा विश्वास आहे, कितीही पाषाण ह्रुद्यी असला तरी त्याचं नक्की त्याचं मन पिघळुन जाईल.

लग्न करण्यामागचे हेतु आणि आयुष्याचे ध्येय स्पष्ट असले की सगळेच प्रश्ण सोपे वाटु लागतील. कोरडेपणाने लग्नाची ओझी वागवणार्यांसाठी आणि घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभा असलेल्या मित्रांसाठी काही उपाय सुचवत आहे.

1) कुटुंब टिकण्यासाठी – “मेड फॉर इच अदर’ या केवळ कल्पनेतल्या गोष्टी असतात, ते अवघड व अशक्य असते; परंतु “मोल्ड फॉर इच अदर’ करायचे ठरवले तरच कुटुंब टिकू शकतात.

2) मनमोकळा संवाद – पती-पत्नी यांनी एकमेकांना दाद देणे, कौतुक करणे ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्या योग्य शब्दांत मनमोकळे बोलणे गरजेचे आहे.

3) स्पर्धा टाळावी – पती-पत्नी दोघांनी एकमेकांशी स्पर्धा टाळावी. “तू माझ्या आई-वडिलांशी, नातेवाईकांशी नीट बोलला नाहीस आता मीही तुझ्या आई-वडिलांशी, नातेवाइकांशी चांगली वागणार नाही.

4) स्वीकार महत्त्वाचा – अपेक्षेप्रमाणे जोडीदार मिळाला नाही तरीही किरकोळ मतभेद व दोषांसहीत आपल्याला त्याला स्वीकारता येईल का, हा विचार प्राधान्याने करावा.

5) बदल करण्याची तयारी – मीच का बदलायचे हा अहंकार न ठेवता नातेसंबंध सुधारण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी दाखवावी.

6) जबाबदारीची जाणीव – लग्न झाल्यानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव आणि ती निभावण्याची तयारी ठेवून आपल्या भूमिका व दृष्टिकोनांमध्ये बदल करावेत.

7) तडजोडीची तयारी – कोणत्याही जोडप्यामध्ये वाद होतातच पण ते किती ताणायचे हे आपल्या हातात असते. वाद न वाढवता तडजोडीची भूमिका स्वीकारली तर हे वाद टोकाला जात नाहीत.

8) थोडक्यात, आपल्याला हवे तसे सगळेच कधी मिळत नाही; पण जे मिळाले आहे, ते मनापासून आणि आनंदाने स्वीकारले तर कौटुंबिक नाती टिकवणे शक्य होते.

9) आपलं काही चुकतंय का? आपण सुधारणा करतोय, मला वेळ द्यावा, असं मोठ्या मनाने जोडीदाराला सांगा.

10) आपलं नेमकं काय चुकतंय हे देखील जोडीदाराकडून जाणून घ्या.

11) जोडीदाराने सांगितलेले मुद्दे योग्य आहेत का? यावर विचार करा, सुधारणा करता येतील का यावर भर द्या.

12) मनात इगोला स्थान देऊ नका, कारण इगोचं भूत मानगुटीवर बसलं की भल्या भल्यांना संपवतं.

13) लग्न झाल्यानंतर आपला नवरा / बायको आणि मुलं हे आपलं सर्वस्व आहे, बाहेरच्या तिसऱ्या व्यक्तीला या जगात स्थान नको, अशी तिसरी व्यक्ती ज्यामुळे आपले नवरा-बायकोत तणाव निर्माण होतोय, त्याच्याशी त्वरीत संबंध संपवा, कारण आपला नवरा किंवा बायको हेच शेवटपर्यंत तुमच्यासोबत असणार आहेत. तिसरी व्यक्ती तुमचा वापर करतेय, हे कळण्यापूर्वी तुमचा संसार संपलेला असेल.

14) सोशल नेटवर्किंग, व्हॉटस अॅप, मेसेजिंग याचं चांगलं कम्युनिकेशन नवरा – बायकोत होऊ शकतं, तिसऱ्याशी प्रमाणापेक्षा किंवा गरजेपेक्षा जास्त संवाद नको, हा संवाद नवरा-बायकोतला संवाद हरवू शकतो, संशयास्पद वातावरण निर्माण करू शकतो.

15) आपल्या पत्नीशी आपण करत असलेल्या आर्थिक व्यवहाराबाबत चर्चा करा, एकमेकांच्या आवडीनिवडी समजून घ्या. एकमेकांच्या आवडीनिवडीचा आदर एकमेकांतील प्रेम वाढवेल.

16) नेट, सोशल नेटवर्किंग, व्हॉटस अॅपवर वेळ घालवण्यापेक्षा आपआपसात नव नवीन विषयांवर चर्चा करा.

17) चांगुलपणा बरोबर थोडासा Unpredictable पणा जपला, तर गोष्टी थोड्या सोप्या होतात.

धन्यवाद!…

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “सुखी वैवाहिक जीवन!”

  1. कृपया आपले नाव सांगा, मी कोणाचा डाटा वापरला ते ही कळवा.

    माझी चूक लक्षात आणून दिल्यास नक्की सुधारेन!.

    हीन शब्दांमुळे भावना दुखावल्या त्याबद्दल क्षमस्व!..

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय