Waste of Time!…. वेस्ट ऑफ टाईम

साऊथ इंडियन मूवी बघायला फार आवडतात तुषारला. रात्रीचं जेवण झालं कि काही तरी Change म्हणून तो ह्या Movie बघत बसतो जरावेळ. गौरी सुद्धा बघत असते त्याला Company म्हणून. त्या दिवशी जेवण आटपून दोघे ही जरावेळ एक movie बघत बसले होते. इतक्यातच सासू बाई त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या. काही हवं आहे का म्हणून तुषार ने आईंना विचारले.

“अरे काही नाही सहजच आले त्या टीव्ही चा आवाज ऐकून. काय साऊथ इंडियन movie बघता आहे वाटते.?”

“हो, नवीन वाटली म्हणून लावली आहे.”

“वेस्ट ऑफ टाइम, फुकट वेळ घालवता आहात. ह्यांनी त्याला मारायचं, त्यांनी याला. काय ती नुसती मारामारी. काही असतं त्यात बघण्यासारखं? मला काही समजत नाही.”

थोडा थांबून त्याने आई ला जवळ बसवलं आणि म्हणाला.

“Exactly! आपल्याला जे समजत नाही किंव्वा जे आवडत नाही म्हणून त्यात काय थरार असतो, आनंद असतो हे समजणार नाही. अगं आई आपलं असंच असतं, जी गोष्ट आपल्याला आवडत नाही त्या गोष्टी जेव्हा इतर लोक करतात तेव्हा आपल्याला ते ‘वेस्ट ऑफ टाईम’, वेळ फुकट घालवतात असे वाटते. जेव्हा तुम्ही किती तरी वेळ त्या सासा सुनांचे भांडणं बघत बसता तेव्हा तर तो वेळ आपल्या मनाला ताण देण्या व्यतीरिक्त काहीच करत नाही.”

“अरे ते फक्त वेळ जावा म्हणून बघत असते रे मी. मला नाही आवडत ते मारामारी बघायला.”

“बघ,म्हणजे जे आपल्याला आवडत नाही ते इतर कोणलाही आवडू नये असं आपल्याला वाटत असतं. साधं सोपं उदाहरण घे. तुला त्या सासू सुनेचा सिरीयल बघायला आवडतात, नाही का?”

“हो रे, आनंद मिळतो मला असं पारिवारिक सिरीयल बघितले की.”

“तेच ना आई. तुला ते बघून तुला आनंद होते. त्रासदायक गोष्टी कोणी उगाच बघत का? प्रत्येकाचा आनंद घेण्याची वस्तू किंवा गोष्ट वेगवेगळी असू शकते. म्हणून तर जगात विविधता आहे. अनेक स्वभावाचे लोक आहेत. मला movies बघण्यात आनंद होतो, तुला serials आणि लहान मुलांना त्यांचं कार्टून बघण्यात. प्रत्येकाला वाटतं मी जे करतो आहे त्याने माझा वेळ फुकट नाही जात आहे. बाकीचे जे बघतील ते वेस्ट ऑफ टाईम आहे. आपल्याला एखादी गोष्ट आवडते आणि नकळत आपण त्या गोष्टीवर जीवापाड प्रेम करायला लागतो. ती गोष्ट केल्याशिवाय आपल्याला करमत च नाही. एवढंच की प्रत्येकाचा आनंद उपभोगण्याचा मार्ग थोडा वेगवेगळा असतो. आनंद उपभोगण्या साठी काही वेळ देणं म्हणजे वेळ फुकट घालवणं होत नाही.”

“तुषार तू ‘काही’ वेळ म्हटलं. बरोबर ना? काही वेळ.”

“हो, काही वेळच. आणि हा काही वेळ व्यक्तीने आपापला ठरवायचा असतो. काही म्हणजे काही च असायला हवा, सगळा नाही.”

” जी माणसं आनंद न घेता नुसतीच बसून असतात ती आपला वेळ फुकट घालवत असतात . हे तरी पटतय ना तुला की नाही ?”

“नाही ,म्हणजे सर्वच बाबतीत ती फुकट घालवतात असे नाही. माणसाचं मन कधी रिकामं नसतंच. एवढंच कि सगळे विचार बोलून दाखवता येत नाही. तो चिंतन करत असतो आपल्या मनाचं ,जे करायला आपल्याला वेळच नसतो. आपण आपला वेळ फुकट घालवतो आहे कि नाही हे शेवटी आपलं आपणच ठरवायचं असतं. आणि एखाद्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो हे पटल्या वर कोण काय म्हणेल ह्याची पर्वा न करता त्याचा फक्त मनसोक्त आनंद लुटायचा असतो.”…

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय