Major Kaustubh Rane यांचे वीरमरण…….

काल जम्मू काश्मीर च्या गुरेज सेक्टर मधील बंधीपुरा जिल्ह्यात ८ अतिरेकी भारतात घुसण्याच्या प्रयत्नात असताना झालेल्या चकमकीत मेजर कौस्तुभ राणे ह्यांच्यासह ३ जवान शहीद झाले आहेत. ८ पेकी ४ अतिरेकी पुन्हा पाक व्याप्त काश्मिर मध्ये पळून गेले आहेत. तर २ अतिरेकी मारले गेले आहेत. तर २ जखमी असून त्यांचा शोध चालू आहे.

major kaustubhr rane

Major Kaustubh Rane (२९), रायफलमॅन मनदीप सिंग (२६), हवालदार हमीर सिंग (२८), हवालदार विक्रमजीत सिंग (२५) अशी शहीद झालेल्या सैनिकांची नावे आहेत. सगळ्यांची वयं बघितली तर सगळे वयाच्या ३० च्या आतील आहेत. ज्या वयात आयुष्याची सोनेरी स्वप्ने आपण बघतो त्या वयात त्यांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली.

ह्याच वर्षी Major Kaustubh Rane ना सेना मेडल ने गौरवण्यात आलं होतं. तसेच त्यांची बढती मेजर ह्या हुद्द्यावर झाली होती. एक मुलगा ते एक २ वर्षाच्या मुलाचा बाबा ह्या सगळ्या जबाबदारीतून त्यांनी देशाचं रक्षण आपलं परम कर्तव्य मानलं आणि ते पूर्ण करताना त्यांना आपल्या साथीदारांसह वीरमरण आलं.

स्वप्न बघणाच्या वयात हातात बंदूक घेऊन निधड्या छातीने शत्रूचा सामना करायला खूप काही लागते. सैनिक आतून पण एक आपल्याच सारखा भावना असणारा माणूस असतो हे आपल्या सारखे सामान्य नागरिक विसरतात. कधी स्वतःला त्या जागी ठेवून आपण विचार करू तेव्हा त्याचं समर्पण किती उच्च कोटीच आहे ह्याची थोडी तरी जाणीव आपल्याला होईल.

आता दोन तास सगळे हळहळतील आणि पुन्हा सगळं विसरून जातील. मिडिया तर वयाच्या ९० वर्ष पूर्ण झाल्यावर आपली यात्रा संपवलेल्या कोण्या एका राजकारण्याची अंतयात्रा आणि त्यावर होणारे विवाद ह्यावर आपला दिवस ढकलेल. कारण देशासाठी समर्पण काय असते? हे न आपल्याला कळलेलं आहे न आपल्या देशातील नागरिक आणि मिडिया ला. दोष देणार तरी कोणाला?

Major Kaustubh Rane आणि त्यांच्या ३ सहकाऱ्यांच बलिदान व्यर्थ न जाऊ देण्यासाठी आपण सैनिकाला समजून घेतलं तर खूप झालं. बाकी आर.आय.पी. म्हणून पुढे जात राहिलो तर त्याची किंमत आपल्याला कधीच कळणार नाही. Major Kaustubh Rane आणि त्यांच्या सहकाऱ्यांना माझा सलाम. एका भारतीय सैनिकाने पाठवलेली एक छोटी कविता त्यांच्यासाठी……………………

“बचपन का पालना ”

बचपन का पालना कल फिर से मिलेगा
माँ की गोद में जो मैं आऊंगा
तिरंगे में लिपटे हुए आकर
फिर माँ को खूब रुलाऊंगा

बरसों पहले किलकारियों में घर कितना खिला था
कल खामोश मेरे सन्नाटे से फिर सब को सताऊंगा
बुआ मेरी कान में फिर मेरा नाम पुकारेगी
मैं सुन भी लूंगा शायद पर फिर कुछ न बोल पाउँगा

बाबा मेरे मुझे कपडे लाते लड़खड़ायेंगे
मैं अब चाहकर भी उन्हें
गोद में उठाने को कह न पाउँगा ..

खिलोने मेरे अब घर में सारे समेटेंगे
तस्वीरों में ढूंढेंगे सब पर मैं नज़र नहीं आऊंगा

कुछ यादों की तो बात होगी
मैं कुछ ज़ख्म शायद दे जाऊंगा

किलकारिओं से आक्रोश तक मैं सब सब सब सुन पाउँगा
पर खला रह जाएगी के कुछ भी न बोल पाउँगा

बस एक बात का फक्र होगा …
घर के लिए दीवार पर एक तिरंगा ज़रूर छोड़ जाऊंगा ….

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय