अनोखं नातं.. त्या गाण्याशी..

Jag ne Chheena Mujhse Mujhe jo bhi Laga Pyara
‘जग ने छिना मुझसे मुझे जो भी लागा प्यारा!’…… रेडिओ वर सुरु असलेलं हे गाणं मनाला अलगत स्पर्श करून गेलं. नेत्राच आणि तिच्या बाबांचं अगदी आवडतं गाणं…….
मनात लपून बसलेल्या अनेक आठवणी हळूच भेटायला आल्या होत्या आज…… तिच्या बाबांची आठवण तिला नेहमीचीच, आज तेवढं निमित्त रेडिओ वर सुरु असलेलं गाणं झालं.
‘अगं वेडे, लग्न होतंय तुझं आता, नाकावरचा राग थोडा कमी करायचा. मोठी सून म्हणून जाते आहेस नवीन घरात. कोणी काही बोललं तर राग नाही वाटून घ्यायचा. कोणी perfect नसतं पण नवीन शिकण्याच्या प्रयत्नात तू नेहमी राहा. माणूस मनापर्यंत पोहोचायला हवा तरच नाती निर्माण होतील. तुझ्या घरात तुझी अशी जागा बनव की तुझं ‘असणं’ कुणाला जाणवलं नाही तरी चालेल, पण तुझी ‘अनुपस्थिती’ जाणवली पाहिजे.
आनंदी रहा आणि सगळ्यांना आनंदी ठेव……. चांगला विचार, चांगले ध्येय आणि आत्मविश्वास नेहमीच तुझ्याजवळ असू दे…….
“चांगला विचार असणारे लोक नेहमीच आठवणीत राहतात…… आणि सगळ्यांच्या मनातही..!”
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा