कम्प्युटरच्या जन्माची पहिली विट मांडणाऱ्या शास्त्रज्ञाची रोमांचकारी कहाणी

एलन ट्युरिंगच नाव आपल्याला तस अपरिचित. समोर आलेली सगळी सुखं आपल्याला आयती मिळतात पण ती तयार करण्यामागे ज्या लोकांच योगदान किंवा ज्या लोकांनी आपल आयुष्य वेचलेल असतं त्या बद्दल आपण अगदी अनभिज्ञ असतो.

एलन ट्युरिंग (Alan Turing) असच एक नाव. आज ज्या कॉम्प्यूटर नी आपल आयुष्य व्यापलं आहे त्या युगाची स्वप्न बघून सत्यात उतरवणारा एक संशोधक.

एलन ट्युरिंगला जगात कॉम्प्यूटर विज्ञानाचा जनक समजल जाते. मशीन पण विचार करू शकते हा विचार करणारा आणि तशी मशीन बनवणारा हा पहिलाच. ह्याच्या संशोधनाने जगाचं किंबहुना मानवजातीच एक पाउल पुढे टाकल होत.

Enigma Code Machine
एनिग्मा कोड मशीन

दुसऱ्या महायुद्धाचे पडघम त्या काळी ब्रिटन मध्ये वाजत होते. त्या वेळेस युद्धात नाझी ह्या हिटलर च्या सेने समोर अनेक देश नांगी टाकत होते.

अश्या वेळी हिटलर ची जमेची बाजू होती ती त्याच संदेशवहन. आपण कुठे, केव्हा आणि कसा हल्ला करणार ह्यासाठी त्याकाळी जर्मनी ने “एनिग्मा कोड- Anigma Code” चा वापर केला होता. एनिग्मा एक छुपी संदेशवहनाची एक पद्धत होती. ह्यात जे संदेश जायचे ते जरी रेडियो द्वारा पकडले गेले तरी त्यात काय माहिती पाठवली जाते आहे, ह्याचा काहीच उलगडा पाठवणारा आणि ज्याला पाठवला तो ह्यांच्याशिवाय शक्य नव्हतं.

रोज सकाळी ६ वाजता ह्या संदेशवहनाचे कोड बदलले जायचे. ज्यामुळे एका दिवसात जितके संदेश पकडले गेले त्याचं पुथ्थकरण करण्याअगोदर पूर्ण कोडींग व्यवस्था बदलून जायची. ह्या प्रत्येक मेसेज चे मिलियन, मिलियन कोंबीनेशन अवघ्या काही तासात डिकोड करण मानवी मेंदूच्या पलीकडच होत.

तसेच त्यात कोणतीच समानता आढळून येत नसल्याने नक्की कोणत्या दिशेने आपण जायचं ह्या संभ्रमात ब्रिटीश सरकार अडकल होत.

Alan Turing
बालपणीचा एलन ट्युरिंग

एलन ट्युरिंग हा हे संदेश डिकोड करणाच्या टीम मधील एक सदस्य होता. एलन लहानपणापासून एक प्रचंड हुशार विद्यार्थी होता. वयाच्या १५ व्या वर्षीच त्याने गणितातील कठीण समजली जाणारी प्रमेय लिलया सोडवली होती.

वयाच्या १६ व्या वर्षी अल्बर्ट आईनस्टाईन च्या संशोधनावर अभ्यास तर केलाच पण न्यूटन च्या लॉज ऑफ मोशन वर उठवलेले प्रश्न हि एलन ने त्या वयात समजून घेतले होते. जे कि त्याच्या वयाच्या मानाने खूप मोठी उडी होती. वयाच्या २२ व्या वर्षी किंग्स कॉलेज केंब्रिजची फेलोशिप त्याला मिळाली होती.

त्याकाळी त्याने कमिटी ला सेन्ट्रल लिमिट थियरम सिद्ध करून दाखवल होत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात एनिग्मा ला डिकोडिंग करण्यासाठी ब्रिटन ने एक सिक्रेट मिशन “ब्लेचले पार्क” इकडे हाती घेतल होतं. एलन ह्या टीम चा महत्वाचा सदस्य होता. एलन ट्युरिंग ने आपल कार्य आता त्याच्या “फेमस हट ८” ह्या कामाच्या स्थळी हलवलं.

इकडेच ट्युरिंग ने ठरवलं कि आपण जर्मनीच्या नौदलाचे एनिग्मा डिकोड करायचे. नौदलाचे एनिग्मा डिकोड करणं अजून कठीण काम होतं.

एलन ने “क्रिब बेस डिकोडिंग” चा वापर करत बॉम्बे च निर्माण केलं. पॉलिश नावावरून बॉम्बे हे नाव आलं आहे. त्याने इलेक्टोमेकॅनिकलचा वापर असलेली मशीन तयार केली कि एग्निमा ला अनेक वेगवेगळे कॉम्बिनेशन वापरून डिकोड करत असे.

हे कॉम्बिनेशनध १० च्या १९ ते १० च्या २२ व्या घातापर्यंत असत. ह्यात एलन ने लॉजिकल डिडक्शनचा वापर केला होता.

एलन ट्युरिंग च्या मशीन ने दुसऱ्या महायुद्धात नाझी सैन्याचे एनिग्मा कोड आपल्या मशीन ने डिकोडिंग करत ब्रिटन ला युद्धात खूप मदत केली.

नाझी सैन्याला हे कळू नये म्हणून जिकडे जास्त हानी होणार होती अश्या ठिकाणी कारवाई केली गेली. असं म्हंटल जातं कि एलन ट्युरिंग च्या डिकोडिंग मुळे दुसर महायुद्ध दोन वर्ष लवकर संपलं. एलन च्या मशीनमुळे ब्रिटन ला “बॅटल ऑफ अटलांटिक” आणि इतर अनेक युद्ध जर्मनी च्या विरुद्ध जिंकता आली.

एलन ने डिकोडिंग केल्यामुळे आधीच संहाराची कल्पना आल्याने तब्बल १४ मिलियन लोकांचे प्राण वाचवता आले. काळाच्या पुढे जाऊन मशीन ला विचार देणारा एलन स्वतःच्या आयुष्यात मात्र झुंजत राहिला. एलन ट्युरिंग हा होमोसेक्शुअल होता. आपली सहकारी आणि आपल्या होणाऱ्या बायकोला जॉन क्लार्कला ही त्याने ह्याची कल्पना दिली होती.

त्याकाळी होमोसेक्शुअल असण हे ब्रिटन मध्ये गुन्हा मानला जायचा. १९५२ साली होमोसेक्शुअल ह्या कायद्याखाली त्याला दोषी ठरवण्यात आल. एलन ने त्या काळी डी.ई.एस. च्या सांगण्यानुसार केमिकल कास्ट्रेशन ची औषधं घेतली. १९५४ साली सायनाइड च्या प्रादुर्भावामुळे त्याचा वयाच्या ४२ व्या वर्षी मृत्यू झाला.

२००९ मध्ये इन्टरनेट वरून एलन च्या चुकीच्या शिक्षेविरुद्ध चळवळ झाली. तात्कालीन ब्रिटन चे पंतप्रधान गोर्डन ब्रावून ह्यांनी ह्या प्रकरणी “ऑफिशियल पब्लिक एपोलोजी” ब्रिटन च्या सरकारकडून मान्य केली. तर २०१३ मध्ये ब्रिटन ची राणी क्वीन एलिझाबेथ टू ह्यांनी पण ह्या प्रकरणी माफी मागितली. एलन ट्युरिंग कायदा हा ब्रिटन मध्ये अश्या तऱ्हेने आधी होमोसेक्शुअल गोष्टीसाठी शिक्षा झालेल्या लोकांना माफी देणारा कायदा संमत केला गेला.

THE IMITATION GAME
चित्रपट – THE IMITATION GAME

आपल्या अचाट बुद्धीमत्तेने ज्ञानाची अनेक क्षितीज कवेत घेणारा, आपल्या कामगिरीने तब्बल १४ मिलियन लोकांचे प्राण वाचवणाऱ्या एलन ट्युरिंग बद्दल त्याच्या बुद्धिमत्तेचे फळ चाखून समृद्ध होणाऱ्या आपल्या नवीन पिढीला माहिती नाही ह्या पेक्षा दुर्दैव ते काय.

होमोसेक्शुअल असण म्हणजे पाप नसून ती एक अवस्था आहे व ती कोणत्याही नॉर्मल माणसाला येऊ शकते पण कायद्याच्या अनेक त्रुटींचा बळी ठरलेल्या एलन ट्युरिंग चा हा प्रवास सुंदर रीतीने समोर आणला आहे तो “द इमिटेशन गेम” ह्या चित्रपटातून. “बेनेडिक्ट कमबेरब्याच” ची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट त्याच्या पूर्ण आयुष्याला आपल्यासमोर उलगडतो तेव्हा आपण स्तब्ध होतो.

एक वेगळा पण बुद्धिमान, हुशार पण विक्षिप्त आणि होमोसेक्शुअल असलेला एलन उलगडताना मानवाच्या पुढच्या काही पिढ्यांना वळण देणारं संशोधन आपल्या समोर उलगडताना बघणं म्हणजे चित्रपटाचा क्लास आहे. एलनच्या आयुष्यावर आधारित Alan Turing – The Enigma एलन ट्युरिंग- द एनिग्मा हे पुस्तकवाचणे हा तर रोमांचकारी अनुभव आहे. कॉम्प्यूटर च्या जन्माची पहिली विट मांडणाऱ्या ह्या संशोधकास माझा मानाचा सलाम.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय