​द अपार्टमेंट- आपलासा वाटणारा हॉलिवूडपट

मोठ्या शहरात सध्या एक प्रॉब्लेम म्हणा अथवा अडचण जी सगळ्या प्रेमी युगुलांना सामोरी जायला लागते ती म्हणजे एक जागा!! एक निवांत, जगरहाटीपासून लांब, फक्त त्या दोघांची जागा… जिकडे काही क्षण एकमेकांसोबत घालवताना कोणी बघू नये असचं वाटत असतं. अगदी ते हातात हात घेणं असो वा एकमेकांचे श्वास एकमेकात मिसळण असो. आपली प्रायव्हर्सी जपण ही सगळ्यात मोठी अडचण आज मोठ्या शहरात भेडसावत आहे. जेव्हा गोष्टी ह्या समाजमान्य नसतात तेव्हा तर चार भिंतीचा आडोसा ही सगळ्यात मोठी गरज बनते. पण प्रत्येकवेळी ती गरज पूर्ण करणार कशी हाच मोठा यक्ष प्रश्न समोर असतो.

हॉटेलमध्ये जावं तर कोणी बघेल ह्याची भीती, घरी बोलवावं तर कोणी येईल ह्याची भीती. पण हे सगळ करायला चार भिंतीचा आडोसा जो कि सर्वात सुरक्षित असेल. जिकडे कोणीच आपल्याला ओळखणार नाही. म्हणजे अश्या चार भिंती कि जिथे भिंतीला कान नसतील आणि बघणारे डोळे पण. त्यासाठी आपण वाट्टेल ती किंमत मोजू. अश्याच एका चार भिंतीची कहाणी समोर घेऊन येणारा चित्रपट म्हणजे “द अपार्टमेंट”.

पडद्यामागची मज्जा घेण्यासाठी सज्जनतेचा बुरखा घालून सगळंकाही आलबेल दाखवणारे जेव्हा ह्या चार भिंतीच्या अडोश्यासाठी काहीही करायला तयार होतात. पण ह्या सगळ्यात ज्याच्या ह्या चार भिंती असतात. त्याला ह्या चार भिंती लोकांना देताना कोणत्या परिस्थितीला सामोर जावं लागत हे बघण म्हणजे “द अपार्टमेंट”. नोकरीच्या ठिकाणी बढतीसाठी कसं आमिष देऊन वापरल जातं हे त्या काळी दाखवणारा हा चित्रपट काळाच्या पुढला होता हे नक्की. १९६० चं दशक आणि त्याकाळी अमेरिकेतल्या नोकारदार आणि एकूणच ऑफिस कल्चर दाखवणारा हा चित्रपट हसवता, हसवता सहजच माणसाच्या स्वभावाचे अनेक नमुने समोर आणतो. आपण क्षणभर असाच विचार करतो की हेच तर माझ्या ऑफिस मध्ये होते. अशाच पॉलीटिक्स चा मी एक बळी आहे. आपल्या पोटासाठी दरवेळी आपल्या बॉस पुढे मान झुकवणाऱ्या, प्रत्येक नोकरी करणाऱ्या माणसाचं ऑफिस कल्चर बघण म्हणजे कुठेतरी आपल्याला आलेले अनुभव त्यात बघणं!!

The Apartment
The Apartment

१० ऑस्कर नॉमिनेशन त्यात ५ ऑस्कर बेस्ट पिक्चर, बेस्ट डायरेक्टर, बेस्ट रायटिंग असे सगळ्यात महत्वाचे पुरस्कार १९६० ला ३३ व्या ऑस्कर सोहळ्यात मिळवणारा हा चित्रपट पुन्हा एकदा आपल्याला विचारात पाडतो हे नक्की. कृष्णधवल चित्रपट बघण्याची एक वेगळीच मज्जा असते. आज बघताना हे चित्रपट जुने वाटले तरी त्याच्यात कलाकारांची अदाकारी हि वेगळ्याच धर्तीवर सादर केलेली असते. म्हणूनच हे चित्रपट आपल्या आयुष्याशी आपण जास्त जुळवू शकतो. ते संपल्यावर पण आपल्यावर त्यांचा इफेक्ट ठेवून जातात. जॅक लेमोन, शिर्ले मॅक्लीन आणि फ्रेड मॅकमुरी ह्यांच्या अभिनयाने नटलेला चुकवू नये असा चित्रपट “द अपार्टमेंट”.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय