Who Killed दाभोळकर??……

पुरोगामी चळवळीचे आधारवड आणि महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलनाचे अग्रणी Dr. Narendra Dabholkar यांची हत्या होऊन सोमवार २० ऑगस्ट रोजी बरोबर ५ वर्ष पूर्ण होत आहेत. अंधश्रद्धा दूर करून विवेकवादी समाजाच्या निर्मितीसाठी झटणाऱ्या या समाजसुधाराकाचा सुसंस्कृत आणि कधीकाळी सामाजिक चळवळीचे केंद्रबिंदू राहिलेल्या पुण्यात निर्घृण खून करण्यात आला.. प्रबोधनाच्या परंपरेवर विश्वास ठेवून विचारांची लढाई विचाराने लढणाऱ्या या कार्यकर्त्यांचा विचार बंदुकीच्या गोळीने संपविण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला होता. परंतु, हत्येने व्यक्तीचे विचार संपत नसतात. उलट ते विचार अजून प्रखर बनतात याची प्रचीती महत्मा गांधीं पासून ते दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येनंतर हि आली आहे. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर ज्या कायद्यासाठी दाभोळकरांनी जीवाचे रान केले तो ‘अंधश्रद्धा निर्मूलन कायदा’ राज्य सरकारने मंजूर केला.

अंधश्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या अनेकांना या कायद्यामुळे जरब बसला आहे. अंधश्रद्धामुक्त समाजाचे जे स्वप्न डॉ. दाभोळकारांनी पाहिले होते, त्या दिशेने आज समाजाची वाटचाल सुरु असल्याचे बोलले जात आहे. परंतु पुरोगामी महाराष्ट्रात डॉ. दाभोळकर यांच्यासारख्या विचारवंताला भरदिवसा गोळ्या घालून ठार करण्यात येते, आणि 5 वर्ष होतात तरी त्यांच्या मारेकऱ्यांचा आणि त्यामागील सूत्रधारांचा शोध लागत नाही, ही बाबा पुरोगामी सम्बोधल्या जाणाऱ्या महाराष्ट्रासाठी लांच्छनास्पदच म्हणावी लागेल. डॉ दाभोळकरानंतर कम्युनिस्ट नेते गोविंदराव पानसरे यांची कोल्हापुरात तर डॉ. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांची कर्नाटकात त्याच पद्दतीने हत्या करण्यात आली. यापैकी,पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटकच्या विशेष तपास पथकाने मुख्य आरोपी परशुराम वाघमारेला महाराष्ट्रातून अटक केली असून इतरही आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत. अवघ्या नऊ महिन्यात कर्नाटक पोलिसांनी लंकेश प्रकरणाचा छडा लावत आरोपींना महाराष्ट्रातून बेड्या ठोकल्या. मग,महाराष्टातच घडलेल्या डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येतील आरोपींच्या हातात बेड्या का ठोकल्या जात नाहीत? याचा ‘जवाब’ तपास यंत्रणांनी तद्वतच सरकारने दिला पाहिजे.

२० ऑगस्ट २०१३ रोजी पुरोगामी चळवळीचे आधारवड Dr. Narendra Dabholkar यांची पुण्यात निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येच्या पहिल्या दिवसापासून पोलीस प्रशासन तपासाला लागल्याचे वरकरणी दिसले, परंतु पोलिसी तपासाची ढिसाळ कार्यपद्धती पदोपदी समोर येत राहिली. सुरवातीचा काही काळ प्राथमिक तपासात गेला. दाभोलकरांच्या खुनाचा छडा लावण्यासाठी ‘प्लँचेट’ चा वापर करण्यात आल्याचा आरोपही या काळात झाला. २०१४ मध्ये मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल या दोघांवर डॉ. दाभोळकर यांच्या हत्येसाठी पिस्तूल पुरवल्याचा आरोप करण्यात आला. मात्र न्यायालयात नागोरीने एटीएसवर गुन्हा काबुल करण्यासाठी २५ लाखाची ऑफर दिल्याचा आरोप केला. ९ मे २०१४ ला दाभोळकर प्रकरणाचा तपास सीबीआय कडे सोपविण्यात आला. तीन वर्षानंतर म्हणजे १० जून २०१६ ला सनातन संस्थेच्या वीरेंद्र तावडे याला सीबीआयने ताब्यात घेतेले. फरार असलेले विनय पवार आणि सारंग अकोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचा आरोप ठेवत तावडेला मुख्य आरोपी करून ७ सप्टेंबर २०१६ ला सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्याचेही अजून काहीच झालेले नाही. लंडन वरून येणाऱ्या बॅलेस्टिक अहवालाचा घोळ अनेक दिवस चालला. निव्वळ तारखमागून तारखा वाढवून घेण्याचा प्रकार सुरु असून डॉ. दाभोळकरणांचे मारेकरी कोण, त्यामागील सूत्रधार, याचा कोणताच थांगपत्ता अजून लागलेला नाही.

Dr. Narendra Dabholkar हत्या प्रकरणाचा तपास रेंगाळत असतानाच त्याच पद्दतीने कोल्हापुरात कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांची हत्या करण्यात आली. पुरोगामी महाराष्ट्रावर दुसरा आघात झाला. याही प्रकरणाच्या तपासात अक्षम्य दिरंगाई झाली. सुरवातीला कोल्हापूर एटीएस आणि नंतर सीबीआयकडे तपास वर्ग करण्यात आला. दाभोळकर प्रकरणातील आरोपींशी पानसरे हत्याप्रकरणाचे धागे दोरे आढळले. समीर गायकवाडला हत्येच्या ८ महिन्यानंतर अटक झाली. बॅलिस्टिक अहवाल अगोदर स्कॉटलंड यार्ड कडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले, नंतर त्याला परवानगीच नसल्याचे समोर आले. मुंबई आणि गुजरातच्या लॅबमधून बॅलेस्टिक अहवाल मागविण्यात आला. मात्र त्यात पराकोटीची विसंगती आढळून आली. तपास संस्थांच्या गडबडीमुळे समीर गाकवाडला अखेर न्यायालयाने जामीन मंजूर केला. पोलिसांचे आरोपपत्र सीबीआयने रद्द ठरविले आणि आपले आरोपपत्र दाखल केलं परंतु त्याच्यातही समोर काहीच झालं नाही. दाभोळकर आणि पानसरे प्रकरणातील साम्य पाहता दोन्ही प्रकरणाचा संयुक्तिक तपास करण्याचाही प्रयत्न झाला, पण आउटपुट शून्य..!

वाचण्यासारखे आणखी काही….

अटल’ युगाची समाप्ती!
स्वतंत्र दिन विशेष….


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय