मोनालीजाच्या चित्रामागची हि रहस्ये माहित आहेत का तुम्हाला?

जगातल्या वेगवेगळ्या चित्रांबद्दल विषय निघाला, तर सर्वांना माहीत असणारं म्हणजे “लिओनार्डो डा विन्सी” ने काढलेलं ‘मोनालिजाचं’ चित्र. या चित्रमागची रहस्ये, ते चित्र इतकं प्रसिद्ध का आणि केव्हापासून झालं, शिवाय चक्क एका देशाने आपलं कर्ज फेडण्यासाठी मदत व्हावी म्हणून हे विकण्याचा प्रयत्न केला… या एका चित्रमागची हि रोचक कथा वाचा या लेखात.

जगातील सर्वात सुंदर चित्र – मोनालीजा

जगातील सर्वात सुंदर चित्र कोणतं असा प्रश्न कोणालाही विचारला तरी एका चित्रापाशी उत्तर येऊन थांबते आणि ते म्हणजे “मोनालीजा”. “लिओनार्डो डा विन्सी” ने काढलेलं हे चित्र आजही ५०० वर्षानंतर जगभरात कुतूहलाचा विषय आहे. साधारण १५०३ ते १५०६ च्या दशकात बनवलं गेलेलं पोट्रेट पद्धतीचं चित्र ७७ X ५३ से.मी.

आकाराचं असून ऑइल ऑन वूड पद्धतीने चित्रित करण्यात आलं आहे. ह्या चित्रात जिचं चित्र चित्रित करण्यात आलं आहे त्या स्त्री च नावं लीजा घेरादिर्नी असं मानण्यात येतं. लीजा फ्रान्सिस्को डेल जिओकोंडो ह्याची बायको होती.

हे चित्र चित्रित करताना मोनालीजा गर्भवती असल्याचं अनेक संशोधनातून सिद्ध झालं आहे. ज्या वर्षी हे चित्र साकारलं गेलं त्याच वर्षी लीजा ने एका गोंडस अपत्याला जन्म दिला होता. इटली मध्ये आदरयुक्त भाव स्त्री ला देताना “मोना” असं म्हंटल जाते. (जसे इंग्रजी मध्ये म्याडम म्हणतात.)

मोनालीजा चं चित्र आजही न उलगडलेलं कोडं आहे. हे चित्र काढताना लिओनार्डो ने काळाच्या पुढचा विचार केला होता. मोनालीजा च्या मागे जो निसर्ग चित्रित झाला आहे. ते चित्रित करणं काळाच्या पुढचं होतं.

विमानाचा शोध तेव्हा लागला नसताना हवेतून डोंगर, नदी किंवा एकूणच निसर्ग कसा दिसत असेल ह्याचा विचार मनात करून ते रंगानी साकारणं हे अदभूत होतं.

मोनालीजा चा चेहरा आणि मागील निसर्ग ह्याचा तुलनात्मक विचार केला तर तिच्या चेहऱ्यामागे बर्फाने झाकलेले डोंगर दाखवताना त्या खाली एका बाजूला नदीचा प्रवाह आणि एक छोटा पूल मानवी अस्तित्वाचं दर्शन त्या चित्रात अतिशय प्रभावीपणे दाखवून देतो.

मोनालीजा चे डोळे आणि क्षितिजाची रेषा एकाच पातळीवर ठेवताना मोनालीजा चा चेहरा पाठीमागच्या निसर्गात मिसळून जाण्याची किमया साधली आहे. मोनालीजा चा डौलदार चेहरा, चेहऱ्यावर असलेले गूढ भाव दाखवताना पण ती तितकीच शांत वाटते हे लिओनार्डो च्या अदाकारीचं यश आहे.

मोनालीजा च्या हाताची ठेवण पण बघण्यासारखी आहे. उजवा हात डाव्या हातावर ठेवताना बोटांची रचना अतिशय उत्कृष्ठ आहे तसेच हाताच्या रंगाचा साधलेला मेळ तो हात खरा असल्याचं क्षणभर आपल्याला बघताना भासवत रहातो इतका सुंदर चित्रित केला गेला आहे.

अंगावर असलेल्या वस्त्रांची रचना ते त्यावर पडलेल्या सुरकुत्या दाखवताना खूप बारकाईने त्याचा अभ्यास केला गेला आहे. केसांच्या बटा दाखवताना मोनालीजा आपल्यासमोर त्याने आपल्या कुंचल्याने उभी केली आहे. पण ह्या चित्राचं वेगळेपण आणि रहस्य ज्यात आहे त्या गोष्टी मोनालीजा ला इतर चित्रांपासून एक वेगळी उंची देतात.

मोनालीजा ला डोळ्यांच्या वर भुवया आणि पापण्यांना केस दाखवलेले नाहीत. काही संशोधकांच्या मते त्या काळी अशी फॅशन असावी की स्त्रियांनी भुवया आणि पापणीचे केस ठेवण त्यांच्या सौंदर्याला बाधा आणत असावं म्हणून त्या काढल्या जात असाव्यात.

२००७ साली फ्रांस च्या पास्कल कोटे नावाच्या एका अभियंत्याने केलेल्या अल्ट्रा हाय रिझोल्यूशन स्कॅन मध्ये मोनालीजा ला आधी भुवया आणि पापण्यांना केस होते असं समोर आलं. काळाच्या ओघात रंग उडून गेल्याने अथवा त्यावर पुन्हा रंग दिल्याने मोनालीजा ला आजचा चेहरा प्राप्त झाला अस संशोधनात समोर आलं आहे.

मोनालीजा ओळखली जाते ते तिच्या गूढ हास्यासाठी. मोनालीजा हास्य म्हणून आजही आपण अनेक ठिकाणी हा शब्द प्रयोग करतो कारण मोनालीजा चं हास्य आजही गूढ आहे.

डोळ्याकडे बघताना ती आनंदात वाटते तर जेव्हा आपल लक्ष ओठांकडे जाते तेव्हा ते वेगळ जाणवते. मोनालीजा ला बघताना अनेकांना तिच्या चेहऱ्याकडे बघून वेगवेगळे भास होतात व हेच मोनालीजा ला अभिजात चित्रकलेचा एक सर्वोत्तम आविष्काराचा दर्जा देतात.

Dutch researchers from the University of Amsterdam ran the painting’s image through “emotion recognition” computer software developed in collaboration with the University of Illinois at Urbana-Champaign. The technology demonstration found the smile to be 83% happy, 9% disgusted, 6% fearful, 2% angry, less than 1% neutral, and 0% surprised.

जिकडे कॉम्प्यूटरही मोनालिसा च्या हास्याचे निश्चित असे ठोकताळे बांधू शकत नाही ह्यावरून चित्रात असलेली गूढता आपल्याला लक्षात येते. असंही म्हंटल जाते की लिओनार्डो ने आपलंच रूप ह्या चित्रात चित्रित केलं आहे.

लिओनार्डो समलैंगिक असावा व त्याने आपल स्त्री रूप चितारल असावं ह्याला दुजोरा देताना असं सांगतात की मोनालीजा आणि लिओनार्डो च्या चेहऱ्यात कमालीचं साम्य आहे.

केस आणि दाढी काढल्यावर मोनालीजा आणि लिओनार्डो चा चेहरा एकमेकांशी तंतोतंत जुळतात. ह्या सर्व रहस्यांमुळे मोनालीजा च्या चित्रा भोवतीच गूढ वलय अजूनच गडद झालं आहे.

मोनालीजाचं चित्र २१ ऑगस्ट १९११ ला फ्रांस मधल्या लुवरे इथल्या संग्रहालयातून चोरीला गेलं. ही चोरी करण्यामागे तत्कालीन चित्रकार पाब्लो पिकासो असावा असा कयास बांधला गेला.

चौकशीसाठीही पाब्लो पिकासो ला बोलवण्यात आलं. पण दोन वर्षानंतर ही चोरी विन्सेन्झो पेरीगिगा ह्याने केली असल्याचं उघड झालं. हा विन्सेन्झो लुवरे इथल्या संग्रहालयात कामाला होता.

पैसे मिळवण्यासाठी आपल्या कोटाच्या आत लपवून त्याने हे चित्र आपल्या घरात लपवून ठेवलं. दोन वर्षांनी हे चित्र विकायला काढलं असताना त्याला पकडण्यात आलं.

हे चित्र इटलीचं असून इटली मध्ये राहवं ह्यासाठी आपण त्याची चोरी केली असं विन्सेन्झो ने सांगितलं. पण ह्या काळात त्याच्या ६ कॉपी अमेरिकेत विकण्यासाठी बनवल्या गेल्या ह्यामागे एडूआर्डो वाल्फिरीनो ने आपल्या सहकाऱ्या मार्फत विन्सेन्झो ला चोरी करण्यासाठी प्रवृत्त केलं असं सांगण्यात येतं.

ह्या चोरी पर्यंत मोनालीजा जगभरात इतक प्रसिद्ध नव्हत. पण ह्या चोरी नंतर मोनालीजा ला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. जरी ह्याच्या ६ प्रती अमेरिकेत गेल्या तरी मूळ चित्र युरोपात राहिलं.

४ जानेवारी १९१४ ला मूळ चित्र पुन्हा लुवरे इथल्या संग्रहालयात विराजमान झालं. पण ह्या चित्राचे जितके चाहते होते तितकेच दुश्मन ही होते.

१९५६ ला ह्या चित्रावर एका माथेफिरू ने एसिड फेकलं. ज्यात ह्या चित्राचं थोड नुकसान झालं. १९७४ च्या टोकियो प्रदर्शनात हे चित्र लोकांसाठी खुलं असताना एका महिलेने त्यावर लाल रंग उडवला. पण बुलेट प्रुफ काचेत असल्याने चित्राला काही इजा नाही झाली.

२००९ साली एका रशियन महिलेने ह्या चित्रावर चहाचा कप फेकला. पण बुलेट प्रुफ काचेमुळे चित्राला कोणतीही इजा नाही झाली.

ह्या सगळ्या घटनांमुळे ह्या चित्राची सुरक्षितता हा महत्वाचा प्रश्न बनला. मोनालीजा हे चित्र ५०० वर्षाहून अधिक जुनं आहे. ह्याचे रंग खराब होऊ नये म्हणून त्याला अतिशय योग्य तपमानात ठेवण्यात आलेलं आहे.

तसेच त्याला कोणतीही इजा होऊ नये म्हणून बुलेट प्रुफ काचेत ठेवण्यात आलेलं आहे. चित्रावर पडणाऱ्या प्रकाशाने रंग बदलू नयेत म्हणून खास करून २० व्हॅट क्षमतेचे एल.ई.डी. लाईट बसवण्यात आले असून ह्याचा कलर रेंडरींग इंडेक्स ९८ असून ह्यामुळे इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हॉयलेट रेडियेशन पासून चित्राच्या रंगाच संरक्षण होते.

ह्याच्या पूर्ण संवर्धनाची जबाबदारी जपान च्या निप्पोन टेलिव्हिजन कडे आहे. दरवर्षी सुमारे ९ मिलियन ( ९० लाख लोक ) हे चित्र बघतात.

१९६२-६३ ला ह्या चित्राचा १०० मिलियन यु.एस. डॉलर चा विमा काढण्यासाठी मागितले गेले. पण हा विमा घेतला गेला नाही कारण त्यापेक्षा जास्ती खर्च त्याच्या सुरक्षेवर होत होता.

आज ह्या चित्राची किंमत करावयाची झाल्यास ती जवळपास ८०० मिलियन यु.एस. डॉलर च्या घरात जाते. अर्थात ह्या चित्राची किंमत होऊ शकत नाही हा भाग वेगळा.

२०१४ साली फ्रांस २४ ह्या एका वाहिनीने देशाच कर्ज चुकवण्यासाठी मोनालीजा ला विकण्याची कल्पना मांडली होती. पण फ्रांस च्या कायद्याप्रमाणे एखाद्या संग्रहालयात ठेवलेली गोष्ट ही राष्ट्रातील सर्व लोकांच्या मालकीची असून त्याची विक्री होऊ शकत नाही अस त्यांना सांगण्यात आलं.

मोनालीजा त्यावेळी पण अदभूत होती आणि मोनालीजा आजही तितकीच अदभूत आहे. मोनालीजा ५०० वर्षापूर्वी गूढ आणि रहस्य होती आणि आजही ती तितकीच गूढ आणि रहस्य आहे.

मोनालीजा एक चित्र नाही तर एक दंतकथा आहे. रंगांचा आविष्कार इतके वर्ष जगातील करोडो लोकांना आजही विचार करायला लावू शकतो ह्यातच मोनालीजा च यश आणि प्रसिद्धी दडलेली आहे.

तिच्या मागे असणारा इतिहास आणि तिची झालेली चोरी ह्या चित्राला अजून वलय प्राप्त करून देत आहे. पण तरीही मोनालीजा च हास्य? ते ती कोण होती? तिच्या नसलेल्या भुवया ह्यावर अजूनही संशोधन सुरु आहे.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय