The Real Hero- लेफ्टनंट नवदीप सिंग

असं म्हणतातं की रक्ताचे काही गुण आपल्याला पूर्वजांकडून मिळतात. जसे आजार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात तसेच काही गुण उपजतच आपल्याला एक, दोन, तीन पिढ्यांकडून मिळत असतात. लेफ्टनंट नवदीप सिंग ही ह्याला अपवाद नव्हता. गुरुदासपूर, पंजाब येथे जन्म झालेल्या Lieutenant Navdeep Singh च्या घरची पार्श्वभुमी भारतीय सेनेची होती. गेले दोन पिढ्या त्याच्या कुटुंबाने देशसेवा केली होती. लेफ्टनंट नवदीप सिंग चे आजोबा ज्युनिअर कमिशन ऑफिसर होते तर वडील सुभेदार मेजर जोगिंदर सिंग ऑनररी कॅप्टन म्हणून निवृत्त झाले होते. तब्बल ३० वर्ष त्यांनी भारतीय सेनेत राहून देशसेवा केली होती. तब्बल दोन पिढ्यांचा वारसा लाभलेल्या लेफ्टनंट नवदीप सिंग च्या रक्तात ही देशप्रेम ओतप्रोत भरलेलं होतं.

आपलं पदवी शिक्षण लेफ्टनंट नवदीप सिंग ह्याने हॉटेल मॅनेजमेंट मध्ये पूर्ण केलं. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण आर्मी इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट मधून पूर्ण केल्यावर पुढे कॉर्पोरेट क्षेत्रातील मोठ्या पगाराच्या संधी अगदी वयाच्या विशी मध्ये असलेल्या नवदीप सिंग ला खुणावत होत्या. पण म्हणतात न आतलं रक्त स्वस्थ बसून देत नव्हतं. देशसाठी काहीतरी केलं पाहिजे असं मन त्याला सांगत होतं. आपल्या घराण्याची परंपरा पुढे नेण्याचा निर्णय त्या वयात Navdeep Singh ने घेतला व सरळ ऑफिसर ट्रेनिंग ऍकॅडमी चेन्नई येथे प्रवेश घेतला. २०१० साली आर्मी ऑर्डनन्स कॉर्प मध्ये त्याला पाठवण्यात आलं. आर्मी ऑर्डनन्स कॉर्प हे भारतीय सेनेला रसद पुरवण्यासाठी शांती आणि युद्धात मदत करत असते. लेफ्टनंट नवदीप सिंग ची पहिली पोस्टिंग १५ मराठा लाईट इंफ्रांटरी मध्ये झाली.

२०११ मध्ये लेफ्टनंट नवदीप सिंग ह्याचं युनिट नॉर्थ काश्मीर च्या गुरेज सेक्टरमध्ये पाठवण्यात आलं. वयाच्या अवघ्या २६ वर्षी जेव्हा प्रेमात पडण्याची स्वप्न सगळे बघत असतात तेव्हा Lieutenant Navdeep Singh ह्याला घातक प्लाटूनच्या कमांडर ची जबाबदारी देण्यात आली. घातक ह्याचा अर्थ होतो किलर आणि शत्रूचा खात्मा करण्यास कोणत्याही वेळी सक्षम असलेली प्लाटून भारतीय आर्मीचा हा एक महत्वाचा भाग आहे. ह्यात निवड झालेले सैनिक हे कोणत्याही प्रकारच्या परिस्थतीशी सामना करण्यास सक्षम असतात. प्रसंगी जीवाची बाजी लावण्यास एकदाही किंतु मनात न आणणारे असे जिगरबाज सैनिक ह्यात असतात. अश्या शूरवीर सैनिकांचं नेतृत्व लेफ्टनंट नवदीप सिंग करत होता.

१९ ऑगस्ट २०११ लेफ्टनंट नवदीप सिंग ह्यांच्या युनिट ला १७ आतंकवाद्यांनी भारताच्या हद्दीत प्रवेश केल्याची बातमी मिळाली. हे आतंकवादी सैनिकांप्रमाणे पाकव्याप्त काश्मीर मधून प्रशिक्षण घेऊन भारताच्या हद्दीत घुसले होते. अतिशय प्रशिक्षित आणि अद्यावत हत्यार असणारे हे अतिरेकी भारताच्या समोर एक आव्हान होतं. लेफ्टनंट नवदीप सिंग च्या युनिट ला ह्या आतंकवाद्यांना रोखण्याची तसेच त्यांचा खात्मा करण्याची जबाबदारी देण्यात आली. एक कठीण लक्ष्य समोर होतं मातृभुमिच्या रक्षणाची जबाबदारी २६ वर्षाच्या एका तरुणाने आपल्या खांद्यावर घेतली.Lieutenant Navdeep Singh ह्यांनी अतिरेक्यांच्या रस्त्याचा पूर्ण अभ्यास केला. त्यावरून ते कुठे येणार ह्याच प्लानिंग केलं व त्या प्रमाणे आपल्या घातक प्लाटून च्या कमांडो ना योग्य ठिकाणी डिप्लोय केलं.

Lieutenant Navdeep Singh

लीडर लीड फ्रॉम द फ्रंट ह्या उक्तीचा सार्थ अभिमान लेफ्टनंट नवदीप सिंग ह्याला होता. दबा धरून बसलेल्या ठिकाणी अतिरेकी येताच लेफ्टनंट नवदीप सिंग सगळ्यात पुढे अतिरेक्यांवर तुटून पडला. अनपेक्षित हल्ल्याने अतिरेकी बिथरले तोवर त्यांच्यातील तिघांचा लेफ्टनंट नवदीप सिंग ह्यांच्या गोळ्यांनी खात्मा केला होता. धुमश्चक्री दोन्ही बाजूने चालू झाली. गोळ्यांचे आवाज आसमंतात बरसू लागले. लेफ्टनंट नवदीप सिंग ह्यांच्या लपलेल्या जागेचा अतिरेक्यांना सुगावा लागला. अतिशय चालाखीने आपली जागा बदलताना एका गोळीने त्याच्या डोक्याचा वेध घेतला. डोक्याला लागलेली गोळी आणि त्यातून वहात असलेलं रक्त अश्या बिकट परिस्थितीत ही लेफ्टनंट नवदीप सिंग ह्यांने ४ थ्या अतिरेक्याचा खात्मा केला. डोक्यातून रक्त वहात असताना देखील आपल्या जखमेची पर्वा न करता त्याला आपल्या टीम मधला एक सैनिक घायाळ स्थितीत पडलेला दिसला. त्याला सुरक्षित जागी आणलं नाही तर आपल्या टीम च्या सदस्याचा जीव जाणार हे त्याला कळून चुकलं. आपल्या डोक्यातून वाहणाऱ्या रक्ताची पर्वा न करता गोळ्यांच्या धुमश्चक्री मध्ये लेफ्टनंट नवदीप सिंग ह्याने मागचा पुढचा विचार न करता त्या जखमी सैनिकाला वाचवण्यासाठी त्या गोळ्यांच्या वर्षावात उडी घेतली. त्यातून आपल्या साथीदाराला मदत करत त्यांनी त्याला सुरक्षित स्थळी आणलं. पण हे सर्व करत असताना त्याच्या डोक्यात लागलेल्या गोळीमुळे प्रचंड रक्त वाहून गेलं होतं. शरीरातील रक्त संपत आलं पण लेफ्टनंट नवदीप सिंग ह्यांची बंदूक सुरूच होती. अखेर प्रचंड रक्तस्त्रावाने Lieutenant Navdeep Singhबेशुद्ध पडला व त्यातच भारताने एका शूरवीर पराक्रमी सैनिकाला गमावलं. लेफ्टनंट नवदीप सिंग ह्याच्या अतुलनीय शौर्याबद्दल त्याला शांती काळात देण्यात येणारा सर्वोच्च अश्या अशोकचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

ह्या सामन्यात १२ अतिरेकी मारले गेले. ज्यात ४ अतिरेक्यांचा खात्मा Lieutenant Navdeep Singh ह्याने एकट्याने केला होता. डोक्याला गोळी लागलेली असताना आणि रक्त भळाभळा वाहत असताना आपल्या साथीदाराचा जीव वाचवण्यासाठी गोळ्यांच्या वर्षावात उडी घेणारा Lieutenant Navdeep Singh आपल्याला माहित नाही हाच आपला करंटेपणा. बरोबर ७ वर्षापूर्वी ह्याच दिवशी ह्या पराक्रमी सैनिकाने देशासाठी वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी आपला जीव गमावला. अरे कुठून येते हे देशप्रेम? आम्ही ह्या वयात मुलींच्या मागे जातो. आमची जात, आमचा धर्म आमच्यासाठी प्रिय असतो. कोणीतरी येते आमच्या भावनांना साद घालते मग काय आम्ही देशप्रेम दाखवतो ते तोडफोड करून, कधीतरी एकमेकांना मारून आणि कधीतरी आपण कोणत्यातरी जातीचा असल्याचा माज करून. देश? कोणता देश? आणि त्याच्यावरच प्रेम आम्हाला खरच माहिती आहे का? माझ्यापलीकडे वयाच्या २६ वर्षी विचार करायला तरी वेळ असतो का? मला बाईक हवी असते, कार हवी असते, पब मध्ये जायचं असते. देशप्रेम वगरे बघू नंतर असे विचार असणाऱ्या तरुणांच्या गर्दीत लेफ्टनंट नवदीप सिंग च बलिदान कुठे आठवणार.

आमचे हिरोज वेगळे. आम्हाला “यो” करणारे छाती उघडी ठेवून आणि फाटलेली जीन्स घालून एका फटक्यात २० फुट गुंडांना खोट खोट मारणारे आवडतात. अगदीच नाही तर हात आडवे करून अभिनेत्रीला आपल्या बाहुपाशात घेणारे हेच तर आमचे हिरो. आदर्श तर विचारूच नका कारण त्यात अशी काही नाव आहेत की ज्यांचा विचार केला तरी मनात कसतरी होते. पण आम्ही ह्या देशाचे नागरिक आहोत. अश्या एका देशाचे नागरिक की जिकडे वयाच्या २६ वर्षी आपल्या प्राणांची आहुती देणारा Lieutenant Navdeep Singh आम्हाला माहित ही नसतो आणि स्वतःच्या घरात शस्त्र लपवून देशविरोधी कारवायांना हातभार लावणाऱ्या व्यक्तीच्या चारित्र्यावर निघणाऱ्या चित्रपटाचा आनंद आम्ही एक मनोरंजन म्हणून बघत त्याला कोट्यावधी रुपये कमावून देतो.

कोणी काय बघावं किंवा कोणी काय आदर्श ठेवावेत हा नक्कीच ज्याचा त्याचा प्रश्न. पण निदान ज्याने काडीचही योगदान तुमच्या देशासाठी दिल नाही ती व्यक्ती जर तुमचा आदर्श आणि हिरो असू शकते तर रक्त वहात असताना डोक्याला गोळी लागलेली असताना सुद्धा आपला जीव धोक्यात घालून फक्त आपल्या साथीदाराला वाचवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा Lieutenant Navdeep Singh विस्मरणात कसा जातो? किंबहुना आधी आम्हाला तो कोण हेच माहित नसते. त्यामुळे प्रश्न हा आहे की नक्की आपल्याला देश आणि देशप्रेम कळल आहे का? हिरोज आपल्याला कळले आहेत का? कळले असतील तर निदान त्यांच्या कर्तुत्वाचा एक तरी अंश आपण आपल्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे का?

Lieutenant Navdeep Singh च्या बलिदानाला आज ७ वर्ष होतं आहेत. त्याचं हे बलिदान निदान मी तरी वाया जाऊ देणार नाही. वयाच्या अवघ्या २६ वर्षी आपल्या मातृभूमीच रक्षण करताना धारातीर्थी पडलेल्या ह्या वीर, शूरवीर सैनिकास माझा कडक सॅल्युट.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय