देवभूमीतील महाप्रलयाचा इशारा..! (केरळचा महापूर)

देशातील सर्वात साक्षर राज्य आणि देवभूमी अशी ओळख असलेले केरळ राज्य सध्या शतकातील भीषण अशा पूरस्थितीचा सामना करत आहे. गेल्या काही दिवसांपासून केरळात सततधार आणि मुसळधार पावसाची बरसात सुरु असल्याने संपूर्ण केरळ राज्य पाण्याखाली गेले. शंभर वर्षातील सर्वाधिक पाऊस केरळमध्ये झाल्याचे सांगण्यात येते. अतिवृष्टीमुळे केरळमधील ४१ नद्यांना महापूर आला. राज्यातील जवळपास ८० धरणे तुडुंब भरली. धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने संपूर्ण राज्य पाण्याखाली गेले. या प्रलयाने साडेतीनशेहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. सुमारे ५० जण बेपत्ता सांगितले जात आहेत. तीन लाखांवर लोक बेघर झाले आहेत. राज्याचे १२ पैकी ११ जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. महापुराच्या तडाख्याने केरळसारख्या छोटय़ा बेटांच्या राज्याची किती भयंकर अवस्था झाली असेल याची त्यामुळे कल्पना येऊ शकेल. लष्कर, नौदल, हवाई दल, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जीव धोक्यात घालून कार्यरत आहेत. संपूर्ण देशातून केरळच्या मदतीसाठी हजारो-लाखो हात पुढे येत आहेत. सध्या पावसाने थोडी उसंत घेतल्याने महापूर ओसरू लागलेल्या केरळमध्ये आता लोकांचा जगण्याचा भयंकर संघर्ष सुरू झाला आहे. लाखो लोकांची घरे कोसळली, दुकाने, गोडाऊनमधील धान्यसाठा संपला, घरात घेतलेल्या वस्तू वाहून गेल्या, साठवलेली पुंजी गेली, आता जगायचे कसे, असा प्रश्न जनतेपुढे पडला आहे. या अनपेक्षित धक्क्यातून सावरण्यासाठी केरळला अजून काही महिने लागतील. केरळमधील महाप्रलय हा जितका भयंकर तितकाच तो माणसाला गंभीर इशारा देणारा ही आहे. निसर्गाचा आणि पर्यावरणाचा समतोल राखला गेला नाही, तर निसर्ग एका क्षणात ‘होत्याचे नव्हते’ करू शकतो, याकडे निसर्गानेच यानिमित्ताने लक्ष वेधले असेच म्हणावे लागेल.

अतिवृष्टी, पूर या नैसर्गिक आपत्ती आहेत. त्या कोणी टाळू शकत नाही. मात्र, अशा आपत्तीच्या काळात ज्या प्रकारचे नुकसान होते ते प्रामुख्याने मानवनिर्मित असल्याचे वास्तव समोर येत असून हा अत्यंत गंभीर प्रकार मानला पाहिजे. केरळमध्ये आलेल्या महाप्रलायामागे निसर्गाचा असमतोल हे प्रमुख कारण असल्याचे निसर्ग तज्ञ सांगतात. मोठ्या प्रमाणात झालेली जंगलतोड, अतिक्रमणामुळे नष्ट होत असलेल्या पाणथळ जागा, नद्यांच्या जलमार्गातले अडथळे, अतिक्रमणे व प्रदूषण यामुळे भूस्खलन होण्याच्या घटना घडतात. व त्यामुळे मोठे नुकसान होते. त्यामुळे या बाबींकडे गंभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे.

केरळ जलस्रोतांच्या व्यवस्थापनात पिछाडीवर असल्याचा अहवाल काही महिन्यांपूर्वीच केंद्राने दिला होता. त्याचा प्रत्यय या महापुराच्या निमित्ताने आला आहे. शतकात पडलेला सर्वाधिक पाऊस, आणि त्यामुळे तुडुंब भरलेल्या नद्या आणि धरणे याचा फटका केरळला मोठ्या प्रमाणावर बसला. जलस्त्रोताचे व्यवस्थित पूर्वनियोजन केले गेले असते तर कदाचित केरळमधील महापूराची तीव्रता थोडीशी कमी करता आली असती. मात्र अशी एखादी घटना घडली की, पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाच्या गप्पा निघतात. नैसर्गिक आपत्ती रोखण्यासाठीच्या उपायांवर चर्चा झडतात. परंतु प्रत्यक्षात अमलबजावणीच्या बाबतीत मात्र सगळीकडे उदासीनताच दिसून येते. पाच वर्षांपूर्वी उत्तराखंडमध्ये ढगफुटी व महापुरामुळे हाहाकार उडाला होता. महाराष्ट्रात ‘माळीण’सारखे अख्खे गाव भूस्खलनामध्ये ‘गडप’ झाले होते. जम्मू कश्मीर मध्येही महापुरामुळे मोठे नुकसान झाले होते. आणि, आता केरळ दहा ते बारा दिवस पाण्याखाली केल्याची घटना घडली. या सर्व घटना निसर्गाच्या पूर्व सूचना आहेत. विकासाच्या नावाखाली माणूस निसर्गाची जी अपरिमित हानी करतोय, त्याचे हे परिणाम आहेत. त्यामुळे निसर्गाचा हा गंभीर इशारा आपण लक्षात घेतला पाहीजे.

राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणने पाऊस आणि पुरामुळे होणाऱ्या नुकसानीची सरासरी आकडेवारी जाहीर केली आहे. ते जर प्रमाण मानले तर पुढील १० वर्षात पुरामुळे देशभर १६ हजार लोक मृत्यूमुखी पडतील तर ४७ हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हा अंदाज खरा मानला तर आपण कुठल्या वाटेवर उभे आहोत, याचा अंदाज येऊ शकेल. दरवर्षी भारतात कुठे ना कुठे महापुरासारख्या नैसर्गिक आपत्तीत हजार लोकांचे बळी जातात. हजारो कोटींची मालमत्ता नष्ट होते. पण या आपत्ती रोखण्यासाठी गांभीर्याने उपायोजना केल्या जात नाही. संकटाच्या काळात अशा बाबतीत कारवाईच्या वल्गना जरूर होतात; पण या संदर्भातले इशारे ‘बोलाची कढी…‘ असे ठरतात. पूर ओसरला, की इशारेही ओसरतात आणि कारवाईचा तर प्रश्‍नच नाही. पुन्हा पुढच्या पावसाळ्यात ‘ये रे माझ्या मागल्या…‘. असे कित्येक वर्षे होत राहते. त्यामुळे, या नैसर्गिक आपत्ती आज भयावह रूप धारण करू लागल्या आहेत.

आज,नद्या-नाल्यांच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर बांधकामेहोत आहेत. पूररेषा किंवा ‘रेड झोन‘ याकडे सर्रास दुर्लक्ष केल्या जाते.पूरक्षेत्रात भराव टाकले जातात. जंगलतोड, डोंगरफोड हे प्रकार तर नित्याचेच आहे. माणसाची निसर्गावर हुकूमत चालत नाही, हे मान्य. पण निसर्गाची होणारी हानी तर माणूस रोखू शकतो. केरळच्या घटनेतून निसर्गाने माणसाला एक इशारा दिला आहे. तो आपण गांभीर्याने घ्यायला हवा.निसर्ग कोपला तर आपण समजू शकतो; पण मानवनिर्मित संकटे टाळण्यासाठी कठोर पावलेच उचलावी लागतील. पाऊसमानाचे चक्र अलीकडच्या काळात अनियमित झाल्याचा अनुभव आहे. त्याची वेगवेगळी कारणमीमांसाही केली जाते. निसर्गाचे संवर्धन तर दूरच; पण त्यावर आक्रमणाची घातक मानवी प्रवृत्ती बळावत चालली आहे. बेसुमार वृक्षतोड, जंगलांमध्येही अतिक्रमण, वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा ढासळत चाललेला तोल या साऱ्या बाबी निसर्गचक्राला बाधित करणाऱ्या आहेत. त्याचे गांभीर्य समजून घेऊन सामूहिकरीत्या काही पावले उचलावी लागतील. समाजानेही मानसिकता बदलायला हवी. व्यापक जनजागृतीही करावी लागेल.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय