बाबा थांंब ना रे तू…..

आयुष्य जगताना कधी कधी आपल्या सगळयांनाच काही प्रसंगी, काही घटनांनंतर, कुणी जवळचे आपल्या पासून लांब असल्यावर किंवा कधीतरी अगदी काही विशेष कारण नसतानाही खूप एकटं वाटतं, आणि ही भावना आपल्याला निशचितच खूप ञास देणारी आहे.

पण बाबा गेल्यावर पहिल्यांदा मला एकटेपणा आणि पाेरकेपणा यातला फरक समजला, खूप जाणवला. एकटं वाटणं किंवा असणंही आणि पोरकं असणं यात जमिन आसमानचा फरक आहे, म्हणजे आई आहे माझ्यासाठी पण तरीही वङील नसल्यावर जाे पाेरकेपणा जाणवताे ना ताे खूप भयंकर असतो, शब्दात न व्यक्त करता येणारा.

मला वाटतं आपण ना खूप गृहित धरताे सगळंच आणि सर्वांनाच. मी ही तेच केलं ना ! खूप गृहित धरल बाबा ना …आहेत च कि ते आयुष्य भर आपल्या बराेबर असं वाटत राहिलं आणि त्यामुळे च अनेक गाेष्टी ज्या करायला हव्या हाेत्या त्या राहून गेल्या करायच्या. त्यांना काय हवय या पेक्षा माझ्याच प्रश्नांची उत्तर शाेधत बसले. आज जाणवतय सगळं… हाती काहीच न उरल्यावर…

बाबा नऊ वर्षांपुर्वी तूम्ही घरातून बाहेर पाउल टाकलं ते शेवटचं ठरेल हे तेव्हा मनाला शिवलं देखील नाही आणि तुम्ही आमच्यात नाही हे आजही खर वाटत नाही, प्रत्येक पावलागणिक मनात असलेल्या तुमच्या आठवणी हिच आता माझ्या जगण्याची शक्ती आहे आणि ह्याच सुखद आठवणी तुमच्या नातीच्या मनात रूजवून तुम्हाला तिच्या विचारात सदैव जिवित ठेवणं हिच ईच्छा. तुम्ही दिलेल्या संस्कारांचे आयुष्यभर जतन करून, आई म्हणून जगताना मी ते तुमच्या नाती पर्यंत पाेहचवू शकले तर त्यात च मी तूमची मूलगी असण्याचे सार्थक झाले असे समजेल.

म्हणून वाटतं आता तरी हे गृहित धरणं आपण थांबवायला हवं….. नाहीतर मनात फक्त शब्द उमटत राहतात, ज्याला कधीच उत्तर मिळत नाही….

बाबा थांब ना रे तू — बाबा जाउ नकाे दूर तू बाबा
साद ही घालते लाडकी तूला…..

जगण्या तू दिला माझ्या जीवा अर्थ खरा कधीही परतून न येण्याच्या वाटेवर गेलेल्या आपल्या व्यक्तीच्या परतण्याची खोटी आशा आणि त्यांच्या आठवणीत अस्वस्थ होणं अश्रू गाळणं यापलीकङे आपल्या हातात काहीच राहत नाही. त्यामुळे मी असं म्हणेन की, आपल्या माणसांना गृहित धरू नका, त्यांच्या बरेाबर आजचा दिवस आनंदात घालवा. काेणत्याही बिनभरेाशाच्या उद्याची वाट न पहाता…….

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय