फ्रान्समधील “आयर्नमॅन” हा किताब मिळवणारे डॉ. रवींद्र सिंगल

आयर्नमॅन ट्रायथलॉंन डॉ. रवींद्र सिंगल

२६ ऑगस्ट २०१८ रोजी फ्रान्समधील विची शहरात नाशिक शहर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी आयर्न मॅन हा किताब पटकावला, त्याचा हा लेखाजोगा…

आदर्श कोण …….

आदर्श कोण एक बाप का मुलगी? हेच ठरवणं काही वेळेला कठीण होऊन जातं! आजच्या दिवशी तरी डॉ.रविंदर कुमार सिंगल आणि त्यांची कन्या रविजा सिंगल हे दोघंही बाप-लेक तमाम भारतीयांसाठी आदर्श ठरले आहेत. आपल्या वडिलांचा आदर्श घेऊन रनिंग, स्विमिंग अॅन्ड सायकलिंग’ अशी ‘दिल्ली इंटरनॅशनल ट्रायथलॉंन’ आयोजित स्पर्धेत रविजाने याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात वयाच्या केवळ १७ व्या वर्षात ‘हाफ आयर्न लेडी’ होण्याचा मान मिळवला आहे. त्यामुळे कदाचित तिचाच आदर्श घेऊन वडिल डॉ.सिंगल यांना प्रेरणा मिळाली असावी, असं म्हणण्यास पुरेसा वाव आहे.

आयर्न मॅन ध्यास……

आयर्नमॅनसाधारणतः एक ते दीड वर्षांपूर्वी डॉ.सिंगल यांची अम्मर मियाजी यांची भेट झाली आणि तेथूनच त्यांनी ‘लोहपुरुष – म्हणजेच आयर्न मॅन’ होण्याचा ध्यास घेतला. आपल्या मनाची इच्छा, तयारी आणि स्पर्धेत भाग हा प्रवास खूपच कठीण आणि परीक्षा घेणारा असतो. रविजाचेच कोच डॉ. मुस्तफा अबीद टोपीवाला आणि स्पोर्ट्समेडचे डॉ. मिलिंद पिंप्रीकर यांच्या निदर्शनाखाली स्वत:ची एक दिनचर्या निश्चित करून रोज नियंत्रित आहार, व्यायाम, धावणे आणि किमान २५ ते ५० कि.मि. सायकलिंगचा कि.मि.सराव सुरु केला आणि स्पर्धेची तयारी सुरु केली. याच दरम्यान त्यांनी तयारीचाच एक भाग म्हणून पुणे ते गोवा ६५० कि.मि.ची ‘डेक्कन क्लिफहँगर’ ही स्पर्धाही पूर्ण केली, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला गेला.

आयर्न मॅन – स्पर्धेची वैशिष्ठ्ये

आयर्न मॅन ट्रायथलॉंन ही WTC म्हणजेच वर्ल्ड ट्रायथलॉंन कॉर्पोरेशन यांनी आयोजित केलेली स्पर्धा असून यामधे ३.८६ कि.मि.(२.४ माईल्स) पोहणे, १८०.२५ कि.मि. (११२ माईल्स) सायकलिंग आणि ४२.२० कि.मि.(२६.२२ माईल्स) धावणे. जगभरात ही स्पर्धा एकदिवसीय खेळ स्पर्धा म्हणून अतिशय कठीण मानली जाते. बहुतांशी आयर्न मॅन स्पर्धेचा कालावधी हा १७ तासांचा मानला जातो आणि वेळेत पूर्ण करणे, हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य मानले जाते.

फ्रान्स मधील विची शहरातील या स्पर्धेचा कालावधी हा केवळ १६ तासांचा असल्याने ही स्पर्धा अजूनच कठीण आणि चुरशीची होती. सकाळी ७ वाजता सुरु होणाऱ्या स्पर्धेत पोहण्यासाठी २ तास २० मिनिटे, १० तास सायकलिंग आणि धावण्यासाठी ३ तास ४० मिनिटे असे एकूण १६ तासात संपूर्ण करणाऱ्या व्यक्तीला आयर्न मॅन घोषित केले जाते.

डॉ.सिंगल यांनी नोंदवलेली कामगिरी ही खालीलप्रमाणे:

  • पोहणे ३.८६ कि.मि. १ तास ५० मिनिटे आणि १७ सेकंद
  • पोहणे ते सायकलिंग ही वेळ १४ मिनिटे आणि ३० सेकंद
  • सायकलिंग १८०.२५ कि.मि. ७ तास १२ मिनिटे आणि ५९ सेकंद
  • सायकलिंग ते धावणे ही वेळ ९ मिनिटे आणि ३९ सेकंद
  • धावणे ४२.१९५ कि.मि. ५ तास ४५ मिनिटे आणि ५७ सेकंद

म्हणजेच त्यांनी ही संपूर्ण स्पर्धा एकूण १६ तासांऐवजी केवळ १५ तास १३ मिनिटे एवढ्या कमी वेळात म्हणजेच ४७ मिनिटे शिल्लक असतांनाच पूर्ण करून ‘आयर्न मॅन’ हा किताब पटकावला.

विशेष बाब

आयर्नमॅनया स्पर्धेसाठी डॉ.रविंदर कुमार सिंगल (५१) आणि त्यांची कन्या रविजा सिंगल (१७) या केवळ दोनच भारतीयांनी भाग घेतला होता. परंतु यातील सायकलिंग या स्पर्धेत रविजा सिंगल केवळ ५ मिनिटे मागे राहिल्याने ती ही स्पर्धा जिंकू शकली नाही. परंतु या बाप-लेकीने या स्पर्धेत भाग घेऊन संपूर्ण देशाला, महाराष्ट्र राज्याला आणि आपल्या नाशिक शहराला जगभरात प्रसिद्ध केले आहे. किंबहुना एक आदर्श वस्तुपाठच घालून दिला आहे.

डॉ.रवींदर कुमार सिंगल, आज तरी नाशिकमधील एक आदर्श असंच व्यक्तिमत्व आहे या बाबतीत कोणाचंच दुमत नाही. सन २००३ या सिंहस्थ काळातील त्यांच्या कारकिर्दीची सुयोग्य दखल घेऊन शासनाने २०१६ च्या सिंहस्थ काळात त्यांची खास नेमणूक केली. हा त्यांच्या कार्यकर्तुत्वाचा सन्मान तर होताच शिवाय त्यांच्यावर असीम विश्वास दर्शवत होता. वरील दोनही कुंभमेळ्यात त्यांच्या त्यांचं नाशिक शहराशी नातं अधिकच दृढ होत गेलं आणि लोकांना आपलसं करून घेतल्याने आम्हा नाशिककरांना सिंगलसर कधी परके वाटलेच नाहीत. आपलं नाशिक शहर हे त्यांच्या आवडीचं शहर झाल्याने नाशिक शहर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्यासोबत समस्त नाशिककरांनाही अत्यंत आनंद झाला. गत दोन वर्षांच्या कालावधीत त्यांनी नाशिककरांना सोबत घेऊन अनेक उपक्रम राबविले ज्याचा परिणामस्वरूप आज नाशिक शहराची निवड ‘स्मार्ट सिटी’ मधे झाली आणि शिवाय या देशातील सुखवस्तू शहरामधेही नाशिक शहराचा २१ व नंबर लागला आहे. शासकीय सेवेतील अधिकारी आणि शहरवासियांना शिस्तबद्धचे वस्तुपाठ घालून दिल्याचं श्रेय् डॉ.रविंदर कुमार सिंगल यांच्याकडे जातं, असं म्हटल्यास ती अतिशयोक्ती निश्चितच ठरणार नाही.

कोणत्याही माणसाचे संस्कार त्याच्या व्यक्तित्वातूनच प्रतीत होतात हे त्यांच्याकडे बघितल्यानंतर प्रकर्षाने जाणवतं. त्यांच्या या कार्यकालात त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांचा धडाका लाऊन नाशिककरांना जागृत केलं आहे. सलग दोन वर्षे नाशिक मॅरॅथॉन या स्पर्धेचं यशस्वी आयोजन करतांना त्यांनी अनेक नाशिककरांना स्वत:बरोबर जोडलं असून नाशिक शहराला मॅरॅथॉनचं शहर म्हणून ओळख निर्माण करून दिली आहे, याची जाणीव समस्त नाशिककरांना असून त्यांच्यासोबतीने नवनवीन समाजिक कार्य करण्यासाठी नाशिककरांमधे अहमहमिका सुरु असते, ही बाब आपल्या सर्वांसाठी निश्चितच आनंदाची आणि आश्वासकच होय.

समस्त नाशिककरांतर्फे त्यांना हा मनाचा मुजरा!


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!