कंपन्यांचे वर्गिकरण आणि सामान्य गुंतवणूकदारांसाठी त्यानुसारचा कानमंत्र

एवढ्यातच आपण “कॉफी कॅन पोर्टफोलीओ”  बद्दल माहिती करून घेतली. त्यात वॉरेन बफे (Warren Buffett) यांचा ‘buy and forget approach’ आपण शिकलो आता कंपन्यांच्या वर्गीकरणानुसार गुंतवणूक कशी असावी हे बघूया.

मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअरचे बाजार भावात लार्ज कॅप कंपन्यांच्या तुलनेत भावातील फरकात कमी अधिक असा लक्षणीय फरक पडत असल्याने मोठया प्रमाणात अनेक गुंतवणूकदार त्यांच्याकडे आकर्षित होतात.

शेअरबाजारात नोंदवण्यात आलेल्या कंपन्याचे बाजारमूल्य (Market Capital) आणि त्यातील शेअर्सची दैनंदिन उलाढाल (Daily Trading Volume) यावरून सध्या कंपन्यांची विभागणी तीन प्रमुख गटात करण्यात आली आहे .

  • मोठ्या कंपन्या (Largecap)
  • मध्यम कंपन्या (Midcap)
  • लहान कंपन्या (Small cap)

स्टॉक एक्सचेंजची गव्हर्निंग कमिटी ठराविक कालावधी नंतर प्रत्येक कंपनीचे सरासरी बाजारमूल्य आणि सरासरी दैनंदिन उलाढाल यांचा विचार करून वरीलपैकी कोणत्या गटात कोणती कंपनी असावी या संबंधात निर्णय घेत असते. अलीकडे या पद्धतीत सेबीने बदल सुचवला असून येत्या काही दिवसांत अमलात येईल. त्यानुसार आता बाजारमूल्यानूसार पहिल्या १०० कंपन्या या मोठ्या १०१ ते २५० पर्यंत मध्यम आणि बाकी सर्व लहान कंपन्या  समजण्यात येतील. असे करीत असताना कंपन्यांची दैनंदिन उलाढाल विचारात घेतली जाणार नाही.

Investment
कंपन्यांच्या वर्गीकरणानुसार गुंतवणूक

मोठ्या कंपन्यामध्ये केलेली गुंतवणूक तुलनेने सुरक्षित असल्याने सर्व गुंतवणूकदारांची पहिली पसंती त्यांना असते. या कंपन्या सुरक्षित असून यांचे भाव अचानक मोठ्या प्रमाणात वाढत नाही किंवा कमी होत नाहीत. कंपनीची उलाढाल, नफा, डिव्हिडन्ट, बोनस यावरून त्यात फरक पडतो. साधारण २०% वेगाने त्या वाढत असतात अथवा कमीही  होतात. मात्र मोठ्या प्रमाणात अशा कंपनीत गुंतवणूक केली म्हणजे १००%  सुरक्षित झाली असेही समजू नये.

मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअरचे बाजार भावात लार्ज कॅप कंपन्यांच्या तुलनेत भावातील फरकात कमी अधिक असा लक्षणीय फरक पडत असल्याने मोठया प्रमाणात अनेक गुंतवणूकदार त्यांच्याकडे आकर्षित होतात. या कंपन्यांचे भाव तेजी असल्यास हळु हळु वाढातात तर मंदी आल्यास झटकन कमी होवू शकतात. त्याचप्रमाणे बिजनेस मॉडेल बदलणे, व्यवस्थापन मंडळ बदलणे, नादारी ई. अनेक कारणांनी त्यात फरक पडून मोठ्या प्रमाणात कमी जास्त होवू शकतात. आज ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्या याआधी मिड कॅप/स्मॉल कॅप होत्या. त्यामूळे आपण कोणत्या प्रकारचे गुंतवणूकदार आहोत, कीती जोखिम स्वीकारू शकतो, आपला बाजारविषयक अंदाज कीती प्रमाणात अचूक असू शकतो याचा आणि आपण कीती झटपट निर्णय घेवू शकतो या सर्वांचा विचार करून मगच यामधे  गुंतवणूक करावी. सर्व गुंतवणूक एकाच प्रकारच्या कंपन्यांच्यामध्ये न करता ती विविध ठिकाणी  विभागून करावी. जर आपण जास्त जोखिम घेवु शकत असलो तर मिडकॅप/स्मॉलकॅप कंपन्यांतील गुंतवणुक वाढवावी. बरेच वर्ष पूर्ण बहुमतातील सरकार नसल्याने २०१४ मधील सार्वजनिक निवडणुकानंतर स्थिर सरकार आल्याने झालेल्या सकारात्मक भावनेने मिड कॅप/स्मॉल कॅपचे भावात अल्प कालावधीत २/३ पट वाढ झाली. त्यांनी चार महिन्यांचे कालावधीत १०० ते ३००% हून अधिक रिटर्न दिला. तेव्हा अशा वेळी आलेल्या संधीचा लाभ करून घेण्याची वेळ साधणे हे ही गुंतवणूकदारांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे.

याशिवाय मुंबई शेअरबाजाराने बाजारमूल्य व दैनंदिन उलाढाल यांचा विचार करून तेथे नोंदवण्यात आलेल्या कंपन्याची ‘A’ , ‘B’ आणि ‘Z’ या तीन गटात विभागणी केली आहे. पहिल्या दोनशे कंपन्या  ‘A’ या गटात असून, बाजाराच्या नियमांचे पालन न करणाऱ्या कंपन्या ‘Z’ गटात टाकल्या आहेत. उर्वरित सर्व कंपन्या ‘B’ गटात आहेत. गुंतवणूक या दृष्टीने ‘Z’ गटातील कंपन्यांचा अजिबात विचार करु नये.

मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार यांनी ‘T’ या नावाचा कंपन्यांचा एक गट बनवला असून यामधील व्यवहार हे डिलिव्हरी घेवूनच करावे लागतात. त्याचे शॉर्ट सेलिंग करता येत नाही. खरेदी केलेले शेअर आपल्या डी- मॅट खात्यात आल्याशिवाय विकता येत नाहीत .’Z’  गटातील सर्व कंपन्यांचे व्यवहार सक्तीने ट्रेड टू ट्रेड पद्धतीनेच होतात. याशिवाय BSC, NSC आणि सेबी आपापसात चर्चा करून कोणत्याही कंपनीचा सामावेश या गटात करु शकतात अथवा या गटातून बाहेर आणू शकतात. या गटात असलेली कंपनी मग ती यापूर्वी कोणत्याही गटात असली तरी त्याचे व्यवहार हे ट्रेड टू ट्रेड या पद्धतीनेच करावे लागतात. सामान्य गुंतवणूकदाराच्या सुरक्षिततेसाठी ही योजना करण्यात आली आहे.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.