ब्रोकरची निवड करतांना घेण्याची काळजी

Choosing Broker

ज्यांची उलाढाल जास्त आहे ते आपल्या परंपरागत ब्रोकरकडून दलाली कमी करून घेत आहेत. जे एकदम नवखे आहेत त्यांच्यासाठी फुल सर्विस ब्रोकर योग्य असून त्यांना बाजारातील व्यवहारांचे ज्ञान झाल्यावर डिसकाउंट ब्रोकरकडे जाण्याचा पर्याय योग्य वाटतो.

बाजारात समभाग, कर्जरोखे, ई. टी. एफ., वस्तुबाजारातिल वस्तु यांची सुलभ खरेदी विक्री करण्यासाठी कोणीतरी मध्यस्थाची जरूरी असते. यामुळे व्यवहार जलद होण्यास मदत होते. या शिवाय या व्यवहारांची हमी बाजार घेत असल्याने असे व्यवहार सुरळीतपणे पार पडतील याची जाणीव असल्याने खरेदीदार आणि विक्रेते हे दोघेही निश्चिंत रहातात. काही मोजके व्यवहार वगळता बाजारात दलालाशिवाय असे व्यवहार करणे हे बेकायदेशीर आहे.

हे सर्व व्यवहार ऑनलाइन होत असल्याने ते पुरेसे पारदर्शक आहेत. सध्या ब्रोकिंग व्यवसायात वैयक्तिक  ब्रोकरशिवाय बँका, नॉन बँकिंग कंपन्या असून त्यांच्यात अधिकाधिक व्यवसाय मिळवण्याची स्पर्धा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ब्रोकरेज २.५% पर्यत घेण्याची परवानगी असताना सर्वसाधारण ब्रोकरेज ०.२५ % ते १% चे आसपास आहे.

सध्या ब्रोकरमधे त्यांच्या कार्यपद्धतीवरून मुख्य असे दोन प्रकार पडतात.

                  १. फुल सर्विस ब्रोकर

                  २. डिसकाऊन्ट ब्रोकर 

  • फुल सर्विस ब्रोकर : अनेक व्यक्ति, बँका, नॉन बँकिंग कंपन्या या ही सेवा पुरवीत असून त्यांचे सब ब्रोकर किंवा फ्रेन्चायसीचे माध्यमातून स्टॉक कमोडिटी करन्सी मधील सेवा पारंपरिक पद्धतीने गुंतवणूकदारांना देत आहेत. सर्वसाधारणपणे ३ in १ म्हणजे सेव्हींग, डी. मॅट. आणि ट्रेडिंग असे एकत्रित खाते यांचेकडे उघडावे लागते. ब्रोकरेज १% हून कमी असून काही ठिकाणी किमान ब्रोकरेज म्हणून विशिष्ट रक्कम द्यावी लागते. हे दर एकंदर उलाढालिचे प्रमाणात बदलू शकतात. फोन करून ऑर्डर नोंदवणे, त्यात बदल करणे, रद्द करणे शक्य असून या गोष्टी त्यांनी दिलेल्या पासवर्डचा वापर करून गुंतवणुकदारास संगणक अथवा मोबाईलवरून करता येतात. आपल्या होल्डिंगचे काही पट मार्जीन मिळू शकते .पब्लिक इश्यू, राईट, बाय बॅक सुविधा या साठी त्यांची मदत होते. विविध रिसर्च रिपोर्ट त्यांच्याकडून उपलब्ध होतात. काहीजण पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सेवाही देतात. त्याचप्रमाणे काही लोकानी त्यांच्या ग्राहकांसाठी गुंतवणूक मार्गदर्शकाची सोय उपलब्ध करून दिली आहे त्याचबरोबर काही योजनांचे विक्री प्रतिनिधी म्हणूनही ते काम करतात आणि गुंतवणूकदाराना सर्व सेवा एका छताखाली उपलब्ध करून देतात. जे लोक १००% ऑनलाइन व्यवहार करण्यात अनभिज्ञ आहेत किंवा बाजारात व्यवहार कसे होतात यांची माहीती नाही त्यानी आपले व्यवहार यांच्याकडून करणे योग्य आहे .
  • डिसकाउंट ब्रोकर : गेली ६/७ वर्ष अनेक जण ही सेवा पुरवत असून त्यांच्यामार्फत होणाऱ्या उलाढालित सातत्याने वाढ होत आहे. सध्या राष्ट्रीय शेअर बाजारातील १०% उलाढाल यांच्यामार्फत होत असून तंत्रज्ञानाचा वापर करून जलद गतीने आणि कमीतकमी दलाली (Brokarage) घेवून ही सेवा दिली जात आहे. ज्या लोकाना बाजारातील व्यवहारांची माहीती आहे त्यानी कोणावरही अवलंबून न राहता त्यांना स्वतःचे व्यवहार स्वतः करून ८० ते ९०% दलालीची रक्कम वाचवता येते.

फुल सर्व्हिस ब्रोकर आपल्या घराजवळ वैयक्तीक पातळीवर ही सेवा उपलब्ध करून देत आहेत तर डिसकाउंट ब्रोकर अतिशय अल्प दरात प्रगत तंत्रज्ञानाचे सहाय्याने ह्या सेवा देत आहेत. त्यांचा जास्त भर अधिक उलाढालीवर असून हे लोक विशिष्ठ असे किमान दर न आकारता सेवा देत आहेत. यांची दलाली खूप कमी असून विक्री आणि उलाढाल यावरील खर्च हा पारंपरिक दलालांहून कमी आहे. काही कारणाने फोन करून यांच्यामार्फत व्यवहार करायचे असल्यास त्यासाठी वेगळे  पैसे आकारले जातात. ब्रोकरेज कमी लागत असल्याने डे ट्रेडर आणि डेरिव्हेटिवचे व्यवहार करणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात डिसकाउंट ब्रोकरना पसंती आहे. डिसकाउंट ब्रोकर आई. पी. ओ. चे वितरक नसल्याने त्यांच्यामार्फत प्रारंभिक विक्रीचे अर्ज भरता येत नाहीत. गुंतवणूकदाराना ते स्टॉक एक्सचेंजचे वेबसाईटवरून भरावे लागतात.

या दोन्ही प्रकारातील ब्रोकरची जबाबदारी सारखीच असून डीसकाउंट ब्रोकर कमी ब्रोकरेजवर दर्जेदार  सेवा आपल्या ग्राहकांना देत आहेत. सेबीचे त्यांच्यावर लक्ष असून वेळोवेळी दोन्ही प्रकारच्या ब्रोकरची,  त्यांच्या सेवांची तपासणी करण्यात येवून त्याचे मूल्यांकन केले जाते. दोन्हीही ठिकाणी असलेली गुंतवणूक (पैसे अथवा समभाग)  पूर्णपणे सुरक्षित आहे.

या दोन्हीही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात फायदे तोटे होत असल्याने अनेक लोक दोन्हीही ठिकाणाहून आपले व्यवहार करीत आहेत. तर ज्यांची उलाढाल जास्त आहे ते आपल्या परंपरागत ब्रोकरकडून दलाली कमी करून घेत आहेत. जे एकदम नवखे आहेत त्यांच्यासाठी फुल सर्विस ब्रोकर योग्य असून त्यांना बाजारातील व्यवहारांचे ज्ञान झाल्यावर डिसकाउंट ब्रोकरकडे जाण्याचा पर्याय योग्य वाटतो.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!